Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chaitra Purnima: चैत्र पौर्णिमा नेमकी कधी आहे? जाणून घ्या स्नान दान करण्याचा मुहूर्त

चैत्र पौर्णिमा गुरुवार, 2 एप्रिल रोजी आहे त्या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्थान दान करण्यासाठी काय मुहूर्त आहेत ते जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 29, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • चैत्र पौर्णिमा कधी आहे
  • चैत्र पौर्णिमेला स्नान दान करण्यासाठी मुहूर्त
  • चैत्र पौर्णिमेचे महत्त्व
 

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला चैत्र पौर्णिमा म्हणतात. या दिवशी स्नान, दान आणि व्रताला विशेष महत्त्व आहे. मात्र यावेळी चैत्र पौर्णिमा 1 एप्रिल आणि 2 एप्रिल या दोन्हीही दिवशी येत आहे. अशावेळी प्रश्न पडतो की चैत्र पौर्णिमेचे व्रत आणि स्नान दान कधी करावे. यासाठी पंचांगाची मदत घेणे गरजेचे आहे. पंचांगानुसार ज्यावेळी सूर्योदय होईल त्यावेळी स्नान आणि दान केले जाईल. तसेच ज्यावेळी चंद्रोदय होईल त्यावेळी हे पाळले जाईल.

चैत्र पौर्णिमा कधी आहे

पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा बुधवार 1 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी सुरू होऊन गुरुवार 2 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजून 41 मिनिटांपर्यंत असणार आहे.

सूर्योदयाची वेळ आणि स्नान दान

चैत्र पौर्णिमा बुधवार 1 एप्रिल रोजी सूर्योदय 6.11 वाजल्यापासून सुरू होत आहे. तर 2 एप्रिल रोजी सूर्योदय 6 वाजून 10 मिनिटांनी होईल. उद्यतिथीनुसार स्नान दान 2 एप्रिल रोजी केले जाईल आणि याच दिवशी चैत्र पौर्णिमा असेल.

Kamada Ekadashi: एकादशीच्या दिवशी पांडुरंगाष्टकम पठण का करतात? काय सांगतात आद्य शंकराचार्य जाणून घ्या

मुहूर्त आणि शुभ वेळ

चैत्र पौर्णिमा गुरुवार 2 एप्रिल रोजी ब्रह्म मुहूर्त 04:38 ते 05:24 वाजेपर्यंत असेल. ही वेळ स्नानासाठी उत्तम असेल. यावेळेत स्नान करता आले नाही तर सूर्योदयानंतर करावे . चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सत्यनारायणाची पूजा केली जाते. या दिवशी पूजेसाठी मुहूर्त सकाळी 06:11 ते 09:18 वाजेपर्यंत असेल. प्रदोष काळात सूर्यास्त 06:39 वाजल्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा केली जाईल. त्यानंतर रात्री चंद्राची पूजा करून त्याला अर्घ्य दिले जाईल.

शुभ योग

बुधवार, 1 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत. यावेळी रवि योग सकाळी 06:11 ते 16:17 वाजेपर्यंत असेल त्यानंतर सर्वार्थ सिद्धि योग संध्याकाळी 16:17 वाजल्यापासून 2 एप्रिल रोजी सकाळी 06:10 वाजेपर्यंत असेल. वृद्धि योग पहाटेपासून 14:51 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर ध्रुव योग राहील.

Jejuri Temple and Kadepathar: येलकोट येलकोट जय मल्हार! जेजुरी आणि कडेपठारची जाणून घेऊया अद्भुत कथा

चैत्र पौर्णिमेचे महत्व

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने कुटुंबामध्ये सुख-समृद्धी येते. देवी लक्ष्मीची पूजा केल्याने दारिद्र्य आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि संपत्तीमध्ये वाढ होते. रात्री चंद्राची पूजा केल्याने आणि अर्घ्य अर्पण केल्याने मजबूत होते आणि कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो. चैत्र पौर्णिमेला स्नान आणि दान केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्याची प्राप्ती होते. स्नान झाल्यानंतर पितरांसाठी तर्पण आणि दान केले पाहिजे. ज्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चैत्र पौर्णिमा कधी आहे

    Ans: चैत्र पौर्णिमा गुरुवार, 2 एप्रिल रोजी आहे

  • Que: चैत्र पौर्णिमेला स्नान-दान का महत्त्वाचे असते?

    Ans: या दिवशी पवित्र स्नान (तीर्थस्नान) आणि दान केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.

  • Que: चैत्र पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व काय आहे

    Ans: ही तिथी अध्यात्मिक उन्नती, शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते.

Web Title: Chaitra purnima 2026 what is the auspicious time to take a bath on chaitra purnima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय
1

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष
2

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी
3

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी

Sankashti Chaturthi 2026: भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ
4

Sankashti Chaturthi 2026: भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.