
फोटो सौजन्य- pinterest
2025 च्या वर्षातील शेवटची एकादशी मंगळवार, 30 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मानुसार या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची विधिवत पूजा अर्चना केल्याने व्यक्तीला अपेक्षित यश मिळते. पुत्रदा एकादशीचे व्रत वर्षातून दोन वेळा पाळले जाते. पहिले व्रत श्रावण महिन्यात आणि दुसरे पौष महिन्यात. हिंदू पंचांगानुसार पौष महिना 10 महिना आहे. जो डिसेंबर आणि जानेवारीच्यामध्ये येतो.
श्रद्धेनुसार जी व्यक्ती पुत्रदा एकादशीचे व्रत करते त्या व्यक्तीला अपत्यप्राप्तीसाठी येणाऱ्या समस्या दूर होतात. तसेच मुलांना दीर्घायुष्य लाभते. एकाशीच्या दिवशी विधिपूर्वक पूजा करण्यासोबतच भगवान विष्णूना या गोष्टी नक्की अर्पण करा. या गोष्टी अर्पण केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी आणि सोभाग्यचा आशीर्वाद मिळतो. सोबतच कुटुंबावर विष्णूचा आशीर्वाद राहतो. कोणत्या गोष्टी अर्पण कराव्या जाणून घ्या
पंचांगानुसार, पौष महिन्यात पौष पुत्रदा एकादशीचे व्रत मंगळवार, 30 डिसेंबर रोजी पाळले जाणार आहे. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात मंगळवार, 30 डिसेंबर रोजी सकाळी 7.50 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती बुधवार, 31 डिसेंबर रोजी सकाळी 5.00 होईल.
एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीचा समावेश करावा. तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते, म्हणून नैवेद्यामध्ये देखील तुळशीचा समावेश नक्की करा. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडली जात नाही, त्यामुळे एकादशीच्या पूर्वी तुळशीची पाने काढून घ्या. एकादशीला तुळशीला स्पर्श करू नका किंवा पाणी अर्पण करू नका.
पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना केळी अर्पण करा. केळी अर्पण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. यामुळे तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
भगवान विष्णूंना पंचामृत अर्पण करा. पंचामृत दूध, दही, तूप, मीठ आणि साखरेपासून बनवले जाते. पंचामृतात तुळशीची पाने अवश्य घाला.
पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना हंगामी फळे अर्पण करा. हंगामी फळांव्यतिरिक्त, आंबा, अननस, सफरचंद आणि इतर वस्तू अर्पण करा.
भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप आवडतो. म्हणून एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले आणि हार अर्पण करा. पिवळी फुले अर्पण केल्याने भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होते, असे मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: पुत्रदा एकादशी हा भगवान विष्णूंना समर्पित पवित्र दिवस असून या दिवशी व्रत केल्याने संतानसुख, कुटुंबीय आनंद आणि पापक्षय होतो, अशी धार्मिक मान्यता आहे.
Ans: तुळशीची पाने, पिवळी फुले, केळी, पंचामृत, तुपाचा दिवा या वस्तू अर्पण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात.
Ans: तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान अर्पण केल्यास पूजेचे फल अनेक पटींनी वाढते.