Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gatha Navnathanchi : नदी किनारी सापडलं दिव्य बालक ; ब्रम्हदेवांचा अंश असलेल्या चरपतीनाथांचा जन्म कसा झाला ?

नवनाथांपैकी शेवटचे म्हणजेच नववे नाथ चरपतीनाथांचा जन्म कसा झाला आणि नाथपंथाशी ते कसे जाेडल गेले ते सविस्तर जाणून घेऊयात. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 30, 2026 | 12:21 PM
Gatha Navnathanchi : नदी किनारी सापडलं दिव्य बालक ; ब्रम्हदेवांचा अंश असलेल्या चरपतीनाथांचा जन्म कसा झाला ?
Follow Us
Close
Follow Us:
  • नदी किनारी सापडलं दिव्य बालक ;
  • ब्रम्हदेवांचा अंश असलेल्या चरपतीनाथांचा जन्म कसा झाला ?
नवनाथांपैकी शेवटचे म्हणजेच नववे नाथ चरपतीनाथांचा जन्म कसा झाला आणि नाथपंथाशी ते कसे जाेडल गेले ते सविस्तर जाणून घेऊयात. एकदा ब्रम्हदेवांचा अंश भागीरथी नदीत पडला. त्यावेळी नऊ महिन्यांनी पिप्पलनारायण त्यांनी त्यात प्रवेश केला आणि एक तेजस्वी बालक नदीच्या किनारी रडत होतं. नदीच्या जवळून जाणाऱ्या सत्यश्रवा या ब्राम्हणाला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. सत्यश्रवा त्या बाळाची दया आली पण त्याच वेळी त्याला प्रश्न पडला इतक्या तान्ह्या बाळाला कोणी असं का एकटं सोडलं असेल. सत्यश्रवा विचार करत असताना या बाळाभोवती त्याला एक प्रकाश दिसला. हे पाहून भुताटकी तर नाही ना या भितीने सत्यश्रवा पळू लागला तेच नारदमुनींनी त्याला अडवलं.

साक्षात नारदमुनींनी दृष्टांत दिला हे पाहून सत्यश्रवा भारवला. नारदमुनींनी सत्यश्रवाला सगळी हरिकत सांगितली. मुनिवर म्हणाले की, हा बालक कोणी साध सुदं नव्हे. साक्षात पिप्पलनारायणांनी जन्म घेतला आहे. या बाळाला तुला 12 वर्ष सांभाळायचं आहे. 12 व्या वर्षानंतर या बाळाला सिद्धी प्राप्ती होईल. आणि नाथसंप्रदायात याचा समावेश होईल. या बाळाचं नाव चरपती ठेव, असं नारदमुनींनी सत्यश्रवाला सांगितलं. नारदमुनींच्या सांगण्यानुसार सत्यश्रवाने बाळाचं संगोपन केलं. वयाच्या 12 व्या वर्षानंतर दत्तगुरुंच्या योजनेप्रमाणे चरपतीनाथसंप्रदायाचा भाग झाला आणि चरपतीला सिद्धी प्राप्त झाल्यानंतर चरपतीनाथ म्हणून य़ांना ओळख मिळाली. चरपतीनाथ हे नाथसंप्रदायातील शेवटचे नाथ होते. या चरपतीनाथांचं मुख्य समाधीस्थळ हे हिमाचल प्रदेशमध्ये असल्याचं म्हटलं जातं.

Vitthal-Rukmini: पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीला चंदन उटी लावण्याची काय आहे परंपरा जाणून घ्या

दत्तगुरुंचे तीन अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंहसरस्वती आणि श्री स्वामी समर्थ. दत्तगुरुंना मानणारा त्यांना पुजणारा अनुयायी वर्ग खूप मोठा आहे. याच दत्तसंप्रदायाचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे नवनाथ. दत्तसंप्रदायात नवनाथ म्हणजे अध्यात्म, योग, आणि दत्ततत्त्व यांचं मूर्त स्वरूप मानलं जातं. “नवनाथ” म्हणजे भगवान दत्तात्रेयांच्या नऊ प्रमुख अवतार स्वरूपात अवतरलेले महान योगी. हे नवनाथ दत्तसंप्रदायाचे आधारस्तंभ मानले जातात. त्यांनी जगभर दैवी ज्ञान, भक्ति, आणि योगमार्गाचा प्रसार केला.

दत्तसंप्रदायाचा खरा पाया रचला, तो या नवनाथांनी असं म्हटलं जातं. जो नंतर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि नेपाळपर्यंत पसरला. नवनाथ परंपरेतूनच नंतर नाथसंप्रदाय आणि अवधूत परंपरा विकसित झाली असं देखील सांगितलं जातं. नवनाथांनीसमाजातील सर्व घटकांना स्त्री, शूद्र, गरीब असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला भक्तीमार्ग स्विकारण्याता अधिकार आहे, परमार्थ हा ईश्वर आणि ईश्वारापुढे उच्च निच्च असं काही राहत नाही ही शिकवण नवनाथांनी दिली. परमार्थातून भक्तीमार्ग मिळतो त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा हे त्यांनी सांगितलं. नवनाथ म्हणजे केवळ संत नाहीत, ते दत्ततत्त्वाचे विस्तार आहेत. त्यांनी अध्यात्माला लोकजीवनाशी जोडून प्रत्येकाला परमेश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवला. म्हणूनच दत्तसंप्रदायात नवनाथांचं स्थान गुरुतुल्य आणि पूजनीय मानलं जातं.

समर्थ रामदास स्वामींचे “मनाचे श्लोक”: एका रात्रीत घडलेली अद्भुत काव्यनिर्मिती, जाणून घ्या प्रेरणादायी कथा

Web Title: Gatha navnathanchi a divine child was found on the river bank how was charapatinath a part of brahma born

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 12:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.