फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. सध्या तो कर्क राशीमध्ये स्थित आहे. त्याला बुद्धिमत्ता, संभाषण, व्यवसाय आणि तर्कशास्त्राचे प्रतीक मानले जाते. ज्यावेळी बुध ग्रह सूर्याच्या खूप जवळ येतो त्यावेळी त्याची उर्जा, शक्ती कमी होते असे म्हटले जाते.
द्रिक पंचांगानुसार, शुक्रवार, 18 जुलै रोजी बुध रात्री 8.14 वाजता कर्क राशीमध्ये अस्त होणार आहे. तसेच तो 11 ऑगस्टपर्यंत तिथेच स्थितीत राहील. याचा काही राशीच्या लोकांना फायदा होईल तर काहींना काळजी घ्यावी लागणार आहे. कर्क राशीतील बुध ग्रह चंद्राच्या प्रभावाखाली असल्याने त्याला मन आणि भावनांचा कारक मानले जाते. कारण चंद्र कर्क राशीचा स्वामी आहे. बुध अस्त झाल्यावर लोकांची बुद्धिमत्ता आणि संवाद शक्ती कमकुवत होते. कर्क राशीला जल राशी आहे, जी संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञान वाढवते. बुध ग्रहाचे अस्त होणे काही राशीच्या लोकांसाठी खूप विशेष असणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे त्याच्या अस्ताचा परिणाम या राशीच्या लोकांवर दुसऱ्या भावामध्ये होणार आहे. यावेळी हे लोक भावनिक निर्णय घेऊ शकतात. या लोकांचे कौटुंबिक संबंध मजबूत राहू शकतात. व्यवसायामध्ये लोकांना नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच यांची आर्थिक स्थिती सुधारलेली राहील. तसेच या लोकांना सर्जनशील कामामध्ये यश मिळेल.
कन्या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांवर त्याचा परिणाम अकराव्या भावावर होणार आहे. त्याच्या अस्ताचा परिणाम या राशीच्या लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मित्रांकडून सहकार्य मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. तसेच या लोकांची प्रगती होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होतील.
बुध ग्रहाच्या अस्ताचा परिणाम वृश्चिक राशीच्या नवव्या भावावर होईल. त्यामुळे या राशीतील लोकांना अध्यात्म आणि अभ्यासाच्या क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. यावेळी तुम्हाला योग्य ते निर्णय घेऊ शकता. उच्च शिक्षणाशी संबंधित काम यशस्वी होईल.
बुध ग्रहाच्या अस्ताचा परिणाम सातव्या भावावर होणारा आहे. या अस्तामुळे मकर राशीच्या लोकांना वैवाहिक आणि व्यावसायिक संबंधांमध्ये स्थिरता येईल. अशावेळी भावनिक समज वाढू शकतात. ज्यामुळे संबंध सुधारतील. जे लोक व्यवसायामध्ये भागीदारीत काम करत आहे त्यांना फायदा होईल. वैवाहिक जीवनात आनंद आणि व्यवसायात स्थिरता येईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)