Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Shani Yuti 2026: शुक्र आणि शनीची दुर्मिळ युती; ‘या’ 4 राशींना मिळणार करिअरमध्ये मोठे यश

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत येतात तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. यावेळी मीन राशीमध्ये शुक्र आणि शनीचा संयोग तयार झाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 10, 2026 | 03:07 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मीन राशीमध्ये शुक्र आणि शनीचा संयोग तयारृ
  • योग 2 मार्च 2026 पासून सुरु होऊन 26 मार्चपर्यंत प्रभावी
  • या काळात पैसा, करिअर, व्यावसायाशी संबंधित सकारात्मक बदल
Shukra Shani Yuti 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत येतात तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. यावेळी मीन राशीमध्ये शुक्र आणि शनीचा संयोग तयार झाला आहे. हा योग 2 मार्च 2026 पासून सुरु होऊन 26 मार्चपर्यंत प्रभावी राहणार आहे. जवळजवळ 30 वर्षांनंतर होणारी ही विशेष ग्रहसंयोजन अनेकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, या काळात पैसा, करिअर आणि व्यावसायाशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. काही राशींसाठी, हा काळ आर्थिक प्रगतीसोबतच प्रलंबित कामं पूर्ण होणारा आणि नातेसंबंध मजबूत करणारा मानला जात आहे. विशेषतः वृषभ, मिथुन, तूळ आणि वृश्चिक राशीत जन्मलेल्यांवर सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता आहे.

Chanakya Niti : लोकं तुमचा टिशू पेपरसारखे वापर करतात का? चाणक्य नीती सांगते हे ६ संकेत!

वृषभ राशी

वृषभ राशीसाठी हा काळ आर्थिक दिलासा देणारा ठरू शकतो. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्याचे नवे पर्याय मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नफा मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहणार आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहणार आहे. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित कोणताही विषय तुमच्या बाजूने राहू जाऊ शकतो. यासोबतच या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यातील योजनांवर काम करण्याची चांगली संधी आहे.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांना करिअरमध्ये बदल होण्याची चिन्हे दिसू शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं हळूहळू मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगला पाठिंबा मिळेल. नवीन नोकरीची किंवा चांगल्या संधीचीही शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारेल.

तुळ राशी

हा काळ तुळ राशींसाठी भाग्योदयाचा काळ आहे. गुंतवणूकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या योजना यशस्वी ठरु शकतात. भागीदारीतील कामातून फायदा होऊ शकतो. तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांना स्थिरता मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन जाबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. ज्या तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण कराल.

वृश्चिक राशी

हा काळ वृश्चिक राशींसाठी अनेक इच्छा पूर्ण करणारा ठरणार आहे. त्यांच्या कारकिर्दीला नवीन दिशा मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची बातमी मिळू शकते. व्यावसायिकांना रखडलेले प्रकल्प पूर्ण होताना दिसू शकतात. आर्थिक लाभ होण्याची चांगली शक्यता आहे. वैवाहिक सुसंवाद सुधारू शकतो. जुने मतभेद दूर होऊन मानसिक तणाव कमी होऊ शकतो.

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Sun Transit 2026: मीन राशीत सूर्य गोचर, सूर्य-शनिच्या युतीने कहर; 4 राशींवर संकटाची चाहूल, प्रभाव आणि उपाय

Web Title: Shukra shani yuti 2026 meen rashi benefits taurus gemini libra scorpio career money astrology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • astrological tips
  • astrology news
  • surya gochar

संबंधित बातम्या

Astro Tips: घरातून बाहेर पडताना खिशात ठेवा वेलची; इंटरव्ह्यूला जाणाऱ्यांनी नक्कीच करा हे उपाय
1

Astro Tips: घरातून बाहेर पडताना खिशात ठेवा वेलची; इंटरव्ह्यूला जाणाऱ्यांनी नक्कीच करा हे उपाय

Numberlogy: मूलांक १ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक १ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
3

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
4

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.