फोटो सौजन्य: Pinterest
तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांची अडचण ऐकून घेतली. बुद्धांनी शेतकऱ्यांना काही विशेष तांदळाचे बीज दिले आणि सांगितले की योग्य ती मेहनत आणि हवामानाचा सखोल अभ्यास करुन हे बीज मातीत पेरा आणि या तांदळाची लागवड करा. शेतकऱ्यांनी बुद्धांच्या सांगण्याप्रमाणे त्या बियांची पेरणी केली. काही महिन्यांनी जेव्हा पीक आले, तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्या तांदळाला विशेष सुगंध आणि चव होती. दाणे थोडे काळसर रंगाचे असल्यामुळे त्याला पुढे “कालानमक तांदूळ” असे नाव पडले. कालांतराने हा तांदूळ कपिलवस्तूची ओळख बनला. आजही उत्तर प्रदेश आणि नेपाळ सीमेवरील भागात कालानमक तांदूळ प्रसिद्ध मानला जातो. त्यामुळे अनेक लोक या तांदळाला “बुद्धांचा तांदूळ” असेही म्हणतात. त्यावेळी बुद्धांना शेती आणि हवामाचा सखोल अभ्यास देखील होता. हा तांदूळ सध्या दुर्मिळ होत असला तरी एकेकाळी लयाला जाणाऱ्या शेतीला वाचवण्यासाठी बुद्धांनी दिलेली देण म्हणजे हा कालानमक तांदूळ. या तांदळाचे फायदे म्हणजे याचा भात आरोग्यदायी मानला जातो.
कालानमक तांदळाचे फायदे
कालानमक तांदूळ इतर तांदळांच्या जातीच्या तुलनेत पचायला हलका असतो. त्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि पचनसंस्थेची समस्या असलेल्या लोकांसाठी हा चांगला पर्याय मानला जातो.काही अभ्यासांनुसार या तांदळात चरबी कमी असल्यामुळे तो हृदयाच्या आरोग्यासाठी तुलनेने चांगला पर्याय आहे. डायबिटीसच्या लोकांना भात खाऊ नये म्हणून सांगतात पण हा तांदूळ डायबिटीसच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर मानला जातो. कालानमक तांदूळ हा भारतातील अत्यंत सुगंधी आणि पारंपरिक तांदळाचा प्रकार मानला जातो.शिजवल्यानंतर भात मऊ आणि हलका होतो.यात लोह, झिंक आणि इतर खनिजे चांगल्या प्रमाणात असतात.पचनास हलका असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.कालानमक तांदूळ पौष्टिक असल्यामुळे शरीराला ऊर्जा देतो. यात असलेले खनिज घटक शरीराला पोषक घटक देतात.






