Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saptashrungi Devi: काय आहे सप्तश्रृंगी देवीचा महिमा आणि कथा, जाणून घ्या

सप्तश्रृंगी हा गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची आराध्यदैवत असलेल्या सप्तश्रृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. सप्तश्रृंगी देवीचा महिमा आणि कथा सविस्तर जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 06, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • सप्तश्रृंगी देवीचे मंदिर कुठे आहे
  • सप्तश्रृंगी देवीचा महिमा काय आहे
  • सप्तश्रृंगी देवीची कथा
 

सप्तश्रृंगी देवी (वणी, नाशिक) ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक ‘अर्धपीठ’ असलेली स्वयंभू माता आहे. सह्याद्रीच्या सात शिखरांवर वसलेले हे जागृत दैवत १८ हातांची महिषासुर मर्दिनी म्हणून प्रसिद्ध आहे.  सप्तश्रृंगी देवीचा महिमा आणि कथा सविस्तर जाणून घेऊया.

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणजेच सप्तश्रृंगी देवीच मंदिर. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वणी जवळील डोंगरावरती सप्तश्रृंगी देवीच मंदिर आहे. सात उंच डोंगराच्या मध्ये हे मंदिर असल्यामुळे देवीला सप्तश्रृंगी माता असे नाव पडले. सप्त म्हणजे सात आणि श्रृंग म्हणजे डोंगराची शिखरे. देवीची मूर्ती 8 फूट उंच असून ही डोंगराच्या खोड्यात कोरलेली आहे. देवीच्या 18 हातामध्ये त्रिशूळ, चक्र, तलवार, धनुष्यबाण अशी अनेक शस्त्र आहेत. या देवीला कुंकू आणि साडी अर्पण करण्याची प्रथा आहे.

Shani ast 2026: मार्चमध्ये शनिचा खास बदल; 76 दिवसांनी मीन राशीतून अस्त होण्याने या राशीच्या लोकांना होणार लाभ

सप्तश्रृंगी देवीची कथा

एकदा पृथ्वीवरती राक्षसांचा अत्याचार खूप वाढला होता. महिषासूर आणि इतर राक्षसांनी देव, ऋषी आणि सामान्य लोकांना त्रास देणं सुरू केलं. त्यांच्या या अत्याचारामुळे सर्वच देवता चिंतेत पडल्या. तेव्हा देवांनी आदिशक्तीची प्रार्थना केली. देवकांच्या तेजापासून एक दिव्य शक्ती प्रकट झाली ती म्हणजे देवी दुर्गा. देवीने भयंकर आणि तेजस्वी रूप धारण केलं तिच्या 18 हातामध्ये विविध शस्त्र होती. त्रिशूळ, चक्र, तलवार, धनुष्यबाण अशी अनेक अस्त्रे. देवीने राक्षसांवरती प्रचंड आक्रमण केलं. महिषासूर आणि इतर राक्षसांची तिचे भयंकर युद्ध झाले. अनेक दिवस चाललेल्या या युद्धानंतर देवीने राक्षसांचा पराभव केला आणि पृथ्वीला त्यांच्या अत्याचारातून मुक्त केले.

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनानंतर का सोडतात उपवास? काय आहे यामागे शास्त्र

युद्ध संपल्यानंतर देवी एका उंच पर्वतावर येऊन स्थिरावली. सात उंच शिखरांनी वेढलेल्या त्या पर्वतावरती देवीचं तेजस्वी रुप प्रकट झालं. या पर्वताला सप्तश्रृंग पर्वत असं नाव पडलं आणि तेथील देवी सप्तश्रृंगी माता म्हणून प्रसिद्ध झाली. तेव्हापासून सप्तश्रृंगी माता भक्ताचं रक्षण करते, त्यांच्या संकटांचा नाश करते आणि मनापासून प्रार्थना करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते, अशी ही श्रद्धा लोकांमध्ये आहे त्यामुळे आजही हजारो भक्त त्या पर्वतावर जाऊन मातेचं दर्शन घेतात आणि तिची मनोभावे पूजा करतात. सप्तश्रृंगी माता ही भक्तांना शक्ती, धैर्य आणि संरक्षण देणारी देवी मानली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो लोकांची तिच्यावरती अढळ अशी श्रद्धा आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सप्तश्रृंगी देवी कोण आहे?

    Ans: सप्तश्रृंगी देवी ही देवी दुर्गेचे एक शक्तिरूप मानले जाते. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगगडावर तिचे प्रसिद्ध मंदिर आहे. देवीला अठरा हात असून प्रत्येक हातात वेगवेगळी अस्त्रे आहेत, ज्यामुळे ती शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक मानली जाते.

  • Que: सप्तश्रृंगी देवीला शक्तिपीठ का मानले जाते?

    Ans: पौराणिक कथेनुसार, सतीदेवीच्या शरीराचे काही अवयव पृथ्वीवर विविध ठिकाणी पडले. त्या ठिकाणांना शक्तिपीठ म्हणतात. सप्तश्रृंगगडावर देवीचे एक पवित्र स्थान असल्यामुळे ते शक्तिपीठ मानले जाते.

  • Que: सप्तश्रृंगी देवीचा महिमा काय आहे?

    Ans: भाविकांच्या श्रद्धेनुसार, देवी सप्तश्रृंगी भक्तांच्या संकटांचे निवारण करते आणि त्यांना धैर्य, यश व समृद्धी प्रदान करते. त्यामुळे अनेक लोक मनोकामना पूर्ण झाल्यानंतर देवीचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात.

Web Title: Saptashrungi devi know the significance glory and mythological story of the goddes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Religion

संबंधित बातम्या

Ashadha Amavasya: कधी आहे आषाढ अमावस्या, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि पितृपूजेचे महत्त्व
1

Ashadha Amavasya: कधी आहे आषाढ अमावस्या, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि पितृपूजेचे महत्त्व

Shravan 2026: 13 ऑगस्टपासून सुरू होतो श्रावण; 4 सोमवारांचे धार्मिक महत्त्व आणि शिवमूठ अर्पण करण्याची परंपरा
2

Shravan 2026: 13 ऑगस्टपासून सुरू होतो श्रावण; 4 सोमवारांचे धार्मिक महत्त्व आणि शिवमूठ अर्पण करण्याची परंपरा

Guru Charitra: श्री गुरुचरित्रात एकूण किती अध्याय आहेत? जाणून घ्या ग्रंथाचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये
3

Guru Charitra: श्री गुरुचरित्रात एकूण किती अध्याय आहेत? जाणून घ्या ग्रंथाचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये

Sai Baba Story: दातोबांच्या दुःखामागील कारण काय होते? जाणून घ्या साईबाबांची प्रेरणादायी कथा
4

Sai Baba Story: दातोबांच्या दुःखामागील कारण काय होते? जाणून घ्या साईबाबांची प्रेरणादायी कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.