
फोटो सौजन्य- गुगल
केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील नेल्लुवाई (Nelluvai) येथे असलेले श्री धन्वंतरी मंदिर हे भारतामधील भगवान धन्वंतरींच्या (आरोग्य आणि आयुर्वेदाची देवता) अत्यंत प्राचीन आणि प्रमुख मंदिरांपैकी एक मानले जाते.
५००० वर्षांपेक्षा जुने मंदिर आहे. या मंदिरातील मुख्य मूर्तीची स्थापना अश्विनी देवांनी केली होती आणि द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाचे वडील वसुदेव यांनी या मूर्तीची पूजा केली होती, अशी आख्यायिका आहे. यावरून या मंदिराचा इतिहास ५,००० वर्षांहून अधिक जुना असल्याचे अंदाज वर्तविण्यात येते..
समुद्रमंथनानंतर हातात अमृताचा कलश, शंख, चक्र, गदा आणि जलोका (औषधी जोंधळ) घेऊन प्रगट झालेले भगवान धन्वंतरी येथे ‘आदि धन्वंतरी’ रूपात पश्चिम वाहिनी मंदिरात विराजमान आहेत. या मंदिराचा जगप्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्णाच्या मंदिराशी अध्यात्मिकदृष्ट्या जोडलेले मानले जाते.
मंदिरातील मुख्य देवता भगवान धन्वंतरी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. मुख्य मंदिराच्या परिसरात शिव, गणपती, अय्यप्पा, वराह मूर्ती, (चेरुतेवर / महाविष्णू) आणि सर्पदेवता यांचीही मंदिरे आहेत.ही येथील उपमंदिर आहेत.
मंदिराच्या पश्चिम भागात पसरलेली हिरवीगार भातशेती आहे, ज्यावरून या गावाला ‘नेल्लुवाई’ (Nelluvai) हे नाव मिळाले.
या मंदिरातील ‘मुक्कुडी’ (Mukkudi) हा औषधी प्रसाद अत्यंत प्रसिद्ध आहे. हा विशेष आयुर्वेदिक काढा/प्रसाद दररोज ठराविक गुप्त पाककृतीनुसार कुट्टनचेरी मनु मूस (Kuttancherry Manu Mooss) यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला जातो. पोटाचे विकार, त्वचाविकार आणि विविध जुनाट आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाविक या प्रसादाचे सेवन करतात.
धनुमासममधील स्वर्गवातील एकादशी हा या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव असतो. तसेच धन्वंतरी जयंती (धन त्रयोदशी) आणि तुळामसूमधील निळमाला महोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. केरळमधील अनेक आयुर्वेदीय वैद्य (Vaidyas) आपल्या व्यवसायाची सुरुवात करण्यापूर्वी येथे येऊन वाचन आणि भजन करतात. त्यामुळे त्यांना देवाचा आशिर्वाद मिळतात.
त्रिशूर रेल्वे स्थानक येथून मंदिराचे अंतर अंदाजे २४ ते २५ किलोमीटर आहे. तर कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अंतर साधारण ७४ ते ७६ किलोमीटर आहे. त्यामुळे रेल्वे आणि विमान या दोन्ही मार्गाने येथे जाऊ शकता. आणि देवाचे मनोभावे दर्शन घेऊ शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील नेल्लुवाई येथे प्रसिद्ध श्री धन्वंतरी मंदिर आहे.
Ans: मंदिरातील भगवान धन्वंतरींची मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. त्यांना आदि धन्वंतरी स्वरूपात पूजले जाते.
Ans: धन्वंतरी जयंती, स्वर्गवातील एकादशी आणि तुळामासातील निळमाला महोत्सव येथे उत्साहात साजरे केले जातात.