Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2026 Instamart : सणाची धामधूम! धनत्रयोदशीला सोन्याच्या नाण्यांच्या ऑर्डरमध्ये 23 पट वाढ; एकाच ग्राहकाने उडवले लाखो रुपये

Diwali 2026 Instamart : यंदाच्या दिवाळीत क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टवर भारतीयांच्या खरेदीचा एक अनोखा ट्रेंड पाहायला मिळाला आहे, ज्यामध्ये सोन्याच्या नाण्यांच्या ऑर्डरमध्ये तब्बल २३ पट वाढ झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 06, 2026 | 04:58 PM
धनत्रयोदशीला सोन्याच्या नाण्यांच्या ऑर्डरमध्ये 23 पट वाढ ( सौजन्य - सोशल मीडिया )

धनत्रयोदशीला सोन्याच्या नाण्यांच्या ऑर्डरमध्ये 23 पट वाढ ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • सणाची धामधूम!
  • धनत्रयोदशीला सोन्याच्या नाण्यांच्या ऑर्डरमध्ये 23 पट वाढ
  • एकाच ग्राहकाने उडवले लाखांहून अधिक रुपये
Diwali 2026 Instamart : दिवाळीत भारतातील लोकांच्या शॉपिंग कार्टमधून एक गोष्ट स्पष्ट दिसतेय, ती म्हणजे सणाचा आनंद आणि उत्साह आणखी वाढवण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही खास खरेदी करत आहे. घरं सजवण्यापासून आणि लक्ष्मीपूजेच्या तयारीपासून ते धनत्रयोदशीसाठी सोन्या-चांदीची खरेदी, सणासुदीचे पदार्थ आणि आप्तस्वकीयांसाठी भेटवस्तू घेण्यापर्यंत, लोकांनी इंस्टामार्टच्या मदतीने दिवाळीची तयारी आधीच सुरू केली आहे. ( Diwali 2026 Instamart ) 

Divyang Pension Scheme : दिव्यांग मुलांना जन्मापासून मिळणार पेन्शन! सरकारकडून मोठी घोषणा; कोणाला कसा मिळणार लाभ?

दिवाळीचा उत्साह घराच्या छोट्या-छोट्या सजावटीतूनही दिसून येत आहे. मेणबत्त्या आणि झेंडूच्या फुलांसाठी केल्या जाणाऱ्या सर्चमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 200% वाढ झाली आहे. तर दिवाळी गिफ्ट हॅम्पर्समधील लोकांची आवड जवळपास 300% वाढली आहे. पणत्या आणि सजावटीच्या लाईट्सपासून ते ताज्या फुलांपर्यंत, रांगोळीच्या साहित्यापासून ते पूजेच्या आवश्यक वस्तूंपर्यंत, घराचा प्रत्येक कोपरा सणासाठी सजवण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करत आहेत.

दिवाळीचा सण जवळ येत असताना, लोकांनी अनेक दिवस आधीपासूनच तयारी सुरू केली आहे.

धनत्रयोदशीला सोन्याच्या खरेदीचा उत्साह

शुभ मुहूर्तासाठी सोन्याच्या नाण्यांना पसंती: धनत्रयोदशीच्या आधीच्या आठवड्यात सोन्याच्या नाण्यांच्या ऑर्डरमध्ये तब्बल 23 पट वाढ झाली. 1 ग्रॅमची सोन्याची नाणी सर्वाधिक पसंतीची ठरली, त्यानंतर 0.5 ग्रॅमच्या नाण्यांना मागणी होती.

सोन्याच्या खरेदीत ही शहरे आघाडीवर: सोन्याच्या नाण्यांच्या खरेदीत बेंगळुरू पहिल्या क्रमांकावर राहिले. त्यानंतर हैदराबाद आणि मुंबईचा क्रमांक लागला. तर चांदीच्या नाण्यांच्या ऑर्डरमध्ये दिल्ली आघाडीवर होती.

चांदीचीही वाढली चमक: धनत्रयोदशीच्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत चांदीच्या नाण्यांच्या ऑर्डरमध्ये 7 पट वाढ झाली. 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅमच्या नाण्यांना जवळपास सारखीच पसंती मिळाली. लक्ष्मी-गणेशाच्या चित्रांची नाणी लोकांच्या आवडीची ठरली.

घरच्या लक्ष्मीसाठी घरात नवा बदल: किचन आणि डायनिंगशी संबंधित वस्तूंच्या ऑर्डरमध्ये 45% वाढ झाली. डिनर सेटच्या ऑर्डरमध्ये 344%, तर प्रेशर कुकरच्या ऑर्डरमध्ये 171% वाढ झाली.

धनत्रयोदशीपूर्वी एकाच कार्टमधील सर्वात मोठी खरेदी: एका ग्राहकाने एकाच कार्टमध्ये 1 ग्रॅमची अनेक लक्ष्मी मातेची सोन्याची नाणी खरेदी केली. या खरेदीची एकूण किंमत ₹1.73 लाख होती. तर बेंगळुरू आणि अहमदाबादमधील अनेक ग्राहकांनी एकाच कार्टमध्ये 10 ग्रॅमची 24 कॅरेट सोन्याची नाणी खरेदी केली.

