श्रीमंत होणं, पैसे कमवणं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. प्रत्येक जण श्रीमंत होण्यासाठी मेहनत घेत असतो मात्र काहींना लवकर यश मिळतं तर काही अनेक आव्हानं झेलल्यानंतर चांगले दिवस यायला सुरुवात होते. अंकशास्त्रानुसार ठराविक तारखेला जन्मलेली माणसं ही फक्त श्रीमंत होण्यासाठीच जन्माला आलेली असतात. कोणत्या मुलांकांच्या व्यक्ती या सर्वात जास्त श्रीमंत असतात जाणून घेऊयात.
जन्मतारिख आणि कुंडली याचा प्रभाव व्यक्तीच्या आयुष्यावर होत असतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. प्रत्येक मुलांकाचा स्वामी आहे आणि त्यानुसारच त्यांची चांगली वाईट फळं त्या त्या व्यक्तीला मिळत असतात. अंकशास्त्रानुसार, असं म्हटलं की शुक्राच्या अधिपत्याखाली येणाऱ्या व्यक्ती श्रीमंत असतात.
अंकशास्त्रानुसार मुलांक 6असलेल्या व्यक्ती या लवकर श्रीमंत होतात असं म्हटलं जातं. मुलांक 6 चा शुक्र स्वामी आहे. शुक्राच्या अधिपत्याखाली येणाऱ्या व्यक्ती विलासी आयुष्य जगणं पसंत करतात. या व्यक्ती कमी वयात जास्त श्रीमंत होतात असं अंकशास्त्र सांगतं. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 या तारखेला झाला असेल तर अशा व्यक्तींचा मुलांक हा 6 असतो.
शुक्राचा अंमल असल्याने ही माणसं कलासक्त आयुष्य जगणारी असतात. यांना भौतिक सुखााची आवड असते. अनेक कलाकार हे मुलांक 6 मध्ये येतात. या मुलांकांच्या व्यक्तींचा स्वभाव आकर्षक असतो. अशा व्यक्तींची लव्ह लाईफ चांगली असते. यांना प्रेम आणि फेम दोन्ही खूप लवकर मिळतात. शुक्र हा प्रेमाचा कलेचा कारक आहे तसाच तो श्रीमंतीचा देखील आहे. कामाच्या ठिकाणी या माणसांचं संवादकौशल्य इतरांना भारावून टाकणारं असतं. शुक्राच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्ती त्यांच्या आकर्षिक संवादाने इतरांची मनं जिंकतात. ही माणसं समाजात प्रत्येकाच्या आवडीची असतात.