Saptahik Ank Jyotish 19 to 25 January 2026 in Marathi : अंकशास्त्रानुसार, जावेवारीच्या तिसरा आठवडा संमिश्र फळ देणारा आहे. 1 ते 9 मुलांकाच्या मंडळींना काय खबरदारी घ्यावी, हा आठवडा कसा असेल सांगितलं आहे.
करिअर असो किंवा वैयक्तिक आयुष्य या मुलांकाची मंडळी येणाऱ्य़ा भविष्यासाठी ठोस निर्णय घेणार आहेत. कामाच्या ठिकाणी हाती घेतलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात तुम्हाला या आठड्यात यश मिळेल. कोणत्या प्रकल्पावर तुम्ही जर मेहनत घेतली असाल तर ती फळाला येणार आहे. आर्थिक बाबतीत देखील तुमची परिस्थिती सकारात्मक असणार आहे. घराच्या बाबातीत चांगली बातमी मिळेल. घर नव्याने सजवण्याबाबत विचार करताना खर्चाचा ताळमेळ साधावा असं अंकशास्त्र सांगतं.
करिअरच्या बाबातील नव्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी आधी घेतलेल्या मेहनतीला यश मिळणार आहे. 2 मुलांकांचा स्वामी चंद्र देव आहेत. ही मंडळी भावनिक असल्याने नात्यातील ताण यांना झेपत नाही. प्रेम प्रकरणात हा आठवडा तारेवरची कसरत आहे. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. रोज सकाळी ओम सोमाय नम: या मंत्राचा जप केल्याने मानसिक स्वास्थ काहीसं ठीक राहील.
आठवड्याची सुरुवात करिअरमध्ये सकारात्मक बदल घेऊन आले आहेत. कामाच्या ठिकाणी सुधारणा दिसेल. वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल होतील. प्रेम जीवनात सुधारणा जाणवेल. मानसिक स्थिती चांगली राहील. खर्चावर नियंत्रण ठेवल्य़ास फायदेशीर राहिल. मात्र आठवड्याच्या शेवटी कोणत्यातरी कारणाने तुम्ही नाराज होण्याची शक्यता जास्त आहे.
पैशांच्या बाबतीत हा आठवडा चांगल्या घटना घेऊन येणार आहे. करिअरमध्ये नव्या संधी निर्माण होत असून त्या आर्थिक लाभ मिळवून देतील. प्रेम जीवनात स्थिती अनुकूल राहील. जोडीदाराशी मोकळेपणाने केलेला संवादाने नातं अधिक घट्ट होईल. कामाच्या ठिकाणी सहकारी वर्गापासून सावध राहा.
कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. गुंतवणूक करताना विचार करावा. प्रेम जीवनात जोडीदाराबरोबर वेळ घालवल्याने मानसिक स्वास्थ चांगलं राहील. जोडीदाराबरोबर झालेल्या गप्पांमधून नातं अधिक घट्ट होईल. मुलांच्या संबंधित चांगली बातमी कानावर येईल.
प्रगतीसाठी हा काळ उत्तम राहील. आर्थिक बाबतीत चढ उतार पाहायला मिळतील. प्रेमजीवनात सकारात्मकता दिसून येईल. क्रिएटिव्हीटी फिल्डमध्ये असलेल्यांना हा काळात प्रगतीचा आहे. स्वत:सिद्ध करण्यात वेळ खर्च कराल.
या लोकांसाठी जानेवारीचा हा आठवडा सकारात्मक राहील. व्यवसायात पदोन्नती होईल. आर्थिक बाबींमध्ये चांगले परिणाम दिसून येतील. आठवड्याच्या शेवटी मनशांती लाभेल.
मूलांक 8
आठवड्याच्या सुरुवातीलाच करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. हा काळ धनसंपत्ती वृद्धिंगत करणारा आहे. प्रेमजीवन सकारात्मक राहील. मात्र आठवड्याच्या शेवटी तणावाने मन अस्वस्थ होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