धनत्रयोदशीपूर्वी ग्राहकांकडून सर्वाधिक खर्च: नोएडामधील एका ग्राहकाने नऊ वेगवेगळ्या ऑर्डरमध्ये सोन्याच्या नाण्यांवर जवळपास ₹5 लाख खर्च केले. त्यानंतर मुंबईतील एका ग्राहकाने सोन्या-चांदीच्या नाण्यांवर एकूण ₹4.31 लाख खर्च केले, ज्यामध्ये ₹14,950 किमतीच्या चांदीच्या नाण्यांचा समावेश होता. तर वारंगलमधील एका ग्राहकाने पाच ऑर्डरमध्ये ₹3.86 लाखांची सोन्याची नाणी खरेदी केली.

दिवे, सजावट आणि सणाचा जल्लोष

झेंडूच्या फुलांचा सुगंध आणि दारावर सजवलेल्या फुलांच्या माळांशिवाय दिवाळीचा सण पूर्ण होऊच शकत नाही.
● फुलांनी सजली घरं: फुलांच्या ऑर्डरमध्ये 42% वाढ झाली. झेंडूची फुले, फुलांच्या माळा आणि पुष्पगुच्छांमुळे दिवाळीपूर्वीच्या पार्ट्यांसाठी घरांना खास सणासुदीचा लूक मिळत आहे.
● पणत्यांच्या प्रकाशात उजळली घरं: पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या पणत्यांच्या ऑर्डरमध्ये 45%, तर LED पणत्यांच्या ऑर्डरमध्ये 88% वाढ झाली.
● मिठाई तर हवीच! दिवाळीच्या गोडधोडाचा आनंद घेण्यात भारतीय मागे राहिले नाहीत. मिठाईच्या ऑर्डरमध्ये 55% पेक्षा जास्त वाढ झाली. लाडू, सोन पापडी, काजू कतली, गुलाब जामुन आणि पेढे या मिठायांना सर्वाधिक पसंती मिळाली.

प्रत्येक शहराची दिवाळीची मिठाई वेगळी!

एक देश, पण खाण्याच्या आवडी मात्र वेगवेगळ्या. लाडू आणि काजू कतलीला सर्वच शहरांमध्ये पसंती मिळाली, पण प्रत्येक शहराची स्वतःची खास आवडही पाहायला मिळाली.
● चेन्नई: गुलाब जामुन ही सर्वाधिक ऑर्डर केली जाणारी मिठाई ठरली, तर सीडई हा लोकांचा आवडता स्नॅक होता.
● अहमदाबाद आणि जयपूर: सोन पापडी ही सर्वाधिक ऑर्डर केली जाणारी मिठाई ठरली. काही परंपरा कधीच बदलत नाहीत! अहमदाबादमध्ये शेव आणि भेळीलाही चांगली पसंती मिळाली.

● बेंगळुरू: वडा आणि कोडुबळे हे लोकांचे आवडते स्नॅक्स ठरले.
● हैदराबाद: चकोडीने आपल्या कुरकुरीत चवीने लोकांची पसंती मिळवली.
● कोची आणि तिरुवनंतपुरम: फणसाचे चिप्स या शहरांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले.
● पुणे: चिवडा आणि भाकरवडी हे सणासुदीच्या काळातील आवडते स्नॅक्स ठरले.

सणासुदीच्या खाण्याला आरोग्याची जोड

सणासुदीच्या काळात चविष्ट पदार्थांचा आनंद घेताना आरोग्याची काळजी घेता येत नाही असं कोण म्हणतं? पारंपरिक पदार्थांसोबतच लोक आता काही आरोग्यदायी पर्यायांनाही पसंती देत आहेत.
● प्रोटीनला पसंती: प्रोटीन चिप्सच्या ऑर्डरमध्ये 239% वाढ झाली.
● मिलेट आणि मखान्याची क्रेझ: नाचणी, ज्वारी आणि बाजरीपासून बनवलेल्या स्नॅक्सच्या ऑर्डरमध्ये 188% वाढ झाली, तर मखान्याच्या ऑर्डरमध्ये 52% वाढ झाली.
● गोड खा, पण साखरेशिवाय: साखरमुक्त मिठाईच्या ऑर्डरमध्ये 71%, साखरमुक्त स्वीटनर्समध्ये 80% आणि साखरमुक्त कुकीजच्या ऑर्डरमध्ये 51% वाढ झाली.

अभी तो पार्टी शुरू हुई है

दिवाळीची खरेदी फक्त मिठाई आणि घराच्या सजावटीपुरती मर्यादित राहिली नाही. भारतीयांनी आपल्या खरेदीच्या यादीत जवळपास प्रत्येक गरजेच्या वस्तूचा समावेश केला.
● सणासाठी नवा लूक: फुटवेअरच्या ऑर्डरमध्ये 79%, बॅग आणि अॅक्सेसरीजमध्ये 68%, तर कपड्यांच्या ऑर्डरमध्ये 50% वाढ झाली.
● गिफ्ट रॅपिंगचीही तयारी: गिफ्ट रॅपिंग पेपरच्या ऑर्डरमध्ये 78%, तर गिफ्ट बॅगच्या ऑर्डरमध्ये 50% वाढ झाली. कारण भेटवस्तू जितकी खास, तितकीच तिची सजावटही खास असायला हवी!
● स्नॅक्सची चंगळ: चिवडा, नमकीन आणि इतर स्नॅक्सच्या ऑर्डरमध्ये 56%, तर कोल्ड ड्रिंक्स आणि ज्यूसच्या ऑर्डरमध्ये 49% वाढ झाली.

