Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Pahat 2026: दिवाळी पहाट म्हणजे काय? डोंबिवलीसह महाराष्ट्रात का वाढतेय या उत्सवाची क्रेझ

Diwali Pahat 2026: दिवाळीची पहाट म्हणजे संगीत, संस्कृती आणि आनंदाचा सुंदर संगम! सुरेल गाणी, अभंग आणि भक्तिगीतांनी दिवाळीची सकाळ अधिक प्रसन्न होते. डोंबिवलीसह महाराष्ट्रामध्ये दिवाळी पहाटेचा उत्साह का खास असतो, जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 08, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य-गुगल

फोटो सौजन्य-गुगल

Follow Us
Follow Us:
  • दिवाळी पहाट म्हणजे काय?
  • महाराष्ट्रासह डोंबिवलीमध्ये वाढते दिवाळी पहाटची क्रेझ
  • दिवाळी पहाटला कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि मांगल्याचा सण! दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असले तरी दिवाळीची पहाट काहीशी वेगळीच असते. पहाटेचे अभ्यंगस्नान, अंगणातील रांगोळी, पणत्यांची रोषणाई आणि उटण्याचा सुगंध यामुळे वातावरण प्रसन्न होते. मात्र गेल्या काही वर्षांत दिवाळी पहाट साजरी करण्याची एक सुंदर परंपरा रूढ होत आहे. तिची लोकप्रियता पुन्हा एकदा महाराष्ट्राला संस्कृतिक दिशेने घेऊन जात आहे. यादिवशी पहाटेच्या वेळी संगीताच्या सुरांची मैफल, भक्तिगीते, सुगम संगीत आणि पारंपरिक गाण्यांचा आनंद घेण्यासाठी नागरिक एकत्र येतात. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरांप्रमाणेच डोंबिवलीमध्येही दिवाळी पहाटचा उत्साह पाहायला मिळतो.

दिवाळी पहाट म्हणजे नेमकं काय?

दिवाळीच्या दिवसांमध्ये सकाळच्या प्रसन्न वातावरणात आयोजित केली जाणारी सांगीतिक मैफल म्हणजे दिवाळी पहाट. यामध्ये शास्त्रीय संगीत, भावगीते, भक्तिगीते, अभंग आणि लोकप्रिय मराठी गाण्यांचे सादरीकरण केले जाते. पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात सुरेल संगीत ऐकण्याचा अनुभव नागरिकांसाठी खास पर्वणी असते. अनेक ठिकाणी प्रसिद्ध गायक, स्थानिक कलाकार आणि संगीतप्रेमी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात.

Diwali Special: १४ वर्षांचा वनवास संपवून राम अयोध्येत परतले, तेव्हा नगरीत कसा साजरा झाला दीपोत्सव

डोंबिवलीकरांसाठी दिवाळी पहाटचे विशेष आकर्षण

डोंबिवली हे सांस्कृतिक आणि कलाप्रेमी शहर म्हणून ओळखले जाते. येथील नागरिक प्रत्येक सण उत्साहाने साजरा करतात. दिवाळीच्या काळात डोंबिवलीतील विविध सांस्कृतिक संस्था, गणेश मंदिर संस्थान आणि मंडळे, सोसायट्यांकडून दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

काही ठिकाणी संगीताच्या मैफली रंगतात, तर काही ठिकाणी ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक गाण्यांनी दिवाळीच्या सकाळी उत्साह निर्माण होतो. विशेषतः फडके रोडवरील दिवाळीचा उत्सवी माहोल डोंबिवलीकरांसाठी आकर्षणाचा विषय असतो. पारंपरिक वेशभूषेत सजलेली तरुणाई, मित्रमंडळींच्या भेटीगाठी आणि उत्साहपूर्ण वातावरण यामुळे डोंबिवलीची दिवाळी पहाट लक्षवेधी ठरते.

दिवाळी पहाटला संगीताच्या सुरांची मैफल

दिवाळी पहाट म्हटलं की सुरेल संगीतांची मैफिल, पहाटेच्या विविध कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारच्या संगीताला प्रथम स्थान दिले जाते. यामध्ये भक्तिगीते आणि गणेशस्तवन, संतांचे अभंग आणि भजने, लोकप्रिय मराठी भावगीते, शास्त्रीय आणि सुगम संगीत आणि मराठी चित्रपटांमधील सदाबहार गाणी असतात. या संगीतामुळे दिवाळीची सकाळ मंत्रमुग्ध होते.

