Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ekadashi 2026: अधिक महिन्यातील ‘ही’ एकादशी मानली जाते खास, मिळू शकते श्रीहरींची कृपा

अधिक महिन्यामध्ये येणारी एकादशी खास आणि पुण्यदायी मानली जाते. या एकादशींना हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व असते. त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी दान करण्याला देखील विशेष महत्त्व असते. अधिक महिन्यात कोणत्या एकादशी येत आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 22, 2026 | 01:00 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • अधिक महिन्यातील एकादशीचे महत्त्व
  • अधिक महिन्यातील एकादशी खास का आहेत
 

17 मे ते 15 जून 2026 दरम्यान अधिकमासाचा कालावधी असणार आहे. यालाच पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. वर्षात साधारणपणे 12 महिन्यांत 24 एकादशी येतात; मात्र प्रत्येक तीन वर्षांनी 13 वा महिना आल्यामुळे आणखी दोन एकादशी वाढून एकूण 26 एकादशी होतात. यंदा ज्येष्ठ महिन्यात अधिकमास आल्याने हा महिना 30 दिवसांऐवजी 60 दिवसांचा राहणार आहे. त्यामुळे या काळात अधिकमासातील दोन अत्यंत महत्त्वाच्या एकादशी येणार असून त्या अत्यंत पुण्यदायी मानल्या जातात.

ज्येष्ठ महिन्यातील चार एकादशी

दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात दोन एकादश्या असतात—

अपरा (अचला) एकादशी – ज्येष्ठ कृष्ण पक्ष

निर्जला एकादशी – ज्येष्ठ शुक्ल पक्ष

मात्र यंदा चार एकादश्या येणार आहेत..

13 मे – कृष्णपक्ष अपरा एकादशी

27 मे – शुक्लपक्ष कमला (पद्मिनी) एकादशी

11 जून – कृष्णपक्ष परमा एकादशी

25 जून – शुक्लपक्ष निर्जला (भीमसेनी) एकादशी

या चारही एकादशी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात.

अधिकमासातील दोन विशेष एकादशी

पहिली एकादशी

बुधवार 27 मे पुरुषोत्तमी पद्मिनी (कमला) एकादशी

दुसरी एकादशी

गुरुवार 11 जून पुरुषोत्तमी परमा एकादशी

Mahabharata Story: अर्जुनाने मोठ्या भावाचा वध करण्याचा विचार का केला? जाणून घ्या महाभारतातील अद्भुत प्रसंग

दोन्ही एकादशीचे महत्त्व

परम फलदायी आणि दुर्मिळ योग

अधिकमास किंवा पुरुषोत्तम मासाचे अधिपती स्वतः भगवान विष्णू आहेत. त्यामुळे या महिन्यात येणाऱ्या एकादशी सामान्य एकादश्यांपेक्षा अनंतपटीने अधिक फलदायी मानल्या जातात. हा योग फक्त तीन वर्षांतून एकदाच येत असल्याने आध्यात्मिक उन्नतीसाठी याचे विशेष महत्त्व आहे.

पद्मिनी (कमला) एकादशीचे महत्त्व

अधिकमासातील शुक्ल पक्षातील या एकादशीला पद्मिनी किंवा कमला एकादशी म्हटले जाते. या दिवशी व्रत केल्याने किर्ती, वैभव आणि संततीसुख प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. हे व्रत भक्ताला वैकुंठप्राप्तीचे अधिकारी बनवते आणि जीवनातील भौतिक दुःखे दूर करते.

परमा एकादशीचे महत्त्व

अधिकमासातील कृष्ण पक्षातील या एकादशीला परमा एकादशी म्हटले जाते. नावाप्रमाणेच ही ‘परम’ सिद्धी आणि ऐश्वर्य देणारी मानली जाते. धार्मिक मान्यतानुसार हे व्रत विधीपूर्वक केल्यास दारिद्र्य, आर्थिक अडचणी आणि अज्ञात पापांपासून मुक्ती मिळते.

अश्वमेध यज्ञाइतके पुण्य

शास्त्रांमध्ये वर्णन आहे की, पुरुषोत्तम मासातील या दोन्ही एकादश्यांचे व्रत करून भगवान विष्णूच्या ‘पुरुषोत्तम’ स्वरूपाची पूजा केल्यास शेकडो अश्वमेध आणि वाजपेय यज्ञांइतके पुण्य लाभते.

दान आणि साधनेचे महत्त्व

या तिथींना व्रतासोबत दीपदान, अन्नदान आणि “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या महामंत्राचा जप केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि साधकाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे.

Budh Gochar 2026: मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तयार होणार भद्र योग, या राशींच्या लोकांना मिळणार करिअर आणि व्यवसायात मोठे यश

व्रत करणाऱ्यांसाठी संक्षिप्त नियम

पहाटे लवकर उठून स्नान करावे.

स्वच्छ पिवळे वस्त्र परिधान करावे.

भगवान विष्णूंसमोर दीप प्रज्वलित करून व्रताचा संकल्प करावा.

दिवसभर फलाहार करावा.

द्वादशी तिथीच्या शुभ मुहूर्तावर पारण करून व्रत सोडावे.

या पवित्र आणि दुर्मिळ संधीचा लाभ घ्या आणि श्रीहरींची कृपा प्राप्त करा.

अधिक मासातील एकदशी असल्याने या एकदशींचे व्रत केले पाहिजे. कारण हा दुर्मिळ योग दर तीन वर्षांनी येतो. त्यामुळे यावर्षी हे व्रत नाही करता आले तर पुन्हा तीन वर्षे वाट पाहावी लागेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: अधिक महिन्यातील एकादशी खास का मानली जाते?

    Ans: अधिकमास किंवा पुरुषोत्तम मास भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. त्यामुळे या महिन्यात येणाऱ्या एकादशी अत्यंत पुण्यदायी आणि फलदायी मानल्या जातात.

  • Que: अधिकमासात कोणत्या विशेष एकादश्या येणार आहेत?

    Ans: पुरुषोत्तमी पद्मिनी (कमला) एकादशी आणि पुरुषोत्तमी परमा एकादशी या दोन विशेष एकादश्या येणार आहेत.

  • Que: अधिकमासातील एकादशीचे व्रत केल्याने काय लाभ होतात?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते, पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख-समृद्धी वाढते.

Web Title: Ekadashi in the month of adhik is considered to be the special day of lord vishnu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 01:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.