Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chaitra Amavasya: अमावस्या का मानली जाते अशुभ? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे

अमावस्येच्या दिवसाची भीती अनेकांच्या मनात घर करून असते. आज शुक्रवार, 17 एप्रिल रोजी चैत्र अमावस्या आहे. त्यामुळे कोणतेही शुभ काम करू नये, असा नकारात्मक सूरच उमटत असतो. अमावस्येला शुभ कामे का करत नाही जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 17, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • चैत्र अमावस्या कधी आहे
  • अमावस्येला काय करू नये
  • अमावस्या अशुभ का मानली जाते
 

हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात अमावस्येला ‘निषिद्ध’ किंवा अशुभ मानण्यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही, ज्यामुळे ऊर्जेचे संतुलन बदलते. अमावस्येला निषिद्ध मानण्याची पद्धत आहे. या मागे धर्मशास्त्र काय सांगते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया

अमावसस्या निषिद्ध मानण्यामागील मुख्य कारणे

नकारात्मक ऊर्जा आणि मानसिक अस्थिरता

अमावस्येला चंद्राचा अस्त होतो, ज्याचा थेट परिणाम मानवी मनावर होतो. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक मानले जाते. या दिवशी मन कमकुवत आणि नकारात्मक विचारांनी भरलेले असू शकते, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय किंवा नवीन कामे टाळली जातात. तसेच अतृप्त आत्म्यांचा प्रभाव असतो. धार्मिक समजुतीनुसार, या दिवशी अतृप्त आत्मे किंवा नकारात्मक शक्ती सक्रिय असतात, ज्यामुळे मानसिक भीती किंवा अशुभ घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे यादिवशी शक्यतो शुभ कार्य करणे टाळावेत. अमावस्या ही तामसिक ऊर्जा किंवा काळ्या जादूशी संबंधित मानली जाते, म्हणून या दिवशी पूजा, दान आणि आध्यात्मिक चिंतनावर भर दिला जातो, न की भौतिक कामांवर असतो.

या दिवशी चंद्राच्या कमी गुरुत्वाकर्षणामुळे शरीरातील पाणी आणि मन यात असंतुलन निर्माण होऊ शकते. त्यामुळे या दिवशी उपवास करणे किंवा हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो, मांस-मासे किंवा तामासिक पदार्थ टाळले जातात.

Chaitra Amavasya: चैत्र अमावस्येच्या दिवशी या राशींच्या लोकांनी राहावे सावध, आरोग्य, संपत्ती आणि नातेसंबंधांना बसू शकतो फटका

शुभ कार्य का करू नयेत

अमावस्येला शक्यतो कोणतेही शुभ काम करू नये असेच सांगितले जाते. नवीन घर घेणे, गृहप्रवेश करणे, लग्न करणे,
लग्नाची बोलणी, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा महत्त्वाच्या प्रवासाला सुरुवात करणे या दिवशी टाळले जाते, कारण त्या कामांमध्ये नैराश्य किंवा अपयश येण्याची भीती असते. त्यामुळे शक्यतो या दिवशी टाळावे.

अमावस्येचा दिवस हा ‘आंतरिक शुद्धी’ आणि ‘स्थिरतेचा’ आहे, ‘अति-उपभोगाचा’ किंवा नवीन कार्यारंभाचा नाही, म्हणून अनेक गोष्टी निषिद्ध मानल्या जातात. अतृप्त आत्मे मानवी शरीरात प्रवेश करतात? भूतडी अमावस्येला असतात असे मानले जाते.

Chaitra Amavasya: चैत्र अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, पूर्वजांच्या शापातून होईल मुक्ती

अमावस्या उपवास, अमावस्या व्रताचे फायदे

हिंदू मान्यतेनुसार, या दिवशी तुळशीची पाने तोडणे पाप मानले जाते. असे मानले जाते की, चंद्राच्या कमी गुरुत्वाकर्षणामुळे अमावस्येच्या दिवशी मांस, माशांची अंडी यांस निषिद्ध मानले आहे. यामागे असेही सांगितले की, अमावस्येला काहीवेळा वातावरण ही दुषित असतो. त्यामुळे हलका आहार घ्यावा. तसेच अमावस्येच्या दिवशी टाळण्यासारख्या गोष्टी भौतिक सुखाचे अतिरेक टाळा अमावस्येच्या दिवशी अति खाणे, गरजेपेक्षा जास्त खरेदी करणे किंवा चैनीच्या गोष्टींमध्ये रमणे योग्य मानले जात नाही. हा दिवस साधेपणा आणि तटस्थ असावा. अमावस्येच्या दिवशी दारू खरेदी करणे किंवा तिचे सेवन करणे टाळावे . मद्यपानामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, जी व्यक्तीला आणि कुटुंबाला दीर्घकाळ त्रास देऊ शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमावस्या अशुभ का मानली जाते?

    Ans: हिंदू धर्मानुसार अमावस्येला चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो, त्यामुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. म्हणून या दिवशी शुभ कार्य टाळले जाते.

  • Que: चैत्र अमावस्येला धार्मिकदृष्ट्या काय महत्त्व आहे?

    Ans: चैत्र अमावस्या पितृपूजा, तर्पण आणि दानधर्मासाठी विशेष मानली जाते. या दिवशी केलेले श्राद्ध पितरांना शांती देते अशी श्रद्धा आहे.

  • Que: अमावस्या नेहमीच अशुभ असते का?

    Ans: नाही. प्रत्येक अमावस्येचे वेगळे धार्मिक महत्त्व असते. काही अमावस्या विशेष पूजेसाठी आणि साधनेसाठी अत्यंत शुभ मानल्या जातात.

Web Title: Chaitra amavasya what are the religious and scientific reasons why it is considered inauspicious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Gajalakshmi Rajyog: गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, या राशींच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी
1

Gajalakshmi Rajyog: गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, या राशींच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी

Agni Purana: अग्निपुराणातील प्रमुख कथा आणि धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या महापुराणाची वैशिष्ट्ये
2

Agni Purana: अग्निपुराणातील प्रमुख कथा आणि धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या महापुराणाची वैशिष्ट्ये

आद्य शंकराचार्यांनी प्रतिष्ठापित केलेली ज्ञानाची अधिष्ठात्री देवी, जाणून घ्या इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्व
3

आद्य शंकराचार्यांनी प्रतिष्ठापित केलेली ज्ञानाची अधिष्ठात्री देवी, जाणून घ्या इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्व

Yogeshwari Devi: आदिशक्तीचे पवित्र स्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी, जाणून घ्या या देवीचा इतिहास
4

Yogeshwari Devi: आदिशक्तीचे पवित्र स्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी, जाणून घ्या या देवीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.