
फोटो सौजन्य- pinterest
नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, नवीन वर्षातील बहुतेक दिवस महत्त्वाचे असतात कारण एक ना एक दिवशी काही मोठी ज्योतिषीय घटना घडत असते. पंचांगानुसार, नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मन, आनंद, वाणी, आईशी असलेले नाते आणि मानसिक स्थिती यासाठी जबाबदार असलेल्या ‘चंद्र’ ग्रहाचे पहिले राशी संक्रमण होत आहे. शुक्रवार, 2 जानेवारी रोजी चंद्र वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये संक्रमण केले आहे. हे संक्रमण शुक्रवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास झाले आहे. चंद्राच्या संक्रमणाचा परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार आहे ते जाणून घ्या
नवीन वर्षाच्या सुरुवातीला चंद्राच्या संक्रमणाच्या सकारात्मक प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांच्या प्रगती होईल. जर तुम्ही तुमचे मन आणि आत्मा कोणत्याही कामात गुंतवले तर यश मिळण्याची शक्यता जास्त असते. या काळात तुम्ही मित्राच्या मदतीने अडकलेले पैसे परत मिळवू शकता. नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल. आरोग्य सामान्य राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. या काळात तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला चंद्राच्या संक्रमणामुळे धनु राशीच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जर कामाच्या ठिकाणी तुमचा सहकाऱ्याशी वाद होत असेल तर ते मतभेद दूर होतील. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनी जर त्यांच्या कामाला प्राधान्य दिले तर त्यांना नक्कीच चांगले परिणाम मिळतील. नातेसंबंध चांगले राहतील. जर तुम्ही तुमच्या आहारात निरोगी पदार्थांचा समावेश केला तरच तुमचे आरोग्य सुधारेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या काळात तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
मेष आणि धनु राशींव्यतिरिक्त, कुंभ राशीच्या लोकांना चंद्राच्या संक्रमणाचा सकारात्मक राहणार आहे. व्यवसाय हळूहळू नफा मिळवू लागेल, तर त्याचा विस्तारही होईल. हा काळात नोकरी करणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत सुरू असलेले वाद संपतील. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहतील. जानेवारीमध्ये त्यात फारशी घट होणार नाही. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: चंद्र जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्याला चंद्र गोचर म्हणतात. चंद्र सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह असून तो साधारण अडीच दिवसांत रास बदलतो.
Ans: वर्षाच्या सुरुवातीलाच चंद्र गोचर होत असल्याने त्याचा मानसिकता, निर्णयक्षमता आणि दैनंदिन घडामोडींवर प्रभाव पडतो, असे ज्योतिषशास्त्र सांगते.
Ans: आत्मविश्वास वाढणे, अडकलेली कामे पूर्ण होणे, नवीन संधी मिळणे आणि भावनिक स्थैर्य येणे असे सकारात्मक परिणाम संभवतात