फोटो सौजन्य- istock
आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हटले जाते. यावेळी ही अमावस्या आज गुरुवार, 24 जुलै साजरी केली जाणार आहे. या दिवशी दिव्यांची आरास करुन त्याची पूजा केली जाते. आजच्या या अमावस्येच्या दिवशी पुष्य नक्षत्र आल्याने गुरु पुष्यामृत योग देखील तयार होत आहे. हा योग सोन्याची खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो. असे म्हटले जाते की, या योगामध्ये सोने खरेदी करणे ही वृद्धिंगत होणारी असते, म्हणजे त्यात वाढ होत जाते. मात्र अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की अमावस्येच्या वेळी सोनं खरेदी करणे योग्य आहे का? सोने खरेदी करण्यासारखे शुभ कार्य अमावस्येच्या दिवशी करावे का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
गुरु पुष्यामृत योग कायमस्वरूपी प्रगतीसाठी शुभ मानला जातो. या योगामध्ये सोने, वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच या दिवशी स्नान आणि दान केल्याने पापांचा नाश होतो आणि सौभाग्य प्राप्त होते. अशी देखील मान्यता आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, अमावस्या तिथी ही अशुभ मानली जात नाही. त्याउलट आपण बघायला गेलो तर आपण दिवाळीमध्ये आश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन करतो. त्याचप्रमाणे पौर्णिमा अमावस्या या देवी लक्ष्मीच्या आवडत्या तिथी मानल्या जातात. त्यामुळे देवीला मंगळवार आणि शुक्रवार हे वार देखील प्रिय असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे अमावस्या अशुभ आहे असे म्हणणे योग्य ठरत नाही. मान्यतेनुसार, दीप अमावस्येला दिव्यांची पूजा केल्याने अज्ञान, आळस, अंधश्रद्धेचा अंधार घालवणारी असल्याचे देखील म्हटले जाते.
गुरुपुष्यामृत योगाची सुरुवात आज 24 जुलै रोजी संध्याकाळी 4.43 पासून होत आहे. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. यावेली पुष्य नक्षत्र असल्यामुळे गुरु पुष्प योग तयार होत आहे. गुरुपुष्यामृत योग शुक्रवार, 25 जुलै सकाळी 6.15 वाजेपर्यंत असेल. तर अमावस्येची समाप्ती रात्री 12.40 वाजता होणार आहे. त्यामुळे आज पूर्ण दिवसभरात कधीही सोने किंवा वाहन खरेदी करु शकता. सोने खरेदी करण्यासाठी अमृत काळ दुपारी 3 वाजून 5 मिनिटांपासून सुरु होत आहे आणि या योगाची समाप्ती संध्याकाळी 5 वाजून 3 मिनिटांनी होईल.
गुरु पुष्पामृत योगामध्ये कोणाला नवीन व्यवसायाची सुरुवात करणे, एखाद्या योजनेत किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे इत्यादी कामे करणे शुभ मानले जाते.
त्याचसोबत या काळामध्ये सोने, चांदी, वाहन या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे.
यावेळी वाहन खरेदी करण्यासोबतच कोणतीही मालमत्ता खरेदी केल्याने प्रगती होते.
गुरु पुष्पामृत योगामध्ये ज्या लोकांना नवीन नोकरी मिळते किंवा एखाद्या महत्त्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करणे शुभ मानले जाते.
या सर्वांसोबतच या योगामध्ये दान, यज्ञ, पूजा, पाठ, पूर्वजांचे कार्य, मंत्रांचा जप इत्यादी करणे देखील शुभ मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)