Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: देवासमोर दिवा लावताना कोणते तेल वापरणे असते शुभ, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात देवासमोर दिवा लावण्याची परंपरा केवळ एक धार्मिक कृती नसून, ती आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेचा स्रोत मानले जाते. देवासमोर कोणत्या तेलाचा दिवा लावणे शुभ असते ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 11, 2026 | 12:50 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • देवासमोर दिवा लावताना कोणते तेल वापरावे
  • कोणत्या तेलाचा वापर करणे असते शुभ
  • देवासमोर तेल वापरण्याचे धार्मिक महत्त्व
 

 

भारतीय परंपरेनुसार दिवा हा अंधारावर प्रकाशाचा विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचे प्रतीक आहे. त्यामुळे देवघरात लावला जाणारा प्रत्येक दिवा हा केवळ प्रकाश देणारा नसून, तो मन, शरीर आणि आत्म्याला शुद्ध करणारा मानला जातो. तूप, तिळाचे तेल किंवा इतर तेलांचा वापरही यामागील आध्यात्मिक आणि आयुर्वेदीय विचारांशी जोडलेला आहे. तसेच या तेलाच्या वापर करण्याला आयुर्वेदासोबतच धार्मिक देखील महत्त्व आहे. देवासमोर कोणत्या तेलाचा दिवा लावणे शुभ असते ते जाणून घ्या

तुपाचा दिवा

गाईच्या तुपाचा दिवा हा सर्वात सात्विक मानला जातो. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा, सुख आणि समृद्धी येते. हे देवतेला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.

Mercury Transit: बुधाने आपली चाल बदलली, या राशींच्या लोकांना चूक पडू शकते महागात

तिळाच्या तेलाचा दिवा

तिळाच्या तेलाचा दिवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि शनि किंवा राहु-केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी लावला जातो. हे तेल साडेसातीचा प्रभाव कमी करण्यास मदत करते.

देवापुढे तीळ तेल, शेंगदाणा तेल किंवा तूप यांचेच दिवे लावण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत अत्यंत प्राचीन, सुसंगत आणि बहुआयामी आहे. ही केवळ धार्मिक रूढी नसून, तिच्यामागे आध्यात्मिक तत्त्वज्ञान, आयुर्वेदीय विचार, सामाजिक वास्तव आणि सूक्ष्म वैज्ञानिक आधार यांचा सखोल संगम आहे. या दृष्टिकोनातून या परंपरेचा विचार केला, महत्त्व अधिक व्यापकपणे उलगडते.

दिवा – केवळ प्रकाश नव्हे, तर आंधारावर मिळवलेला विजय आहे. जेव्हा सूर्य मावळतो. तेव्हा एक दिवा सर्वत्र प्रकाश देतो.

भारतीय चिंतनपरंपरेत दिवा म्हणजे ज्ञान, चेतना आणि ईश्वराशी जोडणारा दुवा. अंधार हा अज्ञानाचा प्रतीक, तर प्रकाश हा ज्ञानाचा. त्यामुळे देवासमोर दिवा लावणे म्हणजे स्वतःच्या अंतर्मनातील अंधार दूर करून आत्मिक प्रकाशाकडे वाटचाल करण्याची प्रतिज्ञा आहे. या प्रक्रियेत वापरले जाणारे तेल किंवा तूप हे केवळ इंधन नसून, ते मानवी जीवनातील संस्कारांचे प्रतीक मानले गेले आहे.

तीळ तेल – सात्त्विकता आणि शुद्धतेचा स्रोत

तीळ तेलाला आयुर्वेदात “स्नेहाचा राजा” म्हटले जाते.

सात्त्विक आणि पवित्र

धार्मिक कार्यात सर्वाधिक योग्य मानले जाते. ऊर्जेचा संतुलित प्रवाह आहे. वातावरणात शांतता आणि स्थैर्य निर्माण करते.

नकारात्मकतेचे शमन

पारंपरिक मान्यतेनुसार तीळ तेलाने लावलेला दिवा वाईट ऊर्जा दूर करतो. तीळ तेलाची निवड ही केवळ श्रद्धेवर आधारित नसून, मानवी मनाच्या स्थैर्यासाठी उपयुक्त अशा घटकांची जाणीवपूर्वक निवड आहे.

