फोटो सौजन्य- pinterest
आज 14 जुलैचा दिवस कुंभ राशीमध्ये चंद्र आज संक्रमण करणार आहे. आज चंद्राची मंगळावर अंतिम दृष्टी राहील. त्यामुळे आज लक्ष्मी योग तयार होत आहे. तसेच कुंभ राशीमध्ये राहूसोबत चंद्रग्रहण योग तयार होईल. तसेच शनि आणि गुरूच्या मध्ये चतुर्थ दशम योग्य तयार होईल. संकष्ट चतुर्थीचा दिवस कोणत्या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर आहे जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवारचा दिवस चांगला राहील. आमच्या अडकलेले कामे पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा निवास अनुकूल राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदारी येऊ शकतात. तुमची समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल. समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळेल. प्रशासनाशी कोणतेही अडकलेले काम आज पूर्ण होऊ शकते. कंत्राटदार असाल आणि सरकारी निविदा मागत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील. उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. प्रवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आध्यात्मिक कार्यात तुमचे मन लागेल. तुमची अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता.
तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील. या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील. नोकरी करणाऱ्यांना सहकार्याचा पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तसेच वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. जुन्या योजनेत गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला यश मिळेल.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. करिअरपासून व्यवसायापर्यंत तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. लेखक, संशोधक, मीडिया या क्षेत्रामध्ये कार्यरत असणार्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. तुमची नियोजित कामे पूर्ण होतील. कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण राहील. व्यवसायानिमित्त तुम्हाला बाहेर जावे लागू शकते.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतील. खर्चावर नियंत्रण ठेवा अनावश्यक खर्च करणे टाळा. फॅशन, ब्युटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्याचा आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. नातेसंबंधामध्ये गोडवा राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)