फोटो सौजन्य- pinterest
मानवी मनावर नियंत्रण आणण्यासाठी तसेच चंचल असलेले मन चुकीच्या मार्गाला जाऊ नये. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी समर्थांनी मनाचे श्लोक का लिहिले? तर मनाला सन्मार्गावर (चांगल्या मार्गावर) आणण्यासाठी हे श्लोक मार्गदर्शन करतात. ‘मनाचे श्लोक’ मानवाला आत्मपरीक्षण करायला शिकवतात, ज्यामुळे व्यक्तीतील दोष नाहीसे होतात. तसेच हे श्लोक मनातील दुष्ट वासना, क्रोध, लोभ, मत्सर दूर करून श्रीरामभक्ती आणि सदाचार शिकवतात. हे श्लोक मानवाला नीतिमान जीवन जगण्याची प्रेरणा देतात, जेणेकरून देह त्यागताना कीर्ती मागे उरावी.
समर्थ रामदास स्वामी हे २०५ श्लोक समर्थ रामदास स्वामींनी स्वतः रचले. असे मानले जाते की, समर्थ रामदास स्वामींनी चाफळच्या खोऱ्यात (किंवा काही ठिकाणी रामघरी असाही उल्लेख आढळतो) असताना, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एका रात्रीत हे २०५ श्लोक सांगितले. हे त्यांच्या प्रचंड प्रतिभेचे आणि रामभक्तीचे उदाहरण मानले जाते.
थोडक्यात सांगाचे तर, समर्थ रामदास स्वामी यांच्या “मनाचे श्लोक” या काव्यनिर्मितीभोवती एक विलक्षण आणि प्रेरणादायी कथा सांगितली जाते. समर्थांनी एका बैठकीत, एका रात्रीत २०५ श्लोक सांगितले. ही केवळ दंतकथा नसून त्यांच्या प्रतिभेचा आणि आध्यात्मिक सामर्थ्याचा प्रत्यय देणारी घटना मानली जाते. समर्थांच्या व्यक्तिमत्त्वाचा व्यापक आवाका पाहता, अशी निर्मिती प्रत्यक्षात घडली असावी, असे मानणे अजिबात अतिशयोक्ती वाटत नाही.
१२ वर्षांची पायी तीर्थयात्रा आणि भारतभ्रमण पूर्ण करून समर्थ चाफळच्या खोर्यात स्थिरावले. तेथून त्यांनी समाजजागृतीचे कार्य सुरू केले. त्याला कारण तत्कालीन परिस्थिती होती. मुस्लिम आक्रमकांनी महाराष्ट्राला विळखा घातला होता. अत्याचार, लुटमार आणि धर्मावर आक्रमण होत होते.. अशा स्थितीत बलशाली पिढी घडविण्याचे त्यांनी निश्चित केले. त्यानंतर १६४४ नंतर ठिकठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना करून समाजात बलोपासना आणि संघटनशक्ती रुजवली. रामभक्तीला लोकमान्यता मिळवून देण्यासाठी त्यांनी रामोत्सवाची परंपरा सुरू केली. मसूर येथे पहिला रामजन्मोत्सव साजरा झाला आणि नंतर चाफळ येथे श्रीराम मंदिर उभारण्यात आले. त्या काळात परकीय सत्तेखाली मंदिरनिर्मिती करणे हे धाडसाचे काम होते. पण समर्थांनी ते कृतीतून सिद्ध केले.
समर्थांनी कल्याणस्वामी यांना बोलावले आणि “गणाधीश तो ईश सर्वागुणांचा…” या ओळीपासून श्लोक सांगण्यास सुरुवात केली. पहाटेपर्यंत अखंड काव्यप्रवाह चालू राहिला आणि “म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी” या ओळीने तो पूर्ण झाला. समर्थांनी एका बैठकीत, एका रात्रीत २०५ श्लोक सांगितले.
मनाचे श्लोक हे कालातित आहेत. आजही ते मानवाला प्रसंगानुरूप अंतर्मुख करतात.. त्यांच्या पठणाने जगण्याची एक नवी दिशा सापडते. अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत, सुस्पष्ट असल्याने सर्वसामान्य लोकांना सहज वाचता येतात. त्यामुळेच मनाचे श्लोकांचे महत्त्व इतक्या वर्षांनी कालबाह्य होत नाहीत.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले २०५ उपदेशात्मक श्लोक आहेत, जे मनाला योग्य मार्गावर नेण्यासाठी मार्गदर्शन करतात.
Ans: मानवी मन चंचल असते. ते चुकीच्या मार्गावर जाऊ नये आणि सन्मार्गावर राहावे यासाठी समर्थांनी हे श्लोक लिहिले.
Ans: हो, परंपरेनुसार असे मानले जाते की समर्थ रामदास स्वामींनी एका रात्रीत २०५ श्लोक सांगितले आणि ते त्यांच्या शिष्यांनी लिहून घेतले.






