Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2026: नरक चतुर्दशीला हनुमान जयंती का साजरी करतात? जाणून घ्या दोन जन्मतिथींचे रहस्य

Diwali 2026: हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरी करण्यामागे वेगवेगळ्या धार्मिक मान्यता आहेत. चैत्र पौर्णिमेबरोबरच कार्तिक कृष्ण चतुर्दशीलाही काही परंपरांमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. या दोन जन्मतिथींमागील पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 07, 2026 | 11:45 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरी करण्यामागे वेगवेगळ्या धार्मिक मान्यता आहेत
  • काही परंपरांमध्ये कार्तिक कृष्ण चतुर्दशीलाही हनुमान जयंती मानली जाते.
  • नरक चतुर्दशीला हनुमानाची विशेष पूजा करण्याची प्रथा आहे.

हनुमानाच्या जन्माच्या दोन तिथींमागील रहस्य आणि पौराणिक कथा

हिंदू धर्मामध्ये भगवान हनुमान हे संकटमोचक, शक्ती, भक्ती आणि निस्सीम सेवेचे प्रतीक मानले जातात. दिवाळीच्या पवित्र सणादरम्यान जिथे माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते, तिथेच हनुमानाची पूजा करण्याचेही एक विशेष महत्त्व आहे. विशेषतः कार्तिक कृष्ण पक्षातील चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमंताच्या जन्माबाबत दोन वेगवेगळ्या तिथींचा उल्लेख मिळतो. या दोन्ही तिथींमागील पौराणिक संदर्भ, धार्मिक महत्त्व आणि दिवाळीशी असलेला त्यांचा संबंध याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया

भगवान हनुमानाच्या जन्माच्या दोन वेगवेगळ्या तिथी

शास्त्र आणि पुराणांनुसार, भगवान हनुमानाच्या जन्माबाबत दोन मुख्य तिथी मानल्या जातात आणि या दोन्ही तिथींमागे वेगवेगळी कारणे ही कारणे प्रांतानुसार वेगळी आहेत.

पहिली तिथी – चैत्र पौर्णिमा

चैत्र पौर्णिमेच्या हनुमानाचा जन्म झाला या तिथीनुसार प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि संपूर्ण दक्षिण भारतात ‘हनुमान जयंती’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यामागे पौराणिक कथा आहे. असे मानले जाते की, या दिवशी भगवान शिवाचे ११ वे रुद्र अवतार म्हणून हनुमंताचा माता अंजनीच्या उदरी प्रत्यक्ष जन्म झाला होता. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान प्रकट झाले होते, म्हणूनच सकाळी अत्यंत पवित्र वातावरणात हा जन्मोत्सव साजरा केला जातो.

Diwali 2026: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनात काय आहे फरक, जाणून घ्या दोन्ही दिवसांचे महत्त्व

कार्तिक कृष्ण चतुर्दशी – नरक चतुर्दशी

उत्तर भारतात आणि काही विशेष धार्मिक परंपरांमध्ये या दिवशी हनुमंताचा जन्मोत्सव किंवा ‘विजय उत्सव’ साजरा केला जातो. हा दिवस दिवाळीच्या ऐन गडबडीत, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येतो. यामुळे दोन वेगवेगळे मतप्रवाह निर्माण होतात.. काही ग्रंथांनुसार, माता अंजनीने कठोर तपश्चर्या केल्यानंतर कार्तिक कृष्ण चतुर्दशीला मध्यरात्री किंवा संध्याकाळच्या वेळी हनुमंताला जन्म दिला होता. तर दुसऱ्या एका कथेनुसार, याच दिवशी माता सीतेने हनुमंताच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना अमरत्वाचे वरदान दिले होते आणि त्यांच्यावर सिंदूर लावला होता. म्हणूनच या दिवसाला हनुमानाचा ‘दुसरा जन्म’ किंवा ‘वरदान दिवस’ मानले जाते.

दिवाळी आणि हनुमान पौराणिक कथा व संबंध

दिवाळीच्या काळात भगवान हनुमानाची पूजा करण्यामागे अत्यंत रंजक आणि महत्त्वपूर्ण पौराणिक कथा आहेत.
रामायणातील कथेनुसार, जेव्हा भगवान श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध केला आणि १४ वर्षांचा वनवास संपवून ते माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परतणार होते, तेव्हा त्यांनी हनुमानाला अयोध्येत संदेशवाहक म्हणून आधी पाठवले होते. हनुमानजींनीच भरताला प्रभू राम येत असल्याची आनंदाची बातमी दिली होती.

ज्या दिवशी प्रभू राम अयोध्येत परतले, तो दिवस कार्तिक अमावस्येचा (दिवाळीचा) होता. संपूर्ण अयोध्या दीपमाळांनी उजळून निघाली होती. आपल्या लाडक्या प्रभूंचे प्राणप्रिय भक्त असलेल्या हनुमानाचेही अयोध्येतील लोकांनी मोठ्या थाटात स्वागत केले. त्यामुळे दिवाळीच्या उत्सवात हनुमंताचे स्मरण करणे अत्यंत अनिवार्य मानले जाते.

