फोटो सौजन्य- pinterest
जन्माष्टमीचा सण हा भगवान श्रीकृष्णाच्या पराक्रमांची आठवण करून देणारा हा एक खास दिवस. या दिवशी श्रीकृष्णाचे भक्त उपवास करतात. चित्रे सजवतात आणि रात्री 12 वाजता जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. जो भक्त भक्तिभावाने उपवास करुन श्रीकृष्णाची पूजा करतात आणि देवाला प्रिय असलेल्या वस्तूंचे दान करतात अशा लोकांच्या जीवनातील सर्व दुःख आणि दारिद्र्य दूर होते. यंदा जन्माष्टमीचा सण शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी आहे. खासकरुन श्रीकृष्णाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते. जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे, जाणून घ्या
यंदा जन्माष्टमी तिथीची सुरुवात शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी रात्री 11.49 वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती शनिवार, 16 ऑगस्ट रोजी रात्री 9.34 वाजता होईल. त्यामुळे जन्माष्टमीचा सण यावेळी शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. तर दहीहंडीचा सण शनिवार, 16 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, जन्माष्टमीच्या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने दान करतो, त्याच्या जीवनातील वाईट काळाचा प्रभाव कमी होतो. या दिवशी दान केल्याने पुण्य लाभते, अशी मान्यता आहे. ज्या वस्तू भगवान श्रीकृष्णांना प्रिय आहेत त्या वस्तूंचे दान केल्याने तुम्हाला त्याचा अनेक पटींनी फायदे होताता.
जन्माष्टमीच्या दिवशी गरीब किंवा गरजूंना अन्न, फळे किंवा मिठाई यांचे दान करावे. त्यामुळे घरातमध्ये समृद्धी येते आणि अन्न आणि पेयाची कधीही कमतरता भासत नाही.
भगवान श्रीकृष्णाला लोणी खूप आवडते. त्यामुळे या दिवशी गाईच्या दुधापासून बनवलेले लोणी आणि साखरेचे दान करणे खूप शुभ मानले जाते.
श्रीकृष्णाच्या मुकुटाचा अभिमान म्हणजे मोरपंख. हे मोरपंख मंदिरात किंवा ब्राह्मणाला दान करावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.
मुलांना नवीन कपडे किंवा चप्पल-बूट यांचे दान करणे पुण्याचे मानले जाते. असे देखील मानले जाते, विशेषतः बाळ गोपाळांच्या मूर्तीच्या रूपात मुलाला काहीतरी देणे शुभ असते.
असे मानले जाते की, व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा कामधेनू गाय पूर्ण करते. त्यामुळे तिची छोटी मूर्ती मंदिरात किंवा पुजाऱ्याला दान करावे, त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते, अशी मान्यता आहे.
बासरी ही भगवान श्रीकृष्णाची ओळख आहे. ती मुलांना किंवा मंदिरात दान केल्याने मन शांत राहते आणि मानसिक ताण देखील कमी होतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)