Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hindu Religion : साखरपुड्याला हिरवीच साडी का नेसतात? काय आहे यामागील शास्त्र ?

साखरपुड्याशिवाय हिंदू धर्मात लग्न होत नाही. कधी विचार केलाय का साखरपुड्याला मुलगी हिरवी साडीच का नेसतात? यामागे नेमकं काय शास्त्र आहे जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 30, 2025 | 04:28 PM
Hindu Religion : साखरपुड्याला हिरवीच साडी का नेसतात? काय आहे यामागील शास्त्र ?
Follow Us
Close
Follow Us:
  • साखरपुड्याला हिरवी साडी का नेसतात?
  • काय आहे यामागील शास्त्र ?
  • हिरवाच रंग का ?
भारतीय परंपरेत विवाह संस्कृतीला मोठं महत्व आहे. प्रत्येक विधी, प्रत्येक परंपरेमागे काही ना काही अर्थ हा दडलेला असतो. असंच लग्नाआधीचा महत्वाचा विधी म्हणजे साखरपुडा. साखरपुड्याशिवाय हिंदू धर्मात लग्न होत नाही. विवाहापूर्वीचा साखरपुडा हा दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंबांच्या नात्याची सुरुवात असते. यावेळी होणारी वधू हिरवी साडी नेसते. कधी विचार केलाय का साखरपुड्याला मुलगी हिरवी साडीच का नेसतात? यामागे नेमकं काय शास्त्र आहे जाणून घेऊयात.

साखरपुड्याला हिरव्या रंगाची साडी नेसण्याबाबत दंतकथा सांगितली जाते ती अशी की, पूर्वी एका कन्येने विवाहासाठी देवी पार्वतीची मनोभावे पूजा केली. माझ्या आयुष्यात सौभाग्य येऊ दे आणि माझे गृहस्थाश्रम सुखी होऊ दे अशी तिने देवीजवळ प्रार्थना केली. त्या मुलीच्या घरात आर्थिक अडचण असल्यामुळे तिच्याकडे सुंदर साडी नव्हती. साखरपुड्याच्या आधीच्या रात्री देवी पार्वतीने स्वप्नात येऊन या मुलीला दृष्टांत दिला. देवीने या मुलीला हिरवी सुंदर अशी साडी आशिर्वाद म्हणून दिली आणि सांगितलं की ही, हिरवी साडी म्हणजे नवजीवनाचा शुभ शकुन आहे. यानंतर देवी अदृश्य झाली. ही गोष्ट पंचक्रोशीत पसरली आणि तेव्हापासून साखरपुड्यासारख्या नवसुरुवातीच्या प्रसंगी हिरवा रंग शुभ मानला जाऊ लागला.

हिंदू धर्मात हिरवा रंग हा देवी पार्वती आणि अन्नपूर्णा यांच्या आशीर्वादाचे प्रतिक मानला जातो. गृहस्थाश्रमाची सुरूवात होणाऱ्या या पारंपरिक कार्यक्रमात विवाहित जीवनासाठी या देवींचा कृपाशिर्वाद मिळावा अशी यामागे भावना असते. याच दृष्टीकोनातून हिरवी साडी मुलीला नेसवली जाते. महाराष्ट्रात विवाहित स्त्रियांचा हिरव्या रंगाशी असलेला संबंध विशेष मानला जातो. हिरवा चुडा आणि हिरवी साडी हे सौभाग्य आणि अखंड मंगलाचा शुभशकुन मानला जातो.

Palmistry: तळव्यावरुन समजते व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व, काय सांगते हस्तरेखाशास्त्र जाणून घ्या

सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहिले तर साखरपुड्याला हिरवी साडी हा ‘हरित’ शुभसंकेत मानण्याचा एक सुंदर वारसा आहे. नव्या नात्यांच्या, नव्या सुरुवातींच्या स्वागताचा हा रंग आजही तेवढाच महत्वपूर्ण आहे. परंपरा, आध्यात्मिक ऊर्जा आणि शास्त्रीय अर्थ यांचा मिलाफ असलेली हिरवी साडी हा साखरपुड्याचा अविभाज्य भाग बनला आहे.

