Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lakshmi Pujan Mantra: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणा ‘हे’ श्लोक, घरात नांदेल सुख-समृद्धी

Lakshmi Pujan Mantra: लक्ष्मीपूजन रविवार, ८ नोव्हेंबर रोजी आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या पूजेदरम्यान विशिष्ट मंत्र आणि श्लोकांचे पठण करण्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्या मंत्रांचा जप करावा जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 08, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची आराधना केली जाते.
  • कोणत्याही पूजेची सुरुवात गणेश वंदनेने करण्याची परंपरा आहे.
  • लक्ष्मीपूजनावेळी देवीचे ध्यान करताना ‘नमस्तेऽस्तु महामाये’ या श्लोकाचे पठण केले जाते.
 

 

लक्ष्मीपूजनच्या दिवशी (दिवाळीला) सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची आराधना केली जाते. या दिवशी विशिष्ट श्लोक आणि स्तोत्रांचे पठण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. लक्ष्मीपूजनच्या वेळी पूजेच्या सुरुवातीपासून ते समाप्तीपर्यंत पठण करायचे महत्त्वाचे श्लोक समजून घेऊयात..

गणेश वंदनाने पूजेची सुरुवात करवी

कोणत्याही पूजेची सुरुवात भगवान गणेशाच्या आराधनेने होते, जेणेकरून पूजेमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

अर्थ: हे वाकडी सोंड असलेल्या, विशाल शरीर धारण करणाऱ्या आणि करोडो सूर्यांचे तेज असणाऱ्या गणपती बाप्पा, माझी सर्व कामे नेहमी विघ्नविरहित पूर्ण होऊ देत.

Laxmi Pujan 2026: दिवाळीसाठी नारळाचा अचूक उपाय, घरावर होणार लक्ष्मीची कृपा

ध्यान आणि मुख्य लक्ष्मी श्लोक

लक्ष्मीपूजनाच्या वेळी माता लक्ष्मीचे ध्यान करताना या प्रसिद्ध श्लोकाचे पठण करावे.

नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते।
शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते॥

अर्थ: हे महामाये! हे देवलोकात पूजल्या जाणाऱ्या श्रीपीठावर विराजमान देवी! तुझ्या हातात शंख, चक्र आणि गदा आहे. अशा हे महालक्ष्मी, तुला माझा नमस्कार असो.

ऐश्वर्य आणि समृद्धीसाठी श्लोक

घरात धनधान्य, सुख आणि वैभव टिकून राहण्यासाठी या मंत्राचा जप अत्यंत फलदायी मानला जातो.

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते॥

अर्थ: हे सर्व मंगल गोष्टींमध्ये मंगल असणारी, कल्याणकारी, सर्व पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) साध्य करून देणारी, शरणागतांचे रक्षण करणारी, तीन डोळे असणारी आणि हे नारायणी (लक्ष्मी), तुला माझा नमस्कार असो.

Diwali 2026 Vastu Tips: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करा दालचिनीचा हा छोटासा उपाय, घरात होईल लक्ष्मीचा अखंड वास

दारिद्र्य नाशासाठी श्लोक

घरातील गरिबी आणि संकटांचा नाश करण्यासाठी माता लक्ष्मीच्या या रूपाची प्रार्थना केली जाते.

पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि।
विश्वप्रिये विष्णुमनोऽनुकूले त्वत्पादपद्मं मयि संनिधत्स्व॥

अर्थ: कमळासारखा मुख असणारी, कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे निष्पाप, कमळ आवडणारी, कमळाच्या पाकळ्यांसारखे मोठे डोळे असणारी, विश्वाला प्रिय आणि भगवान विष्णूच्या मनासारखी वागणारी हे लक्ष्मी! तुझे कमळासारखे पावन चरण माझ्या हृदयात आणि घरात सदैव स्थिर असू दे.

दिव्याची पूजा करताना

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी लावलेला मुख्य दिवा हा ज्ञानाचे आणि समृद्धीचे प्रतीक असतो. दिवा लावताना हा श्लोक म्हणावा

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते॥

अर्थ: शुभ आणि कल्याण करणाऱ्या, आरोग्य आणि धनसंपत्ती देणाऱ्या आणि शत्रूच्या दुष्ट बुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला माझा नमस्कार असो.

