Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hanuman Jayanti: हनुमान जयंती का साजरी केली जाते, जाणून घ्या पौराणिक कथा

आज गुरुवार, 2 एप्रिल रोजी सर्वत्र हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. हनुमान हे भगवान रामांचे परमभक्त, अपार शक्तीचे धनी आणि संकटमोचन म्हणून ओळखले जातात. हनुमान जयंती का साजरी केली जाते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 02, 2026 | 09:43 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • हनुमान जयंती का साजरी केली जाते
  • हनुमान नाव कसे पडले
  • हनुमान जयंतीची पौराणिक कथा
 

हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. हनुमान जयंती साजरी करण्यामागील मुख्य कारण म्हणजे हनुमानांच्या जन्माचा उत्सव आणि त्यांच्या गुणांचे स्मरण करणे. हा दिवस भक्तांसाठी प्रेरणादायी असतो, कारण हनुमानांनी आपल्या जीवनातून शक्ती, बुद्धी आणि भक्तीचा आदर्श ठेवला. त्यांच्या आशीर्वादाने संकटे दूर होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते, अशी श्रद्धा आहे.

हनुमान जयंतीची पौराणिक कथा

आज देशभरात हनुमान जयंती साजरी होणार आहे. हा दिवस हनुमानाचा जन्माचा दिवस असून हा सण हनुमानाची शक्ती, भक्ती आणि हनुमानाच्या स्मरणार्थ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हनुमानांना संकटमोचन अर्थातच संकट दूर करणारे मानले जाते. ते शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे. शिवाय ते बुद्धी आणि विवेक याचेही प्रतीक मानले जातात. भक्तांच्या सर्व अडचणी दूर करतात, अशी भक्तांची त्यांच्यावरती श्रद्धा आहे म्हणूनच या दिवशी हनुमान चालिसेचे पठण केले तर त्याचा लाभ होतो, असे देखील म्हणतात. त्यांचा हा दिवस साजरा करणे म्हणजे हनुमानाच्या अद्वितीय भक्तीचा आदर्श समोर ठेवणे. त्याच्या शौर्य, बुद्धी आणि निस्वार्थ सेवेला वंदन करणे. वाईट शक्तींवरती विजय आणि चांगल्या शक्तींचा सन्मान करणे. हनुमान हे राम यांचे परमभक्त होते त्यांनी रामांसाठी केलेली सेवा आणि त्यांची निष्ठा अतुलनीय मानली जाते. तुम्हाला हनुमान जन्माची गोष्ट माहिती आहे का? चला आज ही रंजक कथा जाणून घेऊया

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीच्या दिवशी राशीनुसार करा या गोष्टींचे दान

हनुमान नाव कसे पडले

अयोध्येपासून दूर एका सुंदर जंगलात अंजली माता नावाची एक तपस्वी राहत होती. तिला मुलं नव्हतं म्हणूनच ती देवांची कठोर अशी तपश्चर्या करत होती. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन वायूदेव यांनी तिला आशीर्वाद दिला. तिला एक अद्भुत शक्तिशाली असा पुत्र होईल असे वरदान दिले. थोड्याच दिवसांनी अंजली मातेला तपस्वी बालक झाला तोच पुढे हनुमान म्हणून प्रसिद्ध झाला. पण त्याला हनुमान नाव पडण्यामागे एक कारण आहे.

Hanuman Jayanti 2026: वाल्मिकी रामायणामध्ये सुंदरकांडातील थरारक आणि प्रेरणादायी कथा

देवताचं वरदान

हनुमान लहानपणी खूप खट्याळ आणि उत्साही होते. एकदा सकाळी त्यांनी आकाशात उगवणारा लाल भडक सूर्य पाहिला त्यांना वाटलं ते मोठं फळ आहे ते लगेच आकाशात उडी मारून सूर्य पकडायला गेले ते पाहून देवदेखील घाबरले तेव्हा इंद्र याने आपल्या व्रजाने हनुमानावर प्रहार केला त्या प्रहारामुळे हनुमान खाली पडले आणि त्यांची हनु म्हणजे हनुवटी जखमी झाली. म्हणूनच त्यांना हनुमान असं नाव पडलं. हनुमान जखमी झाल्यामुळे वायूदेव मात्र खूप रागावले त्यांनी संपूर्ण जगातील वारा थांबवला त्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला. तेव्हा सर्व देवांनी येऊन हनुमानाला विविध शक्तीचं वरदान दिलं. अपार बल, वेग, बुद्धी आणि अमरत्वासाठी दीर्घायुष्य. हनुमान जयंतीचा हा दिवस म्हणजे शक्ती, श्रद्धा आणि निस्वार्थ सेवेला बंधन करण्याचा दिवस मानला जातो.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: हनुमान जयंती का साजरी केली जाते?

    Ans: हनुमान जयंती हा दिवस हनुमान यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साजरा केला जातो

  • Que: हनुमानांना ‘हनुमान’ हे नाव कसे पडले?

    Ans: बालपणी सूर्य पकडताना इंद्राच्या वज्रप्रहारामुळे त्यांच्या हनुवटीला इजा झाली, म्हणून त्यांना ‘हनुमान’ असे नाव पडले.

  • Que: हनुमान जयंतीचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: या दिवशी पूजा, उपवास आणि जप केल्याने संकटे दूर होतात आणि शक्ती, बुद्धी मिळते, अशी श्रद्धा आहे.

Web Title: Hanuman jayanti 2026 mythology why hanuman jayanti is celebrated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • Hanuman Jayanti
  • Hanuman Puja
  • hindu religion

संबंधित बातम्या

Raksha Bandhan 2026: यंदा कधी आहे रक्षाबंधन, मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या
1

Raksha Bandhan 2026: यंदा कधी आहे रक्षाबंधन, मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Pradosh Vrat 2026: श्रावण महिन्यात प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, योग आणि महत्त्व
2

Pradosh Vrat 2026: श्रावण महिन्यात प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, योग आणि महत्त्व

Sai baba Story: काय आहे साईबाबांची व्रत कथा आणि गोष्ट, जाणून घ्या
3

Sai baba Story: काय आहे साईबाबांची व्रत कथा आणि गोष्ट, जाणून घ्या

Shravan Thursday: श्रावणातील गुरुवारी अशी करा स्वामी समर्थांची सेवा, जाणून घ्या पूजा, नैवेद्य आणि नामस्मरणाचे महत्त्व
4

Shravan Thursday: श्रावणातील गुरुवारी अशी करा स्वामी समर्थांची सेवा, जाणून घ्या पूजा, नैवेद्य आणि नामस्मरणाचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.