Diwali Vastu Tips: आंबा की अशोकाची पाने; घराच्या मुख्य दरवाजाला कोणते तोरण लावणे शुभ? जाणून घ्या वास्तूचे नियम आणि महत्त्व

माता सीतेचे अमरत्वाचे वरदान

कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा हनुमानजी माता सीतेला शोधत लंकेतील अशोक वाटिकेत पोहोचले, तेव्हा त्यांनी प्रभू रामाची मुद्रा (अंगठी) माता सीतेला दिली. प्रभू रामांचा संदेश ऐकून माता सीता अत्यंत भावूक आणि प्रसन्न झाली. त्यांनी हनुमानजींना ‘अष्ट सिद्धी आणि नव निधी’चे दाते होण्याचे आणि चिरंजीवी (अमर) राहण्याचे वरदान दिले. हा दिवस कार्तिक चतुर्दशीचा होता, ज्यामुळे या दिवशी हनुमंताची पूजा केल्याने व्यक्तीला अकाली मृत्यूची भीती राहत नाही, अशी श्रद्धा आहे.

नरक चतुर्दशीला हनुमान पूजेचे महत्त्व

दिवाळीच्या पाच दिवसांतील दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी हनुमंताची पूजा करण्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. हनुमान हे स्वतः संकटमोचक आहेत. त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने घरातील इडा-पिडा टळते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

तसेच कार्तिक चतुर्दशीला हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण केल्याने शनीची साडेसाती किंवा इतर ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर होतात. या दिवशी हनुमंताला तेल आणि सिंदूर अर्पण करण्याची प्रथा आहे. यामुळे सुख, समृद्धी आणि आरोग्याची प्राप्ती होते.

चैत्र पौर्णिमा ही हनुमंताची प्रकट तिथी (जन्म तिथी) मानली जाते, तर कार्तिक चतुर्दशी ही त्यांच्या शौर्य, भक्ती आणि माता सीते कडून मिळालेल्या अमरत्वाच्या वरदानाचा उत्सव आहे. तिथी कोणतीही असो, भगवान हनुमानाची भक्ती मानवाला संकटांशी लढण्याची ताकद आणि जीवनात प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देते. दिवाळीच्या दिव्यांच्या प्रकाशात हनुमंताची भक्ती जीवनातील अंधार दूर सारण्यास मदत करते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: हनुमान जयंती वर्षातून दोनदा का साजरी केली जाते?

    Ans: वेगवेगळ्या धार्मिक मान्यतांनुसार चैत्र पौर्णिमा आणि कार्तिक कृष्ण चतुर्दशी या दोन्ही दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो.

  • Que: नरक चतुर्दशीला हनुमान जयंती साजरी करण्यामागे काय कारण आहे?

    Ans: काही प्रादेशिक धार्मिक मान्यतांनुसार कार्तिक कृष्ण चतुर्दशीलाही हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो.

  • Que: नरक चतुर्दशीला हनुमानाची पूजा कशी करावी?

    Ans: या दिवशी हनुमानाला सिंदूर, तेल आणि फुले अर्पण करून हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचे पठण करण्याची परंपरा आहे.

Web Title: Diwali 2026 narak chaturdashi hanuman jayanti two birth dates mystery pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Diwali 2026
  • Hanuman Jayanti
  • hindu religion

संबंधित बातम्या

Diwali 2026: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनात काय आहे फरक, जाणून घ्या दोन्ही दिवसांचे महत्त्व
1

Diwali 2026: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनात काय आहे फरक, जाणून घ्या दोन्ही दिवसांचे महत्त्व

Stock Market : Dhanteras ला शेअर बाजारात मोठी उलाढाल! सेन्सेक्स 81000 च्या वर बंद; निफ्टी 25000 पार
2

Stock Market : Dhanteras ला शेअर बाजारात मोठी उलाढाल! सेन्सेक्स 81000 च्या वर बंद; निफ्टी 25000 पार

Diwali 2026 Instamart : सणाची धामधूम! धनत्रयोदशीला सोन्याच्या नाण्यांच्या ऑर्डरमध्ये 23 पट वाढ; एकाच ग्राहकाने उडवले लाखो रुपये
3

Diwali 2026 Instamart : सणाची धामधूम! धनत्रयोदशीला सोन्याच्या नाण्यांच्या ऑर्डरमध्ये 23 पट वाढ; एकाच ग्राहकाने उडवले लाखो रुपये

Mumbai News: फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा झाली? मुलांसाठी एएसजी हॉस्पिटलचा मदतीचा हात!
4

Mumbai News: फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा झाली? मुलांसाठी एएसजी हॉस्पिटलचा मदतीचा हात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.