
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थी, विनायक चतुर्थी आणि अंगारकीचे व्रत गणपती बाप्पाला समर्पित आहे. यावेळी नवीन वर्ष 2026 गणेशभक्तांसाठी खूप खास असणार आहे. पंचांगानुसार ज्यावेळी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. हा चतुर्थीच्या सर्व दिवसांपैकी सर्वात फायदेशीर आणि शुभ दिवस मानला जातो. फक्त एकाच अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षातील सर्व चतुर्थीच्या दिवसांचे पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे. यावर्षी चतुर्थीच्या दिवशी अंगारक योग जुळून येत आहे. इंग्रजी नववर्षात संकष्टी आणि अंगारकी चतुर्थी कधी आहे ते जाणून घ्या
6 जानेवारी 2026 मंगळवार, अंगारकी चतुर्थी
5 फेब्रुवारी 2026 गुरुवार, संकष्टी चतुर्थी
6 मार्च 2026 शुक्रवार, संकष्टी चतुर्थी
5 एप्रिल 2026 रविवार, संकष्टी चतुर्थी
5 मे 2026 मंगळवार, अंगारकी चतुर्थी
3 जून 2026 बुधवार, संकष्टी चतुर्थी
3 जून 2026, बुधवार संकष्टी चतुर्थी
3 जुलै 2026 शुक्रवार, संकष्टी चतुर्थी
2 ऑगस्ट 2026 बुधवार, संकष्टी चतुर्थी
31 ऑगस्ट 2026 सोमवार, संकष्टी चतुर्थी
29 सप्टेंबर 2026 मंगळवार, अंगारकी चतुर्थी
29 ऑक्टोबर 2026 गुरुवार, संकष्टी चतुर्थी
27 नोव्हेंबर 2026 शुक्रवार, संकष्टी चतुर्थी
26 डिसेंबर 2026 शनिवार, संकष्टी चतुर्थी
हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी या दोन्ही व्रतांना विशेष धार्मिक महत्त्व आहे. ही व्रते गणपती बाप्पाला समर्पित असून संकटांपासून मुक्ती, मनोकामना पूर्ती आणि मानसिक शांतीसाठी हे व्रत पाळले जाते.
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. संकष्टी म्हणजे संकटातून मुक्ती देणारी चतुर्थी.
या दिवशी भगवान गणेशाचे व्रत आणि पूजन केले जाते.
भक्त दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर उपवास सोडतात.
धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी गणपतीची पूजा केल्यास जीवनातील अडथळे, आर्थिक अडचणी आणि मानसिक तणाव दूर होतात.
नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि कुटुंबीय सुखासाठी हे व्रत फायदेशीर मानले जाते.
ज्यावेळी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते, त्या तिथीला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते. मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस असल्याने या चतुर्थीला विशेष तिथी मानले जाते.
अंगारकी चतुर्थी वर्षातून क्वचितच येते, त्यामुळे तिचे महत्त्व अधिक आहे.
या दिवशी केलेले गणेशपूजन अत्यंत फायदेशीर आणि शक्तिशाली मानले जाते.
कर्जमुक्ती, आरोग्य सुधारणा आणि दीर्घकाळ चालू असलेल्या समस्या दूर होण्यासाठी अंगारकी चतुर्थीचे व्रत पाळणे फायदेशीर मानले जाते.
मंगळ ग्रहाच्या दोषांपासून मुक्तीसाठीही या दिवशी व्रत करणे लाभदायक ठरते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: अंगारकी चतुर्थी वर्षातून क्वचितच येते. या दिवशी केलेले गणेश व्रत आणि पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. कर्जमुक्ती, शत्रू बाधा नाश, आरोग्य सुधारणा आणि मोठ्या अडचणी दूर होण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो.
Ans: नवीन वर्षात संकष्टी चतुर्थी म्हणजेच अंगारकी चतुर्थी मंगळवार, 6 जानेवारी रोजी आहे.
Ans: संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येते, तर अंगारकी चतुर्थी फक्त मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी असल्याने अधिक शक्तिशाली मानली जाते.