साखरपुड्याबाबत प्रत्येक राज्यात विविध प्रथा परंपरा आहेत. मात्र महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे मुली साखरपुड्याला हिरव्या रंगाची साडी नेसतात. यामागे अर्थ असा की, हिरवा रंग समृद्धी आणि भरभराट दर्शवतो. साखरपुडा म्हणजे काही दिवसात मुलगी लग्न करुन सासरी जाणार असते. या भावी वधूचं होणारं घर हे धन धान्यांनी भरलेलं असावं. तिच्या नव्या जीवनात सारं काही शुभं घडावं या सदिच्छा म्हणून मुलगी हिरवी साडी नेसते. हिरवा रंग हा मांगल्याचं देखील प्रतिक आहे.

साखरपुडा म्हणजे एका अर्थी जीवनातील नव्या अध्यायाची सुरूवात असते. या रंगात सकारात्मकता, शांतता आणि स्थैर्याचे गुण असतात. शास्त्रानुसार हिरवा रंग मनातील तणाव कमी करून आनंद, समाधान आणि आशावाद वाढवतो. त्यामुळे वधूने हिरवा रंग नेसल्यास तिच्या मनातही प्रसन्नता व स्थिरता वाढते, असे मानले जाते.

Zodiac Sign: हर्ष योग आणि शनि देवाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांना होईल लाभ

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: साखरपुड्याला हिरवी साडी का नेसतात?

    Ans: हिरवा रंग समृद्धी, भरभराट, सौभाग्य आणि नव्या सुरुवातीचं प्रतिक मानला जातो. साखरपुड्याने वधूच्या नव्या जीवनाची सुरूवात होत असल्याने हिरवी साडी शुभ मानली जाते.

  • Que: हिरवा रंग देवी पार्वतीशी कसा संबंधित आहे?

    Ans: हिरवा रंग हा देवी पार्वती व अन्नपूर्णा यांच्या आशीर्वादाचे प्रतीक मानला जातो. विवाहसंबंधाच्या नव्या गृहस्थाश्रमासाठी शुभ शकून म्हणून वधू हिरवी साडी नेसते.

  • Que: हिरवा रंग समृद्धीचे कशाचे प्रतीक आहे?

    Ans: हिरवा हा निसर्ग, पिकं, धनधान्य आणि वाढ-भरभराट यांचा रंग आहे. त्यामुळे भावी वधूचे गृहस्थाश्रम सुखी, समृद्ध व मंगलमय होवो,या शुभेच्छेने हिरवी साडी नेसवली जाते.

Web Title: Hindu religion engagement why do people wear green sarees for sugarpups what is the science behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • hindu religion

संबंधित बातम्या

Chaitra Navratri 2026: चैत्र नवरात्रीमध्ये 9 दिवस करा ‘हे’ उपाय, समस्या होतील दूर
1

Chaitra Navratri 2026: चैत्र नवरात्रीमध्ये 9 दिवस करा ‘हे’ उपाय, समस्या होतील दूर

Eknathshashti 2026: एकनाथषष्ठी म्हणजे काय? हा पवित्र उत्सव साजरा करण्यामागे काय आहे परंपरा
2

Eknathshashti 2026: एकनाथषष्ठी म्हणजे काय? हा पवित्र उत्सव साजरा करण्यामागे काय आहे परंपरा

Khandoba: रविवारी खंडोबाची आराधना का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Khandoba: रविवारी खंडोबाची आराधना का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Rang Panchami 2026: कधी आहे रंगपंचमी, रंगपंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय
4

Rang Panchami 2026: कधी आहे रंगपंचमी, रंगपंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.