Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vat Purnima 2026: 28 की 29 कधी आहे वटपौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेच्या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. तसेच वडाच्या झाडाची पूजा करून वडाला धागा बांधून सप्तजन्मी हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना करतात. यंदा वटपौर्णिमा कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धती आणि महत्त्व जाणून घ्या..

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 22, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • वटपौर्णिमा कधी आहे
  • वटपौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत
  • वटपौर्णिमेचे काय आहे धार्मिक महत्त्व
 

हिंदू धर्मात पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानला जातो. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी सुवासिनी महिला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. या सणाला हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचे मानले जाते. उत्तर भारतामध्ये वटसावित्रीचे व्रत ज्येष्ठ अमावस्येला पाळले जाते तर गुजरात, महाराष्ट्र, दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वटपौर्णिमेचे व्रत पाळले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी भक्तीभावाने वडाची पजा केली जाते आणि सत्यवान व सावित्रीची कथा ऐकली किंवा वाचली जाते. असे म्हटले जाते की, हे व्रत अत्यंत फायदेशीर असून ते पाळल्याने वैवाहिक अडचणी दूर होतात आणि यमराज पतीला दीर्घायुष्याचा आशीर्वाद देतात. यंदा वटपौर्णिमा कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

कधी आहे वटपौर्णिमा

ज्येष्ठ पौर्णिमा तिथीची सुरुवात रविवार, 28 जून रोजी सकाळी सकाळी 8 वाजून 35 मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती सोमवार 29 जून रोजी सकाळी 8 वाजून 48 मिनिटांनी होणार आहे. उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा २९ जून रोजी साजरी करण्यात येईल. त्यामुळे वटपौर्णिमेचा सण हा सोमवार २९ जून साजरा केला जाईल.

Vat Purnima: वटपौर्णिमेची पूजा करतेवेळी वाचा कथा आणि महत्त्वपूर्ण मंत्र

वटपौर्णिमा पूजेचा मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा तिथी सोमवार २९ जून रोजी आहे. यादिवशी वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ८:५५ ते सकाळी १०:४० यादरम्यान असेल. २९ जून रोजी दुपारपर्यंत शुक्ल योग असणार आहे आणि त्यानंतर ब्रम्ह योग असेल. हे दोन्ही योग धार्मिक कार्यासाठी शक्तिशाली असे मानले जातात. सोमवारचा दिवस भगवान शिव आणि चंद्राला समर्पित असल्याने या दिवशी पूजा केल्याने व्रताचे फळ अनेक पटींनी मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

वटपौर्णिमेची पूजा कशी करावी

वडाच्या झाडाची पूजा करताना सर्वप्रथम हळदीकुंकू वहावे, मग कापसाचे सूत आणि सौभाग्याचे लेणे म्हणजेच बांगड्या मंगळसूत्र सावित्री देवीला अर्पण करावे. विड्याची पाने ठेवावीत, फळे एका बाजूला ठेवावी मग फुले आणि अक्षता वहावीत. ताटात निरंजन घेऊन औक्षण करून ओवाळावे. पतीच्या आरोग्य व दीर्घायुष्य तसेच सुखी संसारासाठी प्रार्थना करावी. त्यांना तांब्यातील पाण्याने वडाळा प्रदक्षिणा घालावी. सर्वात शेवटी धागा बांधून त्या धाग्याने वडाला सात प्रदक्षिणा माराव्यात व सात जन्माची गाठ आपल्या पतीशी कायम बांधली जावी असे मागणे मागावे.

Shivlilamrut: शिवलीलामृताच्या चौथ्या अध्यायात काय आहे? जाणून घ्या पारायणाचे महत्त्व आणि पूजाविधी

वटपौर्णिमेचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेचा उपवास हा अत्यंत महत्त्वाचा आणि फलदायी मानला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. सनातन परंपरेत, वटपौर्णिमेचा उपवास हा केवळ एक धार्मिक विधी नसून, निसर्गाप्रती आदर, वैवाहिक निष्ठा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा एक अद्भुत संगम आहे. या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, वटवृक्ष हे त्रिमूर्तीचे निवासस्थान मानले जाते. भगवान ब्रह्मा त्याच्या मुळांमध्ये भगवान विष्णू त्याच्या खोडात आणि भगवान शिव त्याच्या फांद्या व पानांमध्ये वास करतात. जेव्हा विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाला सुती धागा गुंडाळून त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालतात, तेव्हा त्यांना तिन्ही देवतांचा आशीर्वाद मिळतो. असे म्हटले जाते की या वृक्षाची पूजा केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वटपौर्णिमा का साजरी केली जाते?

    Ans: विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करून हे व्रत करतात.

  • Que: वटपौर्णिमेची कथा कोणाशी संबंधित आहे?

    Ans: वटपौर्णिमा सावित्री आणि सत्यवान यांच्या पौराणिक कथेशी संबंधित आहे. सावित्रीने आपल्या पतिव्रताच्या सामर्थ्याने सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत मिळवले, अशी श्रद्धा आहे.

  • Que: वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: हे व्रत वैवाहिक जीवनातील सुख, पतीचे दीर्घायुष्य, कुटुंबाचे कल्याण आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानले जाते.

Web Title: Vat purnima 2026 when is vat purnima muhurta puja method importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Hindu Festival
  • hindu religion
  • Vat Purnima

संबंधित बातम्या

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
1

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ
2

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा
3

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा

Navratri 2026: नवरात्रीत रोजचा लूक होणार खास! 9 दिवसांसाठी कोणता रंग निवडायचा? पाहा यादी
4

Navratri 2026: नवरात्रीत रोजचा लूक होणार खास! 9 दिवसांसाठी कोणता रंग निवडायचा? पाहा यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.