शेंगदाणा तेल – व्यवहार्यतेचा आणि सातत्याचा आधार आहे.

भारतीय समाजाच्या ग्रामीण आणि मध्यमवर्गीय वास्तवात, शेंगदाणा तेल हे सहज उपलब्ध आणि परवडणारे साधन आहे. दीर्घकाळ टिकणारी ज्योत नियमित पूजेसाठी उपयुक्त आहे. कमी धूर होतो. घरातील वातावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होते. तिळाच्या तेलाची निवड दर्शवते की, आपल्या परंपरांनी नेहमीच आर्थिक समतोल आणि सामाजिक समावेशकता लक्षात घेतली आहे.

Ramayana: जांबुवंताने दाखवली हनुमानाला स्वतःची ओळख, रामायणातील एक प्रेरणादायी क्षण

तूप

सर्वोच्च पवित्रतेचे प्रतीक आहे. तूप (विशेषतः गायीचे तूप) भारतीय धार्मिक परंपरेत अत्यंत उच्च स्थानावर आहे. यज्ञ, हवन, विशेष पूजा यामध्ये तूपाचे अधिक महत्त्व आहे. तेजस्वी आणि सुगंधी ज्योत मनाला प्रसन्नता आणि एकाग्रता देते. आयुर्वेदातही तूपाला अधिक महत्त्व आहे. शुद्ध तूप वातावरणात सूक्ष्म शुद्धता निर्माण करते. तुपाचा दिवा लावणे म्हणजे ईश्वराप्रती सर्वोच्च आदर आणि शुद्धतेची भावना व्यक्त करणे.

देवासमोरील दिवा, वात, तेल, अगरबत्ती, धूप आदी पूजा साहित्यांना एक महत्त्वाचे स्थान धर्मशास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे दिवा लावताना त्यात कोणते तेल, तूप वापरतो याचे आपल्या श्रद्धेवर अवलंबून असले तरी तीळ, तूप यांच्या वापराने अधिक प्रसन्नता येते, प्रार्थना अधिक चित्ता एकाग्रतेने होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: देवासमोर दिवा का लावला जातो?

    Ans: दिवा लावणे म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञान आणि सकारात्मकतेचा प्रकाश आणणे, असे मानले जाते.

  • Que: तुपाचा दिवा लावल्याने काय फायदे होतात?

    Ans: तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा, शांती आणि समृद्धी वाढते.

  • Que: दिव्यासाठी कोणते तेल सर्वात शुभ मानले जाते?

    Ans: तूप (विशेषतः गायीचे तूप) आणि तिळाचे तेल हे सर्वात शुभ आणि सात्त्विक मानले जातात.

Web Title: Astro tips which oil lamp should be lit before god religious significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • astro tips
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Panchak 2026: पंचक काळात मृत्यू होणे का मानले जाते अशुभ,  गरुड पुराणात सांगितल्या या गोष्टी
1

Panchak 2026: पंचक काळात मृत्यू होणे का मानले जाते अशुभ, गरुड पुराणात सांगितल्या या गोष्टी

Bhagwat Purana: भक्तीमार्ग आणि मोक्षप्राप्तीचे महान ग्रंथ, काय आहे भागवत पुराणाचे महत्त्व
2

Bhagwat Purana: भक्तीमार्ग आणि मोक्षप्राप्तीचे महान ग्रंथ, काय आहे भागवत पुराणाचे महत्त्व

Koradi Mahalakshmi Temple: काय आहे विदर्भातील कोराडी देवी मंदिराचा इतिहास, जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Koradi Mahalakshmi Temple: काय आहे विदर्भातील कोराडी देवी मंदिराचा इतिहास, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Astro Tips: पूजेत वापरली जाणारी ‘ही’ झाडे घरात लावल्यास वाढू शकतात समस्या
4

Astro Tips: पूजेत वापरली जाणारी ‘ही’ झाडे घरात लावल्यास वाढू शकतात समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.