Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rang Panchami 2026: कधी आहे रंगपंचमी, रंगपंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

रंगपंचमीच्या दिवशी राधा राणी आणि भगवान कृष्ण रंगांनी होळी खेळत असत आणि देव-देवता देखील सहभागी होण्यासाठी पृथ्वीवर अवतरल्या. म्हणूनच, याला देव पंचमी किंवा देव रंग पंचमी असेही म्हणतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 08, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • रंगपंचमी कधी आहे
  • रंगपंचमीच्या दिवशी करा उपाय
  • रंगपंचमी का साजरी केली जाते
 

रंगपंचमी हा हिंदू धर्मामध्ये एक महत्त्वाचा सण आहे. होळीचा सण रंगपंचमीने संपतो. रंगपंचमीचा हा सण होळीनंतर पाच दिवसांनी साजरा केला जातो. यंदा हा सण रविवार, 8 मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगपंचमीच्या दिवशी काही उपाय करणे देखील फायदेशीर मानले जाते. रंगपंचमी कधी आहे आणि कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या

रंगपंचमी कधी आहे

पंचांगानुसार, पंचमी तिथीची सुरुवात शनिवार, 7 मार्च रोजी संध्याकाळी 7.17 वाजता सुरू झाली आहे आणि या तिथीची समाप्ती 8 मार्च रोजी रात्री 9.10 वाजता होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार, या वर्षीचा रंगपंचमी उत्सव 8 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे.

रंगपंचमीचे उपाय

गुलाल अर्पण करणे

 

रंगपंचमीला भगवान कृष्ण आणि राधा राणी यांच्या मूर्तींना गुलाबी रंगाचा गुलाल अर्पण करा. त्यानंतर, “ओम क्लीम कृष्णाय नम:” या मंत्राचा जप करा. असे मानले जाते की, भगवान कृष्ण आणि राधा राणी यांना गुलाल अर्पण केल्याने नात्यांमधील कोणताही दुरावा संपतो आणि प्रेम वाढते.

घरातील समस्या दूर होणे

भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला पिवळा गुलाल अर्पण करा. यामुळे घरातील त्रास दूर होतात.

Vastu Tips: स्वयंपाकघरात ठेवलेल्या या गोष्टीमुळे वाढू शकते नकारात्मक ऊर्जा, घरात येऊ शकते दरिद्रता

शिवलिंगाचा अभिषेक

तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी भरा आणि त्यात थोडे मध घाला आणि शिवलिंगाचा अभिषेक करा. यामुळे नातेसंबंध मजबूत होतात.

नातेसंबंध चांगले राहणे

रंगपंचमीला, सात अशोक पानांवर तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाव सिंदूरने लिहा आणि ते मंदिरात अर्पण करा. यामुळे नातेसंबंध सुधारतील.

Shukraditya Yog: सूर्य आणि शुक्राच्या युतीमळे तयार होणार दुर्मिळ योग, या राशीच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

रंगपंचमीची काय आहे पौराणिक कथा

रंगपंचमीचा सण हा आध्यात्मिक आणि पुण्यपूर्ण मानले जाते. रंगपंचमीच्या सणाला काशी आणि ब्रजमध्ये विशेष महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, रंगपंचमीच्या दिवशी राधा राणी आणि भगवान कृष्ण रंगांनी होळी खेळत असत आणि देव-देवता देखील सहभागी होण्यासाठी पृथ्वीवर अवतरल्या. म्हणूनच, याला देव पंचमी किंवा देव रंग पंचमी असेही म्हणतात. रंगपंचमीच्या दिवशी पूजा अर्चना, मंत्रांचा जप आणि गुलाल अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्धी येते असे मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: रंगपंचमी म्हणजे काय?

    Ans: रंगपंचमी हा हिंदू सण आहे जो होळीच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांवर रंग उधळून आनंद साजरा करतात आणि वाईट विचारांवर चांगल्या विचारांचा विजय दर्शवतात.

  • Que: रंगपंचमीचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार रंगपंचमी हा सण नकारात्मक ऊर्जा दूर करून आनंद, प्रेम आणि सकारात्मकता वाढवण्याचे प्रतीक मानला जातो. या दिवशी देवतांची पूजा करून घरात सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते.

  • Que: रंगपंचमी कोणकोणत्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी होते?

    Ans: महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विशेषतः मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी रंगोत्सवाचे आयोजन केले जाते.

Web Title: Rang panchami 2026 when is rang panchami perform these remedies on this auspicious day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • holi

संबंधित बातम्या

Shukra Asta 2026: 23 सप्टेंबरपासून शुक्र होणार अस्त; पुढील 37 दिवस या राशींना धन-करिअरमध्ये लाभ
1

Shukra Asta 2026: 23 सप्टेंबरपासून शुक्र होणार अस्त; पुढील 37 दिवस या राशींना धन-करिअरमध्ये लाभ

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना शिदोरी देण्याची प्रथा का? जाणून घ्या यामागची भावना
2

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना शिदोरी देण्याची प्रथा का? जाणून घ्या यामागची भावना

Rishabhadev Temple: गिरनार पर्वतावर वसले आहे भगवान ऋषभदेवांचे प्राचीन मंदिर; जाणून घ्या मंदिराची माहिती आणि महिमा
3

Rishabhadev Temple: गिरनार पर्वतावर वसले आहे भगवान ऋषभदेवांचे प्राचीन मंदिर; जाणून घ्या मंदिराची माहिती आणि महिमा

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी गुपचूप करा ‘हे’ उपाय; घरात नांदेल सुख समृद्धी
4

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी गुपचूप करा ‘हे’ उपाय; घरात नांदेल सुख समृद्धी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.