
फोटो सौजन्य- pinterest
शनिवार 25 एप्रिल रोजी रात्री आठ वाजून चार मिनिटांनी चंद्र सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी सिंह राशीमध्ये आधीच केतू उपस्थित आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्र आणि केतूला ग्रहण या असे म्हणतात. असे म्हटले जाते की या ग्रहाला समस्या आणि शुभ प्रभाव देणारा ग्रह मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र मन आणि भावनांचा कारक ग्रह मानला जातो. कारण केतू अचानक होणाऱ्या घटनांचा कारक आहे. ज्यावेळी हे दोन्ही एकत्र येतात त्यावेळी व्यक्तीच्या मनात अस्थिरता, तणाव आणि इतर प्रकारच्या समस्या वाढतात. त्यामुळे या राशीमध्ये तयार होणारा ग्रहण योग काही राशींच्या लोकांचा ताण वाढवू शकतो. कोणत्या राशींच्या लोकांनी सांभाळून राहावे जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रात ग्रहण योग हा एक विशेष आणि प्रभावशाली योग मानला जातो. जेव्हा राहू किंवा केतू हे छाया ग्रह सूर्य किंवा चंद्राच्या जवळ येतात, तेव्हा हा योग तयार होतो.
मेष राशींच्या लोकांचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. अन्यथा मानसिक तणाव सारख्या समस्या तुम्हाला जाणवू शकतात. या व्यतिरिक्त आवश्यक खर्च करणे टाळावे आणि कोणत्याही नवीन व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. दुसऱ्याच्या विश्वासावर आपले काम लगेच सोडू नका. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील.
सिंह राशीमध्ये ग्रहण योग तयार होत असल्याने या राशीवर सर्वात जास्त प्रभाव पडणार आहे. या काळात नवीन कामांची सुरुवात करू नका. यावेळी तुमची दिनचर्या आणि खाणेपिणे व्यवस्थित होईल. कामामध्ये अडथळे, व्यवसायामध्ये समस्या आणि गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. यामुळे इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आर्थिक निर्णय घेण्याच्या आधी विचारपूर्वक निर्णय घ्या. या काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
मीन राशींच्या लोकांना या काळात सावध राहण्याची गरज आहे. प्रेम जीवनात सावधानता बाळगत पुढे जा. यावेळी कामाच्या ठिकाणी अचानक बदल किंवा ताण जाणवू शकतो. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. नातेसंबंधांमध्ये गैरसमज वाढू शकतात. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ग्रहण योग हा असा योग आहे, जेव्हा राहू किंवा केतू, सूर्य किंवा चंद्राच्या संपर्कात येतात. यामुळे त्या ग्रहांची ऊर्जा प्रभावित होते.
Ans: नाही. हा योग प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगळा परिणाम देतो. काहींना कमी, तर काहींना जास्त प्रभाव जाणवतो.
Ans: ग्रहण योगामुळे मेष, सिंह आणि मीन राशींच्या लोकांना तणावाला सामोरे जावे लागेल