फोटो सौजन्य- istock
पावसाळा फक्त थंडावा आणि ताजेपणा आणत नाही तर अनेक समस्या आणि अडथळ्यांमधून मार्ग दाखवतो. खासकरुन जेव्हा ग्रहांचा वाईट प्रभाव किंवा आर्थिक अडचणींवर मात करता येते. ज्योतिषशास्त्रामध्ये पावसाच्या पाण्याच्या संबंधित काही गोष्टींचे वर्णन करण्यात आलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पावसाच्या पाण्याचे काही उपाय केल्याने सर्व समस्या आणि अडचणी दूर होतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, पावसाळा हा फक्त ऋतू नाही तर विशेष काळ मानला जातो. ज्यावेळी निसर्ग पूर्णपणे सक्रिय असतो. आकाशातून पडणारे पाणी जमिनीला स्पर्श होताच मातीला भिजवतेच, मात्र त्यातील नकारात्मक ऊर्जादेखील काढून टाकते. पावसाच्या पाण्यासंबंधित सोपे उपाय कोणते जाणून घ्या.
ज्यावेळी पावसाचे आगमन होते त्यावेळी एका भांड्यामध्ये पावसाचे पाणी घ्या आणि ते तुमच्या आंघोळीच्या पाण्यात मिसळा. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरात असलेली सर्व नकारात्मकता दूर होते आणि तुमचे मन शांत राहण्यास मदत होते. खासकरुन ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू, केतू, शनि यांसारख्या ग्रहांचा दोष असेल अशा लोकांनी हा उपाय नक्की करावा.
पावसाच्या पाण्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता प्रवेश करते. एका लहान भांडयामध्ये पावसाचे पाणी घेऊन ते घराच्या मुख्य प्रवेशद्वार, घरातील असलेले कोपरे, देव्हारा अशा ठिकाणी शिंपडा. शनिवारी आणि अमावस्येला हा उपाय करणे अधिक चांगले मानले जाते. हा उपाय केल्याने घरामध्ये आनंद आणि शांतता टिकून राहते. तसेच घरामधील होत असलेले वादविवाद, तणाव कमी होण्यास मदत होते.
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू असल्यामुळे अनेक समस्या आणि अडचणींना तोंड द्यावे लागत असेल तर पावसाच्या पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून ते शिवलिंगावर अर्पण करा. हा उपाय केल्याने ग्रहांचे वाईट परिणाम दूर होतात आणि मनाची अस्वस्थता देखील कमी होण्यास मदत होते.
श्री यंत्र किंवा लक्ष्मी यंत्र पावसाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर त्यावर चंदन आणि केशराचा टिळा लावा. असे उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी आणि समस्या दूर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. हे सर्व उपाय शुक्रवारी केल्याने तुम्हाला अधिक शुभ मानले जाते.
ज्यावेळी पाऊस पडत असेल किंवा पडून गेल्यानंतर दिव्यामध्ये तूप किंवा तिळाचे तेल टाकून ते वाहत्या पाण्यामध्ये सोडा. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होते. तसेच जी कामे दीर्घकाळापासून प्रलंबित आहे ती कामे पूर्ण होतात. ज्या कामांमध्ये वारंवार अडथळे येतात ती कामे देखील पूर्ण होण्यास मदत होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)