● पूजेच्या साहित्याचीही खरेदी: बताशे आणि अगरबत्तीपासून ते मूर्ती आणि पूजेच्या इतर वस्तूंपर्यंत, लोक दिवाळीच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक वस्तूची खरेदी करत आहेत.
● दिवाळीची तयारी रात्रीही सुरूच! मध्यरात्री 12 ते पहाटे 2 या वेळेत येणाऱ्या ऑर्डरमध्ये मोठी वाढ झाली. घरांना सणासाठी सजवताना डेकोरेटिव्ह लाईट्सच्या ऑर्डरमध्ये 903%, तर मेणबत्त्यांच्या ऑर्डरमध्ये 289% वाढ झाली. पाहुण्यांच्या स्वागतासाठी शेवटच्या क्षणी लागणाऱ्या वस्तूंमध्ये व्हिस्की ग्लासच्या ऑर्डरमध्ये 136% वाढ झाली. सोन पापडी आणि काजू कतलीने गोड खाण्याची इच्छा पूर्ण केली, तर कोला, चिप्स आणि चॉकलेट्स मध्यरात्रीच्या स्नॅक्समध्ये आघाडीवर राहिले. यासोबतच ताजे दूध, इन्स्टंट नूडल्स आणि टिश्यू यांचाही रात्रीच्या खरेदीत मोठा वाटा होता.
● खरेदीचा शुभ मुहूर्त: सणासुदीची खरेदी 1 नोव्हेंबरपासूनच सुरू झाली होती. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, सणाच्या तयारीला कोणतीही वेळेची मर्यादा नसते!

SEBI New Rule : सेबीचा मोठा निर्णय! एप्रिल 2027 पासून शेअर खरेदी-विक्रीवर पैशांचे व्यवहार होणार अधिक सोपे; जाणून घ्या नवा नियम

💡

Frequently Asked Questions

  • Que: धनत्रयोदशीच्या आधी इन्स्टामार्टवर कशाच्या ऑर्डरमध्ये सर्वाधिक वाढ झाली?

    Ans: धनत्रयोदशीच्या आधीच्या आठवड्यात सोन्याच्या नाण्यांच्या ऑर्डरमध्ये तब्बल २३ पट वाढ झाली, ज्यामध्ये १ ग्रॅम आणि ०.५ ग्रॅमच्या सोन्याच्या नाण्यांना सर्वाधिक पसंती मिळाली.

  • Que: दिवाळीच्या सणात कोणत्या मिठायांना सर्वाधिक मागणी पाहायला मिळाली?

    Ans: मिठाईच्या ऑर्डरमध्ये ५५% वाढ झाली असून लाडू, सोन पापडी, काजू कतली, गुलाब जामुन आणि पेढे यांना सर्वाधिक पसंती मिळाली.

  • Que: दिवाळी खरेदीत आरोग्याशी संबंधित कोणत्या पदार्थांची क्रेझ दिसून आली?

    Ans: पारंपरिक पदार्थांसोबतच प्रोटीन चिप्सच्या ऑर्डरमध्ये २३९%, मिलेट स्नॅक्समध्ये १८८% आणि साखरमुक्त मिठाईच्या ऑर्डरमध्ये ७१% वाढ नोंदवली गेली.

Web Title: Instamart diwali shopping trends gold coins sweets marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2026
  • Swiggy

संबंधित बातम्या

Viral video: दिवाळीची साफसफाई की जीवघेणा स्टंट? 5 व्या मजल्यावर बाल्कनीबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेचा VIDEO चर्चेत
1

Viral video: दिवाळीची साफसफाई की जीवघेणा स्टंट? 5 व्या मजल्यावर बाल्कनीबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेचा VIDEO चर्चेत

Mumbai News: फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा झाली? मुलांसाठी एएसजी हॉस्पिटलचा मदतीचा हात!
2

Mumbai News: फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा झाली? मुलांसाठी एएसजी हॉस्पिटलचा मदतीचा हात!

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वीच का करावे अभ्यंगस्नान? अकाली मृत्यूशी काय आहे संबंध
3

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वीच का करावे अभ्यंगस्नान? अकाली मृत्यूशी काय आहे संबंध

Diwali Food Poisoning: सणाचा गोडवा पडू शकतो महागात! मिठाईपासून फराळापर्यंत, खाण्याच्या चुका टाळा
4

Diwali Food Poisoning: सणाचा गोडवा पडू शकतो महागात! मिठाईपासून फराळापर्यंत, खाण्याच्या चुका टाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.