Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: नारळाचे काय आहे महत्त्व, शुभप्रंसगी नारळाचा का केला जातो वापर जाणून घ्या

नारळाचा संबंध शुभ सुरुवातीशी देखील जोडला जातो म्हणून सुरुवातीच्या वेळी नारळ अर्पण केला जातो. श्रद्धेवर आधारित परंपरेनुसार, नारळ अर्पण करणे म्हणजे, ही सुरुवात सुरक्षित आणि आशीर्वादित असो, असे म्हणण्याचा एक मार्ग आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 10, 2026 | 12:50 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नारळाचे काय आहे महत्त्व
  • पूजेमध्ये नारळाचा का वापर केला जातो
  • नारळ अर्पण करण्याची काय आहे परंपरा
 

घरात काही पूजा असो, नवीन घरात प्रवेश असो, वरात घेऊन जात असो, नवीन वाहन घेतले असो किंवा नवे व्यवसाय सुरू करावयाचे असो. प्रत्येक वेळी कार्याच्या शुभारंभ करण्यासाठी नारळ वाढवलं जातं. नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि मंगळदायी मानले गेले आहेत. आपल्या हिंदू परंपरेनुसार नारळ सौभाग्यदायी आणि समृद्धीचे प्रतीक आहे. नारळ गणपतीला अर्पण केला जातो. नंतर त्याचे प्रसाद म्हणून वाटप केले जाते. हे एक पवित्र फळ आहे त्यामुळे देवाला अर्पण केले जाते. कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यास नारळच का अर्पण केला जातो? नारळचं का फोडला जातो? जाणून घ्या

नारळ का अर्पण केला जातो

प्रत्येक शुभकार्यात नारळ म्हणजेच श्रीफळ का अर्पण करतात तर याचे कारण असे की ऋषी विश्वामित्र नारळाचे निर्माते मानले गेले आहे. याचा वरील कडक भाग हे दर्शवते की कुठल्याही कार्याच्या यशाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागणारच.

धार्मिक ठिकाणी नारळ अर्पण करण्याची प्रथा

प्रत्येक पूजेत अग्रमान नारळाशिवाय पूजा संपन्न होणार नाही. कोणत्याही धार्मिक स्थळी गेलात तर नारळ अर्पण करा असे सांगतात. एवढेच कशाला धार्मिक स्थळाबाहेर नारळाची दुकाने असतातच. हिंदू संस्कृतीत नारळाला कल्पवृक्ष म्हणतात त्याचा प्रत्येक भाग उपयोगी आहे. अगदी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळीपौर्णिमाही संबोधले जाते. यावेळी कोळी बांधव श्रद्धेने समुद्राला नारळ अर्पण करून आपला व्यवसाय सुरू करतात.

Mumbra Devi: आगरी कोळी लोकांचे श्रद्धास्थान असलेली मुंब्रा देवी, काय आहे देवीचा इतिहास? पौराणिक कथा

हिंदू धर्मात शुभ कार्यांसाठी नारळाचा उपयोग केला जातो. मंदिरात नारळ वाढविणे किंवा चढवण्याची पद्धत आहे. नारळाला ‘श्रीफळ’ असेही म्हणतात. धार्मिकतेबरोबरच नारळाचे औषधी गुणधर्म देखील आहेत. प्रत्येक पूजेमध्ये नारळाचे स्थान सर्वोच्च आहे. नारळाशिवाय पूजा-विधी होऊ शकत नाहीत. प्रत्येक पूजेच गणपतीला आवाहन करण्यासाठी पूजेत सुपारी ठेवली जाते, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळविण्यासाठी नारळ ठेवला जातो.

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात.
नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा निवास असतो असे म्हणतात. नारळावर दिसणारे तीन डोळे म्हणजे शंभोशंकराचे त्रिनेत्र आहेत असेही म्हणतात. या कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते आणि पूजा-विधीत त्याचा वापर केला जातो. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात नारळाचा उपयोग केला जातो. नारळ सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. प्रत्येक देवाला नारळ प्रिय आहे म्हणून देवतांना नारळ अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणून त्याचे वाटप केले जाते.

