फोटो सौजन्य- pinterest
दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी धनत्रयोदशीचा सण उत्सवात साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी, कुबेर महाराज आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. या देवतांची धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा केल्याने घरामध्ये सुख समृ्द्धी येते अशी मान्यता आहे. या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने आणि नवीन भांड्यांची देखील खरेदी केली जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची विधीवत पूजा केली जाते त्याबरोबर काही उपाय केल्याने आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत देखील होते आणि घरामध्ये आनंद, समृद्धी येते, असे म्हटले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाशी संबंधित काही उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होते, असे म्हटले जाते. धनत्रयोदशीला मिठाचे कोणते उपाय करायचे, जाणून घ्या
पंचांगानुसार, या वर्षी कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथीच सुरुवात शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.18 वाजता सुरू होणार आहे. ही तिथी रविवार, 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.51 वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे धनत्रयोदशी 18 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे.
यंदा धनत्रयोदशी शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी आहे. पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.18 वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती रविवार, 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.51 वाजता होणार आहे. त्यामुळे धनत्रयोदशीचा सण शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे.
वास्तुदोषांपासून सुटका मिळविण्यासाठी धनत्रयोदशीला मीठ मिसळलेल्या पाण्याने घर पुसून टाका. असे केल्याने वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते.
धनत्रयोदशीला मीठ खरेदी करावे. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. ती भक्तावर आशीर्वादाचा वर्षाव करते आणि घरात आनंद आणि सौभाग्य आणते.
धनत्रयोदशीला मिठाचा व्यापार करण्यास मनाई आहे. ज्योतिषांच्या मते, या दिवशी मिठाचे व्यवहार टाळावेत, अगदी चुकूनही. या दिवशी मीठ उधार घेऊ नये किंवा देऊ नये.
धनत्रयोदशीच्या दिवशी दानधर्मालाही खूप महत्त्व आहे, म्हणून या दिवशी एखाद्याने आपल्या आर्थिक स्थितीनुसार पैसे आणि अन्न दान करावे.
धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मीठ मिसळलेले पाणी शिंपडा. असे केल्याने दुःख आणि दारिद्र्य दूर होण्यास मदत होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)