फोटो सौजन्य- pinterest
जगात अनेक पैगंबर आहेत त्यापैकी एक बाबा वेंगा हे आहेत. त्यांनी केलेल्या भविष्यवाण्या प्रसिद्ध आहेत. कारण बाबा वेंगा यांनी दरवर्षी जगात घडणाऱ्या घटनांचे भाकीत केले आहे आणि त्यांची ही भाकिते खरी देखील ठरतात. बल्गेरियाचे बाबा वेंगा हे त्यांच्या भविष्यवाण्यांसाठी जगभर ओळखले जातात. बाबा वेंगा यांना बाल्कन प्रदेशाचे नोस्ट्रेडॅमस म्हटले जाते. त्यांच्या भविष्यवाण्यांमुळे ते बऱ्याचदा चर्चेमध्ये येतात.
बाबा वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियात झाला आणि 1996 मध्ये वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. बाबा वेंगा यांनी वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गमावली. बाबा वेंगा यांनी सोव्हिएत युनियनचे विघटन आणि अमेरिकेतील अल कायदा या दहशतवादी संघटनेने केलेल्या 9/11 च्या हल्ल्यांसह अनेक भाकिते केली होती, जी सर्व भाकिते पूर्णपणे खरी ठरली आहेत. ऑगस्ट महिन्यासाठी बाबा वेंगानी कोणती भाकिते केली आहेत, ते जाणून घ्या
बाबा वेंगाच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या दुहेरी आगीच्या घटनेचा उल्लेख केला होता. त्यांनी म्हटले होते की ऑगस्टमध्ये आकाशातून आणि पृथ्वीवरून आग बाहेर येईल. दरम्यान, त्याचा अर्थ अजूनही स्पष्ट झालेला नाही. लोकांच्या विश्वासानुसार ते मोठ्या प्रमाणात जंगलातील आगीबद्दल बोलत आहे, तर काही लोक म्हणतात की ती ज्वालामुखीच्या उद्रेकाबद्दल बोलत आहे. आकाशातून पृथ्वीवर उल्कापिंड किंवा लघुग्रह देखील पडू शकतो. काही लोक जगातील अनेक भागांमध्ये जंगलातील आगींनाही याचा संबंध जोडत आहेत.
बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, ऑगस्ट महिन्यामध्ये मानवजात त्या ज्ञानाच्या जवळ पोहोचेल जे तिला जाणून घ्यायचे नव्हते. तसेच त्यांनी असे देखील सांगितले आहे की, जे एकदा उघडले आहे ते पुन्हा बंद करता येत नाही.
मात्र, बाबा वेंगानी नेमकी कशाबद्दल भविष्यवाणी केली आहे आणि तिचा संबंध कोणत्या गोष्टींशी संबंधित आहे याचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. दरम्यान, जैवतंत्रज्ञान किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेशी यांचा संबंध असू शकतो, अशी मान्यता आहे.
दुसऱ्या भाकितानुसार असे म्हटले जाते की, संयुक्त हाताचे दोन तुकडे होतील आणि दोन्ही आपापल्या मार्गाने जातील. यावरून अनेक अर्थ काढले जात आहेत. काही तज्ञ यातून राजकीय अर्थ काढत आहेत. काही लोकांच्या म्हणण्यानुसार, नाटो किंवा युरोपियन युनियनसारख्या आघाडींमध्ये फूट पडण्याचे संकेत देऊ शकते, असा देखील काही लोकांचा विश्वास आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)