Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chanakya Niti: नात्यांमध्ये फसवणूक टाळायची असेल तर ओळखा स्वार्थी लोकांची लक्षणे

चाणक्याच्या मते, अति खुशामत करणे, केवळ गरजेपुरतेच संपर्क साधणे आणि इतरांविषयी वाईट बोलणे ही स्वार्थी लोकांची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे मानले जाते. ही लक्षणे वेळेवर ओळखल्यास मोठी फसवणूक आणि नुकसान टाळता येऊ शकते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 04, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नात्यांमध्ये फसवणूक टाळायची असेल तर ओळखा स्वार्थी लोकांची लक्षणे
  • स्वार्थी लोकांची लक्षणे कोणती
  • नीतीशास्त्रात नातेसंबंधाबाबात काय सांगितले आहे
 

कधीकधी जीवनातील सर्वात मोठे नुकसान शत्रूकडून नाही, तर आपल्या विश्वासू आणि जवळच्या लोकांकडूनच होते. मैत्री, नातेसंबंध किंवा कामाच्या ठिकाणी, आपल्याला अनेकदा असे लोक भेटतात जे गरजेच्या वेळी खूप जवळचे वाटतात, पण जसजसा वेळ जातो तसतसे त्यांचे खरे स्वरूप उघड होते. चाणक्यांनी, स्वार्थी आणि स्वतःचा फायदा पाहणाऱ्या लोकांना ओळखण्याबद्दल त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहे. नात्यांमध्ये फसवणूक टाळायची असल्यास स्वार्थी लोकांची ही लक्षणे जाणून घ्या

अति गोड असणारी लोक

चाणक्य नीतीनुसार, जो व्यक्ती तुमची गरजेपेक्षा जास्त स्तुती करते किंवा सतत कौतुकाचा वर्षाव करते आणि अनेकदा आपले खरे हेतू लपवण्यासाठी गोड शब्दांचा वापर करते, अशा व्यक्तीपासून तुम्ही सावध राहिले पाहिजे. अगदी वास्तविक जीवनातही, काही लोक तुमच्याकडून काहीतरी मिळवण्याच्या अपेक्षेनेच तुमची स्तुती करू लागतात. त्यांचे शब्द गोड असतात, पण त्यात प्रामाणिकपणा नसतो. चाणक्याच्या मते, खरा हितचिंतक तुमचे सामर्थ्य तसेच तुमचे दोषही दाखवून देतो, तर स्वार्थी व्यक्ती केवळ खुशामत करते.

Chanakya Niti: मनावर नियंत्रण नसल्यास वाढतात अडचणी; चाणक्यांनी सांगितली माणसाची विचारशक्ती कमकुवत होण्याची कारणे

प्रशंसा आणि खुशामत यामधील फरक

प्रत्येक प्रशंसा चुकीची नसते, पण जेव्हा एखाद्याचे शब्द अतिशय कृत्रिम वाटतात, तेव्हा तुम्ही सावध व्हायला हवे. कधीकधी हे गोड शब्द पुढे जाऊन गंभीर विश्वासघाताला कारणीभूत ठरू शकतात.

गरज असल्यास संपर्क साधणे

स्वार्थी लोकांचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्यांचे वर्तन. त्यांना तुमची गरज असल्याशिवाय ते संपर्कात राहत नाहीत. काही काम निघाल्याबरोबर त्यांचे वागणे अचानक अत्यंत मैत्रीपूर्ण बनते. तुम्हाला असे लोक भेटले असतील जे महिनोन् महिने तुमची विचारपूस करत नाहीत, पण जेव्हा त्यांना शिफारस, आर्थिक मदत किंवा वैयक्तिक कामाची गरज असते, तेव्हा तेच तुम्हाला सर्वात आधी फोन करतात. एकदा काम पूर्ण झाले की, त्यांचा संपर्क पुन्हा कमी होतो.

नात्यामधील संतुलनाचा अभाव

नातेसंबंधांमध्ये दोन्ही बाजूंनी संवाद आणि सहकार्य असणे आवश्यक असते. जर एखादी व्यक्ती नेहमी फक्त घेण्याचाच प्रयत्न करत असेल आणि बदल्यात कधीच काही देत ​​नसेल, तर ते स्वार्थीपणाचे लक्षण असू शकते.

इतरांबद्दल वाईट बोलणे

चाणक्य नीतीनुसार, तुमच्यासमोर सतत इतरांवर टीका करणाऱ्या व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. असे लोक अनेकदा परिस्थितीनुसार आपले शब्द बदलतात. ते एका व्यक्तीवर दुसऱ्या व्यक्तीसमोर टीका करू शकतात आणि मग पहिल्या व्यक्तीवर तिसऱ्या व्यक्तीसमोर टीका करू शकतात. संबंध दृढ करणे हा त्यांचा उद्देश नसून वैयक्तिक फायदा मिळवणे हा असतो. असे लोक अनेकदा संघर्ष आणि गैरसमज निर्माण करतात.

Chanakya Niti: दिवसरात्र मेहनत करूनही जीवनात प्रगती का होत नाही? काय सांगते चाणक्य नीती

विश्वासू व्यक्ती ओळखणे

विश्वासू लोक आजूबाजूला नसतानाही इतरांचा आदर करतात. जर एखादी व्यक्ती सतत दुसऱ्यावर टीका करत असेल, तर त्यातून तिच्या चारित्र्याबद्दल बरेच काही कळते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चाणक्य नीतीनुसार स्वार्थी व्यक्ती कोणाला म्हणतात?

    Ans: जी व्यक्ती केवळ स्वतःच्या फायद्यासाठी नाती जपते आणि गरज संपल्यावर दूर जाते, तिला स्वार्थी व्यक्ती मानले जाते.

  • Que: स्वार्थी व्यक्तींची बोलण्याची पद्धत कशी असते?

    Ans: ते गोड बोलतात, पण त्यांच्या कृतींमध्ये प्रामाणिकपणा आणि निष्ठा दिसून येत नाही.

  • Que: स्वार्थी लोक इतरांच्या यशाकडे कसे पाहतात

    Ans: अनेकदा ते इतरांच्या यशाचा हेवा करतात किंवा त्यातून स्वतःचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात.

Web Title: Chanakya niti how to identify selfish people what are the symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Chanakya Niti
  • dharm
  • Religion

संबंधित बातम्या

Hindu Puja Rituals: पूजा करताना उभे राहावे की बसावे? आराधनेची योग्य पद्धत आणि शास्त्रातील नियम जाणून घ्या
1

Hindu Puja Rituals: पूजा करताना उभे राहावे की बसावे? आराधनेची योग्य पद्धत आणि शास्त्रातील नियम जाणून घ्या

Mirgajin: मृगाजिनाला हिंदू धर्मात पवित्र का मानले जाते? जाणून घ्या यामागचं आध्यात्मिक महत्त्व
2

Mirgajin: मृगाजिनाला हिंदू धर्मात पवित्र का मानले जाते? जाणून घ्या यामागचं आध्यात्मिक महत्त्व

Hindu Puja Rituals: नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्यामागे आहे मोठं आध्यात्मिक महत्त्व; जाणून घ्या खास कारण
3

Hindu Puja Rituals: नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्यामागे आहे मोठं आध्यात्मिक महत्त्व; जाणून घ्या खास कारण

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व
4

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.