फोटो सौजन्य- pinterest
आज सर्वत्र दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे. यावेळी चंद्र आपल्या राशीत बदल करणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांची प्रलंबित कामे आज पूर्ण होऊ शकतात. तसेच या संक्रमणाचा 3 राशीच्या लोकांना फायदा होईल तर काहींना समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
आज गुरुवार, 24 जुलै रोजी आषाढ अमावस्या आहे. या आषाढ महिन्याच्या अमावस्या तिथीला दीप अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी महादेवांसोबत दिव्यांची पूजा केली जाते. या आज या अमावस्येच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील जुळून येत असल्याने आजचा दिवस अधिकच चांगला असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारचा दिवस खूप खास असतो कारण चंद्र मन, विचार आणि मानसिक स्थिती देणारा प्रतीक असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्याचे कर्क राशीत होणारे संक्रमण चांगले मानले जाते.
चंद्र आता मिथुन राशीत आहे. आज सकाळी तो 10.58 वाजता चंद्र कर्क राशीमध्ये संक्रमण करणार आहे आणि शनिवार, 26 जुलैपर्यंत तो कर्क राशीमध्ये दुपारी 3.51 पर्यंत राहील. अमावस्येच्या दिवशी चंद्राच्या संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांचे नशीब बदलणार आहे, जाणून घ्या
मिथुन राशीतून चंद्र कर्क राशीत प्रवेश करत असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी काळ खूप चांगला असणार आहे. नवविवाहित जोडप्यांना संततीचा आनंद मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही वेळेवर पूर्ण कराल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यावसायिकांना नवीन प्रकल्प मिळू शकतात. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.
अमावस्येच्या दिवशी चंद्राचे कर्क राशीमध्ये होणारे संक्रमण या लोकांसाठी चांगले असणार आहे. मात्र विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. परिक्षेत विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील. लहान गुंतवणुकीतून नफा मिळू लागेल. या लोकांवर असलेले आर्थिक संकट आज दूर होईल. जर कोणाला जुने आजार असतील तर ते दूर होतील. ज्यो लोकांना नोकरी बदलायची आहे त्यांना यश मिळेल आणि नोकरीच्या नवीन संधी मिळतील.
मिथुन आणि कर्क राशींसोबतच सिंह राशीच्या लोकांनाही अमावस्येच्या दिवशी चंद्राच्या होणाऱ्या हालचालींचा फायदा होणार आहे. या लोकांना सर्जनशील कामात यश मिळेल. तरुणांना मानसिक शांती मिळेल. विवाहित लोकांच्या प्रेमसंबंधात सुधारणा दिसून येईल. व्यावसायिकांना व्यवसायामध्ये स्थिरता राहील. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करु शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)