दीपेन लोकान् जयति दीपेन हन्ति तामसम्।
दीपो हरति पापानि दीपज्योतिर्नमोऽस्तु ते॥

विशेष स्तोत्र पठण

जर तुम्हाला केवळ श्लोक न म्हणता संपूर्ण स्तोत्र पठण करायचे असेल, तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी खालील स्तोत्रे अतिशय पवित्र मानली जातात..

श्री सूक्त (Sri Suktam): हे वेदप्रणित स्तोत्र असून लक्ष्मीपूजनाच्या वेळी याचे पठण करणे सर्वात श्रेष्ठ मानले जाते.

महालक्ष्मी अष्टक (Mahalakshmi Ashtakam): “नमस्तेऽस्तु महामाये…” ने सुरू होणारे हे अष्टक म्हणायला सोपे आणि अत्यंत प्रभावी आहे.

कनकधारा स्तोत्र (Kanakadhara Stotram): आदि शंकराचार्यांनी रचलेले हे स्तोत्र धन प्राप्तीसाठी विशेष मानले जाते.

पठण करताना घ्यायची काळजी

लक्ष्मीपूजनाच्या वेळी पूर्णपणे स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करूनच श्लोकांचे पठण करावे.

स्पष्ट उच्चार

श्लोकांचे उच्चार जमेल तितके स्पष्ट आणि शांत रितीने करावेत. घाईघाईत पठण करू नये.

भक्तीभाव

मंत्र किंवा श्लोकांमध्ये चमत्कारापेक्षा तुमचा भक्तीभाव माता लक्ष्मीला लवकर प्रसन्न करतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्या मंत्राने पूजेची सुरुवात करावी?

    Ans: लक्ष्मीपूजनाची सुरुवात भगवान गणेशाच्या ‘वक्रतुण्ड महाकाय’ या श्लोकाने करावी, अशी परंपरा आहे.

  • Que: सुख-समृद्धीसाठी लक्ष्मीपूजनात कोणते श्लोक म्हणावेत?

    Ans: ‘सर्वमङ्गलमाङ्गल्ये’ आणि ‘पद्मानने पद्मविपद्मपत्रे’ या श्लोकांचे पठण शुभ मानले जाते.

  • Que: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणती स्तोत्रे म्हणावीत?

    Ans: श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टक आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करणे धार्मिकदृष्ट्या शुभ मानले जाते.

Web Title: Lakshmi pujan 2026 chant these mantras on the day of lakshmi puja pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2026
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Diwali 2026: धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी…! लक्ष्मीपूजनानिमित्त मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना द्या मंगलमय शुभेच्छा
1

Diwali 2026: धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी…! लक्ष्मीपूजनानिमित्त मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना द्या मंगलमय शुभेच्छा

Diwali 2026: दिवाळीत फोटो काढायला वेळच मिळाला नाही? Gemini AI करेल तुमची मदत, प्रॉम्प्ट्स वापरा अन् बनवा आकर्षक फोटो
2

Diwali 2026: दिवाळीत फोटो काढायला वेळच मिळाला नाही? Gemini AI करेल तुमची मदत, प्रॉम्प्ट्स वापरा अन् बनवा आकर्षक फोटो

Diwali 2026: दिवाळीचा आनंद फक्त स्वतःपुरता नको! साहित्यिकांनी सांगितला सण साजरा करण्याचा नवा मंत्र
3

Diwali 2026: दिवाळीचा आनंद फक्त स्वतःपुरता नको! साहित्यिकांनी सांगितला सण साजरा करण्याचा नवा मंत्र

Trump Diwali : ‘ट्रम्प यांच्या हाती ‘हनुमान चालिसा…’; ओव्हल ऑफिसमधील दिवाळी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
4

Trump Diwali : ‘ट्रम्प यांच्या हाती ‘हनुमान चालिसा…’; ओव्हल ऑफिसमधील दिवाळी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.