
फोटो सौजन्य- pinterest
काही दिवसांनी फेब्रुवारी महिना सुरू होणार आहे. हा महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप शुभ आहे. या महिन्यात बुध ग्रह आपली राशी बदलून शनीच्या घरात प्रवेश करेल. बुध ग्रह 3 फेब्रुवारी रोजी रात्री 9.38 वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषांच्या मते, कुंभ राशीत बुधाचे आगमन सर्व 12 राशींवर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडेल. परंतु काही व्यक्तींना लक्षणीय फायदे मिळू शकतात. कारण बुध हा ग्रह वाणी, व्यवसाय, संवाद आणि बुद्धिमत्तेसाठी जबाबदार आहे. त्यामुळे, व्यवसाय, करिअर आणि संवादाच्या क्षेत्रात लोकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. बुध ग्रहांच्या राशी संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
वृषभ राशीच्या दहाव्या घरामध्ये बुध ग्रह संक्रमण करणार आहे. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि फायदेशीर संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबात तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. नवीन नोकरीच्या शोधत असणाऱ्या लोकांना लोकांना अपेक्षित यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.
बुध ग्रहाचे संक्रमण सिंह राशीच्या घरामध्ये सातव्या घरात होणार आहे. या काळात जीवनात प्रगती होताना दिसून येईल.
नोकरीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधाल आणि तुमच्या व्यवसायात सकारात्मक बदल घडतील. तुमच्या कारकिर्दीत इच्छित परिणाम साध्य होतील. अविवाहित लोक लग्न करण्याची शक्यता आहे.
बुध ग्रह तूळ राशीच्या पाचव्या घरात संक्रमण करणार आहे. तुम्हाला सर्व क्षेत्रात भाग्य मिळेल. मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी हा शुभ काळ आहे. तुमच्या प्रियकराकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय भागीदारीतून फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण तुमच्या राशीच्या पहिल्या घरामध्ये होणार आहे. या काळात तुमच्या सर्व इच्छा आणि ध्येय पूर्ण होतील. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला आनंद आणि पाठिंबा मिळत राहील. तुमच्या भावंडांसोबत प्रेम आणि सुसंवाद राहील. तुमचे नेतृत्वगुण सुधारतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. व्यवसय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: 2026 मध्ये बुध ग्रह शनिच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. हा गोचर ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
Ans: बुध हा बुद्धी, व्यापार, संवाद आणि करिअरचा कारक आहे, तर शनि शिस्त, मेहनत आणि स्थैर्य दर्शवतो. या संयोगामुळे विचारपूर्वक निर्णय, दीर्घकालीन यश आणि स्थिर प्रगती मिळते.
Ans: या काळात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, पगारवाढ किंवा जबाबदारीची संधी मिळू शकते. व्यवसायिकांसाठी नवीन करार, गुंतवणूक आणि नफा संभवतो.