अंकशास्त्रानुसार जन्मतारिख आणि ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीवरुन व्यक्तीचंं भविष्याच्या अंदाज व्यक्त केला जातो. ज्योतिषशास्त्रात शरीराच्या विविध अंगांच्या रचनेवरून व्यक्तीचा स्वभाव, नशीब आणि जीवनशैलीविषयी काही गोष्टी सांगितल्या जातात. दातांमधील “गॅप” म्हणजे दातांमध्ये असलेली फट असणं यामागे देखील एक अर्थ आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. ही माहिती पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेली नसली तरी पारंपरिक ज्योतिषशास्त्रात काही अशा व्यक्तींच्या स्वभावाचे आणि भविष्याचे काही अंदाज वर्तविण्यात आलेले आहेत.
दातातील फट ही अनेकांना लाजिर्वाणी गोष्ट वाटते. अनेकांना हसताना किंवा बोलताना दात फटकुळे असल्याचा न्यूनगंड वाटतो. मात्र दातातील हीच फट तुमचं नशिब पालटते, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. दातांमध्ये असलेली फट हा एक लक्षवेधी भाग मानला जातो. विशेषतः पुढच्या दोन दातांमध्ये जर गॅप असेल, तर त्यावरून काही खास गोष्टी सांगितल्या जातात.
ज्योतिषशास्त्रानुसार, अशा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या गडगंज श्रीमंत असतात. त्यांच्या आयुष्यात धनप्राप्तीचे योग सतत असतात, जरी पैसा हातात टिकत नसेल तरीही पैशाची कमतरता भासत नाही. या व्यक्ती बहुतांश वेळा स्पष्टवक्त्या आणि प्रभावी वक्ते असतात. मनात काहीही न ठेवता बोलत असल्याने फटकळ स्वभावाच्या असतात. त्यांच्यात आत्मविश्वास भरपूर असतो आणि ते आपलं मत निर्भीडपणे मांडतात.
दातांमध्ये गॅप असलेले लोक स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचारसरणीचे मानले जातात. त्यांना कोणावर अवलंबून राहणे फारसे आवडत नाही. हे लोक प्रेमळ स्वभावाचे आणि समाजात लवकर मिसळणारे असतात. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचं आकर्षण असतं, ज्यामुळे ते सहज लोकांचे लक्ष वेधून घेतात. यांना घरच्यांच्या जीवावर जगणं आवडत नाही.
या व्यक्तींच्या जशा चांगल्या बाजू आहे तशाच चुकीच्या बाजू देखील आहेत. काही ज्योतिषी असेही सांगतात की अशा व्यक्तींमध्ये थोडीशी चंचलता देखील पाहायला मिळते. निर्णय घेताना ते कधी-कधी अस्थिर असू असतात, आणि एका ठिकाणी स्थिर राहणं त्यांना अवघड जातं. फटकळ स्वभावामुळे अनेकदा ही माणसं समोरच्या व्यक्तींना दुखावतात. त्यामुळे इतर व्यक्तींचा यांच्याबाबत गैरसमज होण्याची दाट शक्यता असते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)