Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gautam Buddha : आयुष्य बदलवणारे बुद्धांचे अष्टांगिक मार्ग आणि त्याचा अर्थ

गौतम बुद्धांच्या मते जेव्हा माणसं भावनेच्या आहारी जातात तेव्हा जगणं कठीण होतं. हेच सांगताना बुद्धांनी आयुष्य कसं जगावं याबाबत अष्टांग मार्ग सांगितले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 22, 2026 | 01:10 PM
Gautam Buddha : आयुष्य बदलवणारे बुद्धांचे अष्टांगिक मार्ग आणि त्याचा अर्थ
Follow Us
Close
Follow Us:
  • आयुष्य बदलवणारे बुद्धांचे अष्टांगिक मार्ग
  • बुद्धांचे विचार
प्रज्ञा शील करुणा हा कानमंत्र बुद्धांनी दिला. मानवी जीवनात भुतदया, माफ करणं आणि योग्य समज हे अत्यंत महत्वाचे आहेत. माणसाचे राग, लोभ, प्रेम, मत्सर, हळवेपणा अशा विविध भावना आहेत आणि त्या नैसर्गिक आहेत. पण याच भावना अति झाल्या तर माणसाचं काही खरं नाही असं बुद्ध म्हणतात. गौतम बुद्धांच्या मते जेव्हा माणसं भावनेच्या आहारी जातात तेव्हा जगणं कठीण होतं. हेच सांगताना बुद्धांनी आयुष्य कसं जगावं याबाबत अष्टांग मार्ग सांगितले आहे.

आष्टांगिक मार्ग हा गौतम बुद्ध यांनी सांगितलेला बौद्ध धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. हा मार्ग दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी उपयोगी ठरतो. याला “मध्यम मार्ग” असेही म्हणतात, कारण तो अति सुख आणि अति दु:ख या दोन्ही टोकांपासून दूर राहण्याची शिकवण देतो. कोणत्याही परिस्थितीत भावनांचा कडेलोट झाला तर वाट्याला त्रास येणं हे स्वाभाविक असतं. त्यामुळे परिस्थिती कशीही असो आतून शांत राहणं महत्वाचं आहे. हेच बुद्ध त्यांच्या अष्टांग मार्गातून सांगतात.

Gautam Buddha : तुम्हाला बुद्धांचा तांदूळ माहितेय का ? शांतीचा संदेश देणाऱ्या तथागतांचं शेतीशी होतं खास नातं

 

 

  • सम्यक दृष्टी- जगण्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावं. आपण जगाकडे ज्या नजरेने पाहतो तेच आपल्याला दिसतं. त्यामुळे काही काही वेळा आपला पाहण्याचा दृष्टीकोन देखील आपलं आयुष्य बदलण्यासाठी खूप फायदेशीर असतं.
  • सम्यक संकल्प- आपल्यामुळे कोणालाही इजा होणार नाही असा जगण्याचा संकल्प करा, असं बुद्ध सांगतात.
  • सम्यक वचन- या जगात काय स्थिर आहे तर ते सत्य. म्हणूनच कायम खरं वागा आणि खरं जगा. तुमचा खरेपणा तुमची ताकद ठरते.
  • सम्यक कर्म- . चोरी न करणे. कोणाची फसवणूक न करता जगणं. यामुळे तुम्ही माणूस म्हणून समृद्ध होता आणि हीच खरी संपत्ती आहे.
  •  सम्यक उपजीविका- कोणाचं हिसकावून आपण कधीही आनंदाने जगू शकत नाही.त्यामुळे नैतिक आणि प्रामाणिक मार्गाने पोट भरणे, हे एका संवेदनशील माणसाचं उदाहरण आहेे.
  • सम्यक व्यायाम- मनात वाईट विचार येऊ न देणे आणि चांगले विचार टिकवणे. मन जितकं शांत आणि संयमी असतं तेवढं आपण हवं ते मिळवू शकतो.
  • सम्यक स्मृती- नेहमी चांगल्या आठवणी लक्षात ठेवाव्यात. जे त्रास देतं ते सोडता आलं पाहिजे.
  •  सम्यक समाधी – समाधी म्हणजे एकाग्रता. मनाची पूर्ण एकाग्रता साधली की हवं ते साध्य करणं सोपं जातं.
एकंदरितच परिस्थिती तुमच्या बाजूने असो किंवा तुमच्या विरोधात तुम्ही कायमच भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, असं बुद्ध सांगतात.

गौतम बुद्धांचे केस खरंच कुरळे होते का ? | Navarashtra

Web Title: Gautam buddha the life changing eightfold path of buddha and its meaning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 01:10 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.