Diwali 2026: नरक चतुर्दशीला हनुमान जयंती का साजरी करतात? जाणून घ्या दोन जन्मतिथींचे रहस्य

पारंपरिक वेशभूषेत सजतात नागरिक

दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमांचे आणखी एक आकर्षण म्हणजे पारंपरिक वेशभूषा. महिला नऊवारी साडी, पैठणी किंवा इतर पारंपरिक साड्यांमध्ये सजलेल्या दिसतात. तर पुरुष कुर्ता-पायजमा, धोतर आणि फेटा परिधान करतात. डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या शहरात पारंपरिक कपड्यांमधील तरुणाई आणि कुटुंबीयांचा सहभाग दिवाळी पहाटेची शोभा वाढवतो.

मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण

दिवाळी पहाट हा केवळ संगीताचा कार्यक्रम नसून आपल्या माणसांसोबत वेळ घालवण्याचा एक सुंदर अनुभव आहे. अनेक वर्षांनी भेटणारे मित्र, कुटुंबीयांसोबतचे फोटो, एकत्र घेतलेला चहा आणि फराळ यामुळे या दिवसाच्या आठवणी खास बनतात. विशेष म्हणजे आजच्या धावपळीच्या जीवनात अशा कार्यक्रमांमुळे नागरिकांना काही क्षण स्वतःसाठी आणि आपल्या आवडत्या लोकांसाठी देता येतात.

दिवाळी पहाटेचे सांस्कृतिक महत्त्व

दिवाळी पहाट ही भारतीय संस्कृतीतील संगीत, परंपरा आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम आहे. या कार्यक्रमांमुळे स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते. नव्या पिढीला मराठी भावगीते, अभंग आणि पारंपरिक संगीताची ओळख होते. डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या शहरांमध्ये अशा कार्यक्रमांमुळे सणांचा उत्साह अधिक वाढतो. त्यामुळे दिवाळी पहाट ही केवळ मनोरंजनाची संधी नसून संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळी पहाट म्हणजे काय?

    Ans: दिवाळीच्या सणादरम्यान पहाटेच्या वेळी आयोजित केल्या जाणाऱ्या संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना दिवाळी पहाट म्हणतात. या कार्यक्रमांत शास्त्रीय संगीत, भावगीते, भक्तिगीते, अभंग आणि नाट्यसंगीत सादर केले जाते.

  • Que: दिवाळी पहाट कार्यक्रम कधी आयोजित केले जातात?

    Ans: दिवाळीच्या मुख्य दिवसांमध्ये, विशेषतः नरक चतुर्दशी आणि दिवाळी पाडव्याच्या पहाटे हे कार्यक्रम आयोजित केले जातात. कार्यक्रमांची वेळ आयोजकांनुसार बदलू शकते.

  • Que: डोंबिवलीतील दिवाळी पहाट का प्रसिद्ध आहे?

    Ans: डोंबिवलीतील फडके रोडवरील दिवाळी पहाट विशेष लोकप्रिय आहे. येथे दरवर्षी मोठ्या संख्येने तरुण-तरुणी आणि नागरिक एकत्र येऊन उत्सवाचा आनंद घेतात

Web Title: Diwali pahat 2026 meaning celebration dombivli maharashtra popularity pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2026
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Diwali 2026: दिवाळीची नवी पहाट घेऊन…! नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रियजनांना पाठवा आनंद, सुख-समृद्धीच्या मराठमोळ्या शुभेच्छा
1

Diwali 2026: दिवाळीची नवी पहाट घेऊन…! नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रियजनांना पाठवा आनंद, सुख-समृद्धीच्या मराठमोळ्या शुभेच्छा

Lakshmi Pujan Mantra: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणा ‘हे’ श्लोक, घरात नांदेल सुख-समृद्धी
2

Lakshmi Pujan Mantra: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणा ‘हे’ श्लोक, घरात नांदेल सुख-समृद्धी

Diwali 2026: धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी…! लक्ष्मीपूजनानिमित्त मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना द्या मंगलमय शुभेच्छा
3

Diwali 2026: धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी…! लक्ष्मीपूजनानिमित्त मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना द्या मंगलमय शुभेच्छा

Diwali 2026: दिवाळीत फोटो काढायला वेळच मिळाला नाही? Gemini AI करेल तुमची मदत, प्रॉम्प्ट्स वापरा अन् बनवा आकर्षक फोटो
4

Diwali 2026: दिवाळीत फोटो काढायला वेळच मिळाला नाही? Gemini AI करेल तुमची मदत, प्रॉम्प्ट्स वापरा अन् बनवा आकर्षक फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.