नारळाचा बाहेरील कठीण भाग म्हणजे अहंकाराचे प्रतीक तर आतील पांढरा शुभ्र मऊ भाग हे शांततेचे प्रतीक मानले जाते. म्हणून, नारळ फोडण्याचा अर्थ असा होतो की आपण आपला अहंकार भगवानाच्या चरणी अर्पण करत आहोत. प्रत्येक शुभकार्यात नारळ वाढविला म्हणजे फोडला जातो. असे म्हणतात जर नारळ फोडल्यामुळे शुभ कार्यात कोणतेही विघ्न येत नाही. शुभ कार्य व्यवस्थित पार पडते.

Kundali Reading: कुंडलीमधील ‘हे’ आहेत सर्वांत धोकादायक दोष, करिअर, विवाह आणि संपत्तीवर करतात नकारात्मक परिणाम

एकाक्षी नारळाचे आध्यात्मिक महत्त्व

नारळाचे अनेक प्रकार आहेत त्यातील एकाक्षी नारळाचे आध्यात्मिक महत्त्व अधिक आहे कारण लक्ष्मी मातेला एकाक्षी नारळ फार प्रिय आहे. हिंदू धर्मात महिला नारळ वाढवत अर्थात फोडत नाही. यामागे असे सांगितले जाते की नारळ हे भगवान विष्णूंनी पृथ्वीवर पाठवलेले फळ आहे त्यावर माता लक्ष्मीचा अधिकार आहे. म्हणूनच माता लक्ष्मीशिवाय कोणतीही स्त्री नारळ फोडू शकत नाही.

नारळ हे एक बीज आहे असे मानले जाते आणि स्त्री बीजाच्या रूपात मुलाला जन्म देते, म्हणून नारळ फोडणे स्त्रियांसाठी योग्य मानले जात नाही. असे ही म्हणतात की, जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणेत समस्या येते. असे सांगितले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिंदू धर्मात नारळाचे महत्त्व काय आहे?

    Ans: नारळ पवित्रता, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे प्रत्येक शुभकार्यामध्ये त्याचा वापर केला जातो.

  • Que: शुभप्रसंगी नारळाचा वापर का केला जातो?

    Ans: नारळ देवाला अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कार्य यशस्वी होण्याची श्रद्धा आहे

  • Que: नारळाला “श्रीफळ” का म्हणतात?

    Ans: नारळाला श्रीफळ म्हणतात कारण तो लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि संपत्ती व सुखसमृद्धी देणारा मानला जातो.

Web Title: Astro tips what is the importance of coconut why do auspicious people use coconut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • astro tips
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Jagannath Rath Yatra 2026: भगवान जगन्नाथांच्या तीन रथांचे महत्त्व काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Jagannath Rath Yatra 2026: भगवान जगन्नाथांच्या तीन रथांचे महत्त्व काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Hanuman Temple USA: अमेरिकेतील हनुमान मंदिरांचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि धार्मिक महत्त्व
2

Hanuman Temple USA: अमेरिकेतील हनुमान मंदिरांचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि धार्मिक महत्त्व

Samudrik Shastra: महिलांच्या पायांवरील या खुणा दर्शवतात धन, प्रतिष्ठा आणि यश
3

Samudrik Shastra: महिलांच्या पायांवरील या खुणा दर्शवतात धन, प्रतिष्ठा आणि यश

Shani Gochar: शनिच्या शुभ प्रभावामुळे पुढील 16 दिवस मकरसह या राशींच्या लोकांना मिळणार यश आणि लाभ
4

Shani Gochar: शनिच्या शुभ प्रभावामुळे पुढील 16 दिवस मकरसह या राशींच्या लोकांना मिळणार यश आणि लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.