फोटो सौजन्य- pinterest
धनत्रयोदशीचा शुभ सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी पाच दिवसांच्या दिवाळीच्या सणांची सुरुवात होते. यावेळी हा सण शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवसाला “धन्त्रयोदशी” किंवा “धन्वंतरी जयंती” असेही म्हटले जाते. असे मानले जाते की या दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृताच्या भांड्यासह प्रकट झाले होते. म्हणून या दिवशी भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. त्यासोबतच यावेळी काही गोष्टीची खरेदी केल्याने धन, सौभाग्य आणि समृद्धी येते. तसेच सोने, चांदी, नवीन भांडी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी राशीनुसार या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीला पितळेची भांडी, चांदीची नाणी किंवा दागिने यांची खरेदी करणे शुभ मानले जाते. असे केल्याने धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि सकारात्मक ऊर्जा देखील पसरते.
वृषभ राशीच्या लोकांसाठी सोने आणि हिऱ्यांचे दागिने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या गोष्टी खरेदी केल्याने दीर्घकालीन आर्थिक स्थिरता आणते.
मिथुन राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीला पितळेची भांडी किंवा पाचूचे रत्न खरेदी करू शकतात. असे केल्याने मानसिक शांती, व्यवसायात यश आणि संपत्तीत वाढ होते.
कर्क राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करावी. या मूर्ती पितळ किंवा मातीच्या बनवल्या जाऊ शकतात. या घरात आनंद, शांती आणि सौभाग्य आणतात.
सिंह राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीला सोन्याच्या दागिन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या जीवनामध्ये समृद्ध येईल आणि तुमच्यावर देवी लक्ष्मीचा देखील आशीर्वाद राहील.
कन्या राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी पितळेची भांडी किंवा पूजेचे साहित्य खरेदी करावे. यामुळे आरोग्य सुधारते आणि घरात स्वच्छता राहते.
तूळ राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीला चांदीच्या वस्तू जसे की पायामधील अंगठ्या, देवदेवतांच्या चांदीच्या मूर्ती खरेदी कराव्यात. त्यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा आणि आर्थिक समृद्धी येईल.
धनत्रयोदशीला वृश्चिक राशीच्या लोकांनी झाडू, भांडी किंवा सजावटीच्या वस्तू यासारख्या घरगुती उपयुक्त वस्तूंची खरेदी करु शकता. या वस्तूंची खरेदी केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.ॉ
धनु राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीला घराच्या सजावटीच्या वस्तू, सोन्याचे दागिने किंवा पितळेची भांडी खरेदी करावीत. असे केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येईल.
धनत्रयोदशीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी पितळेची भांडी खरेदी करावीत. हा धातू धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला जातो आणि घरात स्थिरता आणि समृद्धी आणतो.
कुंभ राशीच्या लोकांसाठी धनत्रयोदशीला चांदीचे दागिने आणि तांब्याची भांडी खरेदी करणे शुभ राहील. असे केल्याने आरोग्य सुधारेल आणि आर्थिक प्रगती देखील होऊ शकते.
मीन राशीच्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीचे दागिने किंवा वाहन खरेदी करू शकतात. असे केल्याने जीवनात संपत्ती, सौभाग्य आणि प्रगतीचे दरवाजे उघडतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)