Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

१२० दिवसांचा चातुर्मासांची सुरुवात शनिवार, २५ जुलै रोजी आषाढी एकादशीपासून होत आहे. या काळात विवाह आणि गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्यक्रम निषिद्ध असतात. चातुर्मास कधी सुरू होत आहे, महत्त्व आणि नियम जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 20, 2026 | 01:01 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • २५ जुलैपासून सुरू होत आहे चातुर्मास
  • चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये
  • चातुर्मासाचे काय आहे धार्मिक नियम
 

 

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला चातुर्मास सुरू होतो. यंदा ‘चातुर्मासाला’ शनिवार, २५ जुलै रोजी म्हणजेच आषाढी एकादशीपासून सुरुवात होत आहे. पुढील चार महिने म्हणजेच २० नोव्हेंबर (कार्तिकी प्रबोधनी एकादशी) पर्यंत हा काळ असेल. या चार महिन्यांच्या कालावधीला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. देवशयनी एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगिक निद्रेत जातात. परिणामी, विवाह, गृहप्रवेश, मुंडन विधी, नामकरण विधी आणि इतर शुभ समारंभ स्थगित केले जातात. या काळात नेमके काय करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि याचे महत्त्व काय आहे, हे जाणून घेऊया.

चातुर्मास म्हणजे काय

चातुर्मास म्हणजे ‘चार महिने’. हिंदू पंचांगानुसार, हा चार महिन्यांचा पवित्र काळ आहे (आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत). याला ‘चौमास’ असेही म्हणतात. या चार महिन्यांत भगवान विष्णू योगनिद्रेत (गाढ आध्यात्मिक निद्रा) जातात, त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्यक्रम (जसे की विवाह किंवा गृहप्रवेश) केले जात नाहीत.

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

चातुर्मासात पुढील गोष्टी कराव्यात

पुजा, सत्संग, दान, यज्ज्ञ आदी गोष्टी तुम्ही चातुर्मासात करू शकता.

या महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे शुभ फळ देणारे ठरते.

चातुर्मासात सात्विक अन्न खावे. गरजूंना कपडे चातुर्मासात अवश्य करावेत.

‘या’ गोष्टी करणे टाळा

लग्न, गृहप्रवेश, मुंडन आदी करणे या महिन्यांमध्ये टाळावे.

काळ्या रंगाचे कपडे चातुर्मासात घालू नये.

मोठ्यांचा अपमान या दिवसात करू नये.

चातुर्मासात शुभ कार्य का केली जात नाहीत?

धार्मिक मान्यतेनुसार, चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात. भगवान विष्णू हे शुभकार्यांचे संरक्षक मानले जात असल्याने त्यांच्या झोपेच्या वेळी ही कामे करणे योग्य मानले जाते. कारण, या काळात शुभ कर्माचे फळ मिळत नाही. याव्यतिरिक्त दुसरं कारण म्हणजे चातुर्मास पावसाळ्यात येत असल्याने या दिवसात हवामान दमट असते. या वातावरणात बैक्टेरिया अधिक असतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढतात. प्रवास करणे देखील कठीण होते. अशावेळी लग्नासारखी शुभ कार्य आयोजित करणे गैरसोयीचे ठरू शकते.

Vastu tips For Shukra Grah: शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम

चातुर्मासाचे चार महिने आणि त्यातील प्रमुख सण

चातुर्मास केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर भारतीय संस्कृती आणि सणांच्या दृष्टिकोनातूनही खूप खास आहे.

श्रावण- भगवान शिव आणि विष्णू यांच्या उपासनेचा महिना.

भाद्रपद- श्री कृष्ण जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी सारखे प्रमुख सण.

अश्विन – पितृ पक्ष, शारदीय नवरात्री आणि विजयादशमी.

कार्तिक – दिवाळी, देवोत्थान एकादशी आणि तुळशी विवाह.

या महिन्यांमध्ये रक्षाबंधन, जन्माष्टमी, दसरा आणि दिवाळी यांसारख्या प्रमुख सणांच्या आगमनामुळे सामाजिक आणि आर्थिक घडामोडींनाही गती मिळते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: . चातुर्मास २०२६ कधी सुरू होणार आहे?

    Ans: चातुर्मासाची सुरुवात २५ जुलै २०२६, आषाढी (देवशयनी) एकादशीपासून होणार असून २० नोव्हेंबर २०२६, कार्तिकी (प्रबोधिनीचातुर्मासाची सुरुवात २५ जुलै २०२६, आषाढी (देवशयनी) एकादशीपासून होणार असून २० नोव्हेंबर २०२६, कार्तिकी (प्रबोधिनी) एकादशीपर्यंत हा पवित्र काळ असेल.) एकादशीपर्यंत हा पवित्र काळ असेल.

  • Que: चातुर्मासाचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार, या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. त्यामुळे भक्त पूजा, जप, दान, व्रत आणि सत्संगाद्वारे आध्यात्मिक साधनेवर भर देतात.

  • Que: चातुर्मासात कोणती कामे करावीत?

    Ans: पूजा, मंत्रजप, विष्णू उपासना, दानधर्म, सत्संग, धर्मग्रंथांचे वाचन, सूर्योदयापूर्वी स्नान आणि सात्त्विक आहार घेणे शुभ मानले जाते.

Web Title: Chaturmas 2026 what auspicious work is not done during chaturmas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Ashadhi Ekadashi
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध
2

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
3

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
4

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.