
फोटो सौजन्य- pinterest
धार्मिक श्रद्धेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी योग्य रितीने पूजा केल्याने धन-समृद्धी येते, तसेच कुटुंबात आनंद, शांती आणि सौभाग्य वाढते. दरम्यान देवी लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घेऊया
वसुबारसपासून दिवाळीची सुरुवात होते. शक्यतो धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीची खरेदी केली जाते. यावेळी मूर्तीची खरेदी करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. लक्ष्मी आणि गणपती यांच्या एकत्रित मूर्ती कधीही खरेदी करू नयेत. लक्ष्मी आणि गणपती यांच्या मूर्ती वेगवेगळ्या असाव्यात.
हातात मोदक घेतलेली गणेशाची मूर्ती खरेदी करा. त्याच्या हातात मोदकच असायला हवा. मोदक हे ज्ञान, आनंद आणि भौतिक व सामाजिक समृद्धीचे प्रतीक आहेत. गणेश मूर्तीमध्ये त्याचे वाहन, उंदीर, असायला हवा. अशा प्रकारची गणेश मूर्ती घरात सकारात्मक ऊर्जा, शुभता आणि समृद्धी आणते. गणेशाची सोंड डावीकडे वाकलेली असावी.
घुबडावर बसलेल्या देवी लक्ष्मीचा फोटो खरेदी करू नये. शास्त्रानुसार, घुबडावर बसलेली देवी लक्ष्मी ही कालीचे प्रतीक मानली जाते. त्याऐवजी कमळाच्या फुलावर बसलेल्या देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करावी. कमळ हे पवित्रता, सौंदर्य आणि स्थिर समृद्धीचे प्रतीक आहे.
मूर्ती खरेदी करताना, देवी लक्ष्मीचा उजवा हात वरदामुद्रेत आणि डाव्या हातातून सोन्याची नाणी उधळत असल्याची खात्री करा. ही मुद्रा दर्शवते की देवी आपल्या भक्तांवर धन, समृद्धी आणि सुदैवाचा वर्षाव करत आहे. उभ्या मुद्रेतील देवी लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणे टाळा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती एकत्र ठेवण्याची परंपरा आहे.
Ans: आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेतील आणि शांत, प्रसन्न चेहऱ्याची गणेशमूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाते.
Ans: मातीच्या मूर्तीला पारंपरिक महत्त्व आहे. तसेच पितळ, चांदी किंवा इतर धातूंच्या मूर्तीही खरेदी केल्या जातात.