
फोटो सौजन्य- istock
स्वप्नशास्त्रानुसार, भगवान श्रीकृष्णाशी संबंधित काही स्वप्ने अत्यंत शुभ मानली जातात. ही स्वप्ने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात आणि तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वादही मिळवून देऊ शकतात. कृष्णांशी संबंधित कोणती स्वप्न पाहणे शुभ मानले जाते जाणून घ्या
लड्डू गोपाळ हे कृष्णाचे बालरूप आहे. जर तुम्हाला कधी हे स्वप्न पडल्यास त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील विवाहित सदस्याच्या आयुष्यात एक नवीन पाहुणा येऊ शकतो. हे स्वप्न तुमच्या घरात आनंद येण्याचे लक्षण देखील मानले जाते. हे स्वप्न पडल्यानंतर, तुम्ही सकाळी भगवान कृष्णाचे ध्यान करावे आणि भगवान कृष्णाची आरती देखील म्हणावी.
जर तुम्हाला स्वप्नात भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवताना दिसले, तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. या स्वप्नाचा अर्थ असा देखील होतो की तणाव आणि समस्या दूर होऊ शकतात आणि तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांवर उपाय सापडू शकतात. हे स्वप्न तुमच्या प्रेमसंबंधांमधील गोडव्याचे लक्षण देखील मानले जाते.
जर तुम्ही स्वतःला आपल्या कुटुंबासोबत जन्माष्टमीची पूजा करताना किंवा त्यासाठी तयारी करताना कधी पाहिले असल्यास ते एक अत्यंत शुभ स्वप्न मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, भगवान श्रीकृष्ण तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहेत आणि ते तुम्हाला जीवनात सुखद फळांचा आशीर्वाद देऊ शकतात.
स्वप्नात भगवान कृष्णाला लोणी खाताना पाहणे याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला जीवनात धन आणि समृद्धी मिळू शकते. हे आर्थिक समृद्धी आणि व्यवसायातील वाढीचे प्रतीक देखील मानले जाते.
स्वप्नात कृष्णाला राधा राणींसोबत पाहण्याचा अर्थ असा होतो की, तुमच्या वैवाहिक आणि प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. हे स्वप्न पाहिल्यानंतर तुम्हाला चांगले भाग्यही लाभू शकते. तसेच, तुम्ही जीवनातील प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)