Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: दिवाळीतील धनत्रयोदशी ते भाऊबीज सणापर्यंतचे काय आहे महत्त्व, परंपरा आणि तारीख

दिवाळी हा प्रकाशाचा सण जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. यंदा दिवाळी पाच दिवस नव्हे तर सहा दिवस साजरी केली जाणार आहे. यावेळी दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 12, 2025 | 01:52 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

दिवाळीचा पाच दिवसांचा सण यावर्षी सहा दिवस आहे. हिंदू धर्मात दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दिवाळी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावस्येला येते. यंदा दिवाळीची सुरुवात शनिवार, 18 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे आणि गुरुवार, 23 ऑक्टोबर या दिवशी भाऊबीज आहे. असा सहा दिवसांचा दिवाळीचा कालावधी आहे. दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि परंपरा जाणून घ्या

6 दिवसांचा दिवाळीचा सण

यावेळी रविवार, 19 ऑक्टोबर रोजी हनुमान जयंती आहे. तर दिवाळीची सुरुवात 18 ऑक्टोबर रोजी होत आहे. तर सोमवार, 20 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी, 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन, 22 ऑक्टोबर बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा आणि 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे.

पहिला सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी कोषाध्यक्ष कुबेराच्या पूजेपासून सुरू होतो आणि मृत्यूच्या देवता यमाला दिवे अर्पण करण्यापर्यंत चालू राहतो. दिवाळीत लक्ष्मीपूजेचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी संध्याकाळी आणि रात्री शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मी, भगवान गणेश आणि देवी सरस्वती यांची पूजा केली जाते.

Kartik Month: दीपदान म्हणजे काय? कार्तिक महिन्यात दिवे लावण्याला काय आहे महत्त्व, जाणून घ्या

पहिला धनत्रयोदशीचा दिवस का आहे खास

धनत्रयोदशीचा दिवस धन्वंतरी जयंती म्हणून ओळखली जाते. दिवाळीतील पाच दिवसांपैकी धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस. या दिवसांपासून दिवाळीची सुरुवात होते. असे मानले जाते की या तिथीला आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृताच्या भांड्यासह समुद्रमंथनातून प्रकट झाले होते. म्हणूनच दरवर्षी धनत्रयोदशीला भांडी खरेदी करण्याची परंपरा पाळली जाते.

असे म्हटले जाते की, जो कोणी धनतेरसच्या दिवशी सोने, चांदी, भांडी, जमीन आणि मालमत्तेची शुभ खरेदी करतो, त्याची संपत्ती तेरा पटीने वाढते. या दिवशी त्रयोदशी तिथीची सुरुवात 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 वाजता होणार आहे आणि 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.51 वाजता त्रयोदशी तिथीची समाप्ती होईल.

नरक चतुर्दशी

चतुर्दशीला भगवान विष्णूने देवी अदितीचे दागिने चोरणाऱ्या नरकासुराचा वध करून 16 हजार तरुणींना मुक्त केले. पारंपारिकपणे, हा दिवस शारीरिक अलंकार आणि अलंकाराचा दिवस देखील मानला जातो. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. नरक चतुर्दशी ही नरक चौदस, रूप चौदस आणि रूप चतुर्दशी इत्यादी विविध नावांनी ओळखली जाते. यावेळी चतुर्दशी तिथीची सुरुवात रविवार 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:51 वाजता सुरु होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.44 वाजता होईल.

Ahoi Ashtami 2025: अहोई अष्टमीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी राहावे सावध, तयार होणार हा अशुभ योग

लक्ष्मीपूजन

दिवाळीमधील लक्ष्मीपूजनाचा दिवस विशेष मानला जातो. यावेळी लक्ष्मीपूजन मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी आहे. यावेळी देवीची पूजा करण्यासाठी अडीच तासांचा कालावधी मिळणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करण्याचा मुहूर्त संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी ते रात्री 8 वाजून 40 मिनिटांपर्यंत आहे. असे म्हटले जाते की, या काळात देवीची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते.

बलिप्रतिपदा

यावेळी पाडवा 22 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी कार्तिक मासारंभ असून गोवर्धन पूजन देखील केले जाते. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा असे म्हटले जाते. कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून विक्रम संवत सुरु होतो. म्हणून याला दिवाळी पाडवा असे देखील म्हटले जाते. हा हिंदू धर्मामध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहू्र्त आहे. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत देखील आहे.

भाऊबीज

भाऊबीज हा दिवाळी सणाचा शेवटचा दिवस आहे. भाऊबीज हा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या कपाळावर टिळा लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. हा सण भाई दूज किंवा भैया दूज, भाई टिका, यम द्वितीया आणि भात्री द्वितीया अशा अनेक नावांनी ओळखला जातो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Diwali 2025 what is the importance of traditions from dhanteras to bhaubij festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 01:52 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधानाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वात्तम वेळ कोणती? जाणून घ्या
1

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधानाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वात्तम वेळ कोणती? जाणून घ्या

Viral News: बालीमध्ये हिंदू सणाचा अवमान करणाऱ्या पर्यटकाला 1 वर्षाचा तुरुंगवास; सोशल मीडियावर व्हायरल ‘तो’ वादग्रस्त VIDEO
2

Viral News: बालीमध्ये हिंदू सणाचा अवमान करणाऱ्या पर्यटकाला 1 वर्षाचा तुरुंगवास; सोशल मीडियावर व्हायरल ‘तो’ वादग्रस्त VIDEO

Raksha Bandhan 2026: यंदा कधी आहे रक्षाबंधन, मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या
3

Raksha Bandhan 2026: यंदा कधी आहे रक्षाबंधन, मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Shravan Tuesday: मंगळागौरीच्या पूजेला सुरुवात कशी झाली? श्रावणातील पहिल्या मंगळवाराचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या
4

Shravan Tuesday: मंगळागौरीच्या पूजेला सुरुवात कशी झाली? श्रावणातील पहिल्या मंगळवाराचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.