फोटो सौजन्य- pinterest
महादेवाच्या पूजेसाठी श्रावण महिना विशेष मानला जातो. या महिन्यात शिवभक्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांची पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने शिव मंदिरांना भेट देतात. बऱ्याच वेळा मंदिरात जाताना किंवा परतताना लोक जाणूनबुजून किंवा नकळत अशा चुका करतात ज्यामुळे त्यांना त्याचे अशुभ परिणाम मिळतात. धार्मिक ग्रंथात उल्लेख केल्यानुसार या चुका करु नये, अन्यथा व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मकता येऊ शकते. मंदिरातून परतताना कोणत्या चुका करु नये, जाणून घ्या
मंदिरातून परतताना काही गोष्टीकडे नेहमी लक्ष देणे गरजेचे आहे. मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवणे शुभ मानले जाते. मात्र परतताना घंटा वाजवू नये. त्यासोबतच मंदिरातून रिकाम्या हाती परत येऊ नये. याशिवाय मंदिरातून आल्यानंतर लगेच पदार्थ किंवा अन्न खाणे टाळावे.
मान्यतेनुसार, मंदिरातून परतताना घंटा वाजवू नये, यामुळे मंदिरातील सकारात्मक ऊर्जा दूर होते. असे म्हटले जाते की, ज्यावेळी आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी घंटा वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा पसरते. परंतु परत येताना घंटा वाजवल्याने ही सकारात्मक ऊर्जा गोंधळून जाऊ शकते आणि ती संपुष्टात येऊ शकते. म्हणून, मंदिरातून येताना घंटा वाजवू नये.
असे मानले जाते की, शिवमंदिरातून परतताना पुन्हा पुन्हा मागे वळून पाहू नये. मान्यतेनुसार मंदिरातून बाहेर पडताना भगवान शिवाचे लक्ष भक्ताकडून त्यांच्या निवासस्थानाकडे जाते आणि त्यावेळी मागे वळून पाहणे त्यांच्या कृपेत अडथळा आणू शकते. त्यामुळे वारंवार मागे वळून पाहू नये.
काही वेळा लोक फुले, फळे, मिठाई, धूप, दिवे, तांदळाचे धान्य इत्यादी घेऊन देवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जातात आणि सर्व साहित्य देवाला अर्पण केल्यानंतर ते मंदिरातून रिकाम्या हाताने परततात. मात्र मंदिरातून असे रिकाम्या हाती परतणे शुभ मानले जात नाही. म्हणून मंदिरातून परतताना प्रसाद किंवा पूजा साहित्यातील फुले इत्यादी सोबत आणावे.
मंदिरातून आणलेले प्रसाद किंवा फुले येताच पवित्र ठिकाणी आदराने ठेवावीत. प्रसाद सर्वांना वाटावा आणि स्वतः खा. तसेच, फुले पाण्यात वाहा किंवा झाडाच्या मुळाशी ठेवा. फुले फेकण्याची किंवा प्रसाद अशुद्ध ठिकाणी ठेवण्याची चूक करू नका.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)