फोटो सौजन्य- pinterest
बऱ्याचदा काही लोकांना अशी स्वप्ने पडतात जी आपल्याला सकाळी उठल्यावर आठवली तरी त्याची भीती वाटते किंवा अशी काही स्वप्ने जी आपल्या मनातून कधीही जात नाही. असेच एक स्वप्न म्हणजे विमानाचे अपघात होताना पाहणे. हे स्वप्न जितके भीतीदायक असते तितकाच त्याचा आपल्या जीवनात चांगला परिणाम होणारे असते. स्वप्नामध्ये विमान अपघात होताना दिसण्याचा नेमका अर्थ काय, जाणून घ्या.
आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये चिंता, ताण आणि दबाव ही सामान्य गोष्ट आहे. या सर्वांचा परिणाम आपल्या मनावर आणि झोपेवर होतो. जेव्हा तुम्हाला स्वप्नामध्ये विमान अपघाताना होताना दिसतो तेव्हा ते सामान्य स्वप्न मानले जात नाही. तर त्याचा परिणाम भावना, परिस्थिती आणि भविष्य यांच्याशी संबंधित असतो.
जर तुम्हाला स्वप्नामध्ये विमान कोसळताना दिसणे, आग लागलेली दिसणे किंवा जमिनीवर आढळताना दिसणे म्हणजे तुमच्या मानसिक स्थितीचे हे संकेत असू शकतात. बऱ्याचदा असे स्वप्न हेदेखील दर्शवते की, तुम्हाला जीवनामध्ये अनेक बदल किंवा नवीन जबाबदारीची भीती वाटू शकते. तसेच हे स्वप्न तुमच्या अपूर्ण असलेल्या योजना किंवा एखाद्या कामाबद्दल नकारात्मक विचार करत असल्याचे देखील दर्शवू शकते.
विमान अपघात हे कितीही भीतीदायक असले तरी ते बऱ्याचदा शुभ लक्षण मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नामध्ये विमान कोसळताना दिसले आणि तुम्ही त्यातून सुरक्षित बाहेर पडताना पाहण्याचा अर्थ म्हणजे तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्या, अडचणींमधून तुम्ही बाहेर पडणार आहात असा होतो.
तसेच हे स्वप्न असे देखील दर्शवते की, जुने नाते, सवय किंवा समस्या संपणार आहे आणि तुम्ही नवीन दिशेकडे वाटचाल करणार आहात. खासकरुन तुम्ही जीवनामध्ये कोणताही मोठा निर्णय घेत असल्यास त्यात तुम्ही यशस्वी होऊ शकतात.
जर तुम्हाला वारंवार हेच स्वप्न येत असल्यास आतमध्ये एखादी भीती किंवा अपूर्ण भावना दाबली असल्याचे म्हटले जाते. असे म्हटले जाते की, हे स्वप्न वारंवार येणे म्हणजे तुमच्या हातामधून काहीतरी निसटून जाणे मग ते नातेसंबंध असो, नोकरी असो किंवा आशा असो. मान्यतेनुसार, तुम्हाला एखाद्या नातेसंबंधात किंवा करिअरमध्ये इतका दबाव असून त्यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडत नसेल तर हे स्वप्न तुमच्या विचारांना इशारा देण्याचे काम करते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)