फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ देवतेचा फोटो लावतो. असे म्हटले जाते की, असे फोटो लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि घरातील वातावरण प्रसन्न राहते.
मान्यतेनुसार वास्तूच्या नियमांचे पालन केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. संपत्तीमध्ये वाढ होऊन व्यक्तीला त्याचा फायदा होतो. घराचे दरवाजे आकर्षक बनवण्यासाठी अनेक प्रकारची कारागिरी करता येते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवतांचे फोटो लावणे शुभ मानले जाते. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ देवतेचे फोटो लावण्याचे काय आहेत नियम, जाणून घ्या
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती किंवा चित्र लावणे शुभ मानले जाते. कारण याला सर्व अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता असे म्हटले जाते. त्यासोबत तुम्ही देवी लक्ष्मीचा देखील फोटो लावू शकता. त्याचप्रमाणे या मुर्तीमुळे घरामध्ये ती आणि स्थैर्य देखील येते. तसेच घरामधील नकारात्मकता दूर होते. जीवनात धनाची कमतरता भासत नाही.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती, देवी लक्ष्मीची मूर्ती आणि हनुमानाची मूर्ती इत्यादी देवतेची मूर्ती लावणे शुभ मानले जाते. त्यासोबतच मुख्य प्रवेशद्वारावर शुभ लाभ लिहिणे देखील शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते.
मुख्य दरवाजावर देवाचे चित्र लावले असल्यास मूर्तीवर प्रकाश कायम येत राहील अशी व्यवस्था असावी. तुम्ही घरातही नसताना त्या ठिकाणी प्रकाश असला पाहिजे.
दररोज मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा किंवा मेणबत्ती लावावी. त्यामुळे घरात शांततेचे वातावरण राहते.
घराच्या दारावर देवाचे चित्र असल्यास त्याभोवती बूट आणि चप्पल ठेवण्यासाठी जागा तयार करु नका.
जर आपण वास्तूच्या नियमांचे पालन करुन घराच्या मुख्य दारावर देवाचा फोटो लावल्यास घरामधील वास्तूदोष दूर होतो. त्यामुळे तुमच्या जीवनातील नकारात्मकता देखील दूर होते. त्याचसोबत तुम्हाला करिअरच्या क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळते. तसेच तुमची बिघडलेली कामे देखील पूर्ण होतात. त्याचप्रमाणे घरातील लोकांचे आरोग्य देखील चांगले राहते आणि मानसिक स्थिती देखील चांगली राहते. यामुळे देवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि घरामध्ये वादविवाद होत नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)