Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hanuman Jayanti: बुद्धी आणि चातुर्याने घडवलेले चमत्कार, हनुमंताला का म्हटले जाते बुद्धिमत्ता वरिष्ठ

हनुमान हे केवळ बलशाली देवता नसून ते बुद्धी, विवेक आणि नम्रतेचे अद्वितीय प्रतीक मानले जातात. “बुद्धिमतां वरिष्ठ” म्हणून त्यांचा गौरव केला जातो. हनुमंताला बुद्धिमत्ता वरिष्ठ का म्हणतात ते जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 29, 2026 | 02:49 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • हनुमंताला बुद्धिमत्ता वरिष्ठ का म्हणतात
  • बुद्धी आणि चातुर्याने घडवलेले चमत्कार
  • हनुमंताला बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ का म्हणतात

बुद्धिमता वरिष्ठ म्हणून गौरव

हनुमंताला बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ म्हटले जाते कारण त्यांच्याकडे अफाट शक्तीसोबतच विलक्षण बुद्धिमत्ता, चातुर्य होते. अफाट शक्ती असूनही ते अत्यंत विनम्र होते. ते प्रकांड पंडित असूनही स्वतःला फक्त ‘रामभक्त’ म्हणवून घेण्यात धन्यता मानत. भक्ती, शक्ती आणि बुद्धी या तीनही गोष्टींचा समुच्चय होता. रामायणातील प्रत्येक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग होता. त्यामुळेच बुद्धीमत्माम वरिष्ठ म्हणून त्यांचा गौरव केला जातो.

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये।।

हनुमानाला ‘बुद्धिमतां वरिष्ठं’ (बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ) म्हटले जाते कारण त्यांच्याकडे अफाट शक्तीसोबतच विलक्षण बुद्धिमत्ता, चातुर्य आणि आत्मसंयम होता. त्यांनी केवळ बाहुबलाने नाही, तर संकटाच्या वेळी विचारपूर्वक निर्णय घेऊन रामायणातील कठीण प्रसंग म्हणजेच सुरसा परीक्षा, लंकादहन यशस्वी केले, तसेच ते वेद-शास्त्रांचे प्रकांड पंडित आणि उत्तम कूटनीतिज्ञ होते.

Kamada Ekadashi: कामदा एकादशीला शुभ योगांचा अद्भुत संयोग, भगवान विष्णूच्या आशीर्वादाने या राशींच्या लोकांच्या इच्छा होतील पूर्ण

योग्य निर्णयक्षमता आणि संकटमोचन वृत्ती

हनुमान हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पूजनीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना “बुद्धिमत्ता वरिष्ठ” म्हणजेच बुद्धीमध्ये श्रेष्ठ असे का म्हटले जाते, यामागे त्यांच्या जीवनातील अनेक गुण आणि कार्ये कारणीभूत आहेत. हनुमान केवळ अपार शारीरिक शक्तीचे प्रतीक नाहीत, तर ते ज्ञान, विवेक, चातुर्य आणि नम्रतेचेही मूर्तिमंत उदाहरण आहेत. हनुमानाला बुद्धीचा सागर मानण्यामागची मुख्य कारणे संकटमोचन आणि चातुर्य त्यांच्याकडे होते. समुद्र ओलांडताना सुरसा राक्षसीने परीक्षा घेतली असता, हनुमानाने शारीरिक शक्तीऐवजी बुद्धीचा वापर करून तिची मोठे होण्याचे अट पूर्ण केली आणि आपला मार्ग मोकळा केला.

रावणाच्या दरबारात दूत म्हणून जाताना त्यांनी आपले म्हणणे निर्भीडपणे मांडले. तसेच, राम-सुग्रीव मैत्री घडवून आणण्यात त्यांची दूरदृष्टी दिसून आली. त्यांची बुद्धी केवळ सामान्य नव्हती, तर ती अभ्यासपूर्ण आणि परिपक्व होती. ज्ञानाचा योग्य वापर कसा करावा, हे त्यांना उत्तम प्रकारे अवगत होते.

रामायणातील महत्त्वाचा सहभाग

रामायण या महाकाव्यात हनुमानांच्या बुद्धिमत्तेचे अनेक प्रसंग आढळतात. सीतेच्या शोधासाठी लंकेत जाताना त्यांनी अत्यंत सूक्ष्म रूप धारण केले आणि शत्रूंच्या नजरेत न येता संपूर्ण लंकेचा अभ्यास केला. ही केवळ शक्तीची नव्हे, तर चातुर्याची आणि योग्य निर्णयक्षमेची खूण आहे. योग्य वेळी योग्य रूप धारण करणे, परिस्थितीनुसार वागणे, हे त्यांच्या बुद्धिमत्तेचे स्पष्ट उदाहरण आहे.

