
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या मित्र आणि नीच रास नियमित अंतराने संक्रमण करत असतात; ज्याचा चांगला वाईट परिणाम मानवी जीवनावर होत असतात.होळीच्यानंतर साधारणत: एप्रिल महिन्यात बुध ग्रह त्याच्या मीनमध्ये प्रवेश करणार आहे. याचा चांगला वाईट परिणाम काही राशींवर होणार आहे. बुधाचं हे गोचर कोणत्या राशीसाठी कसं असणार हे जाणून घेऊयात.
बुधाचं हे गोचर बारा राशींपैकी वृषभ राशीला अनुकूल असणार आहे. हा काळ करिअर आणि आर्थिक बाबतीत चांगले फळ देणारा आहे. वृषभ राशीच्या 11 व्या घरात बुधाचं भ्रमण होणार आहे. या काळात केलेली गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरु शकते. जसं की, शेअर बाजार किंवा इतर कोणत्या स्कीममध्ये दिर्घकाळापासून अडकेले पैसे मिळतील. नोकरदार वर्गाची पगारवाढीची शक्यता आहे. याबाबत तुम्ही संयमी राहिलात तर त्याचे परिणाम चांगले होतील.
बुधाचं भ्रमण मिथुन राशीसाठी सकारात्मक ठरणार आहे. बुध मिथुन राशीच्या कुंडलीतून करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात भ्रमण करणार आहे. यामुळे तुमच्या कामात, व्यवसायात प्रगती होऊ शकते. बेरोजगार व्यक्तींना रोजगार मिळू शकतो. या राशीच्या मंडळींना वडिलोपार्जित प्रॉपर्टीत यश मिळेल. व्यावसायिकांना नव्या संधी मिळतील.
धनु राशीच्या मंडळींना हा काळ चांगला आहे. धनु राशीच्या चौथ्या भावातून बुधाचं भ्रमण होत आहे. या काळात तुम्ही घरात नव्या सुखसोयीच्या वस्तू घेऊ शकता. वाहनं मालमत्ता खरेदीसाठी हा काळ शुभ आहे. या काळात तुमची मान प्रतिष्ठा वाढण्याचा योग आहे. कौटुंबिक संबंध जिव्हाळ्याचे होतील. घरातील वातावरण सकारात्मक राहिल. मानसिक शांतता मिळेल. या राशींच्या व्यतिरिक्त इतर राशींना बुधाचं हे गोचर संमिश्रफल देणारं आहे. त्यामुळे चढ उतार पाहायला मिळतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)