Chaitra Purnima: चैत्र पौर्णिमा नेमकी कधी आहे? जाणून घ्या स्नान दान करण्याचा मुहूर्त

सीतेला भेटताना हनुमानांनी अत्यंत संयम, नम्रता आणि योग्य शब्दांचा वापर केला. त्यांनी आधी रामाची अंगठी दाखवून विश्वास निर्माण केला आणि नंतर शांतपणे संवाद साधला. यावरून त्यांची संवादकौशल्य आणि समजूतदारपणा दिसून येतो. केवळ ज्ञान असणे पुरेसे नसते, तर ते योग्य पद्धतीने मांडता येणेही महत्त्वाचे असते, हे त्यांनी दाखवून दिले.

याशिवाय, संकटसमयी उपाय शोधण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती. लक्ष्मणासाठी संजीवनी आणताना त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलून आणला, कारण त्यांना योग्य औषध ओळखता आले नाही. हा निर्णय त्यांच्या चातुर्याचा आणि तत्पर विचारशक्तीचा उत्तम नमुना आहे. परिस्थितीनुसार त्वरित निर्णय घेणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे.

नम्रता आणि अहंकारचा लवलेशही नाही

हनुमानांची नम्रता ही त्यांच्या बुद्धिमत्तेची आणखी एक मोठी खूण आहे. इतके सामर्थ्य आणि ज्ञान असूनही त्यांनी कधीही अहंकार केला नाही. ते नेहमी राम यांचे सेवक म्हणून राहिले. खरा बुद्धिमान व्यक्ती तोच जो आपल्या गुणांचा गर्व करत नाही, हे त्यांनी आपल्या आचरणातून सिद्ध केले.

अफाट शक्ती असूनही ते अत्यंत विनम्र होते. ते प्रकांड पंडित असूनही स्वतःला फक्त ‘रामभक्त’ म्हणवून घेण्यात धन्यता मानत..
जितेन्द्रिय (इंद्रियांवर ताबा) हनुमानाची बुद्धी जागृत राहण्यामागे त्यांचे ब्रह्मचर्य आणि आत्मसंयम हे मोठे कारण आहे, ज्यामुळे ते वासनेपासून दूर राहून ध्येयनिष्ठ राहिले. पण त्यांना स्वतःच्या शक्तीची जाणीव नसायची (जाम्बवंताच्या आठवणी करून दिल्यावरच त्यांना शक्तीची जाणीव व्हायची असे रामायणात सांगितले आहे, हे दर्शवते की ते केवळ बाहुबलावर विसंबून न राहता बुद्धीला प्राधान्य देत असत..

हनुमानांना “बुद्धिमत्ता वरिष्ठ” म्हटले जाते कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ज्ञान, विवेक, चातुर्य, योग्य निर्णयक्षमता, संवादकौशल्य आणि नम्रता हे सर्व गुण एकत्रितपणे आढळतात. त्यामुळे ते केवळ बलशाली नव्हे, तर बुद्धीमत्तेचेही सर्वोच्च प्रतीक आहेत.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: हनुमंताला ‘बुद्धिमतां वरिष्ठ’ का म्हटले जाते?

    Ans: कारण त्यांच्याकडे अफाट शक्तीसोबत विलक्षण बुद्धिमत्ता, चातुर्य, योग्य निर्णयक्षमता आणि आत्मसंयम होते.

  • Que: हनुमानांना संकटमोचन का म्हणतात?

    Ans: कारण ते संकटाच्या वेळी योग्य उपाय शोधून अडचणी दूर करतात, जसे संजीवनी आणण्याचा प्रसंग.

  • Que: हनुमानांच्या बुद्धीमागचे रहस्य काय आहे?

    Ans: त्यांचे आत्मसंयम, ब्रह्मचर्य, एकाग्रता आणि ज्ञानाचा योग्य वापर हे त्यांच्या बुद्धीचे मुख्य कारण आहे.

Web Title: Hanuman jayanti why is hanuman called the superior of intelligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • dharm
  • Hanuman Jayanti
  • hindu religion

संबंधित बातम्या

Kashmir History: काश्मीरला ऋषीमुनींची तपोभूमी का म्हटले जाते? जाणून घ्या पौराणिक इतिहास
1

Kashmir History: काश्मीरला ऋषीमुनींची तपोभूमी का म्हटले जाते? जाणून घ्या पौराणिक इतिहास

Chaturmas 2026: चातुर्मासात शुभ कार्ये का टाळली जातात? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे
2

Chaturmas 2026: चातुर्मासात शुभ कार्ये का टाळली जातात? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे

Puja Tips: आरतीपूर्वी देवाला धूप का दाखवला जातो? जाणून घ्या धर्मशास्त्र, अध्यात्म आणि विज्ञानातील महत्त्व
3

Puja Tips: आरतीपूर्वी देवाला धूप का दाखवला जातो? जाणून घ्या धर्मशास्त्र, अध्यात्म आणि विज्ञानातील महत्त्व

Sankashti Chaturthi: ऑगस्टमध्ये संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ
4

Sankashti Chaturthi: ऑगस्टमध्ये संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.