फोटो सौजन्य- pinterest
सनातन धर्मामध्ये आषाढ अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही अमावस्या तिथी पूर्वजांना संबंधित असल्याचे मानले जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्थान करणे दान करणे आणि पित्रांसाठी श्राद्ध करणे हे शुभ मानले जाते. तसेच यंदाच्या आषाढ अमावस्येला वृद्धी योग, वेशी योग आणि गुरु आदित्य योग हे शुभ योग तयार होत आहेत. आषाढ अमावस्या नेमकी कधी आहे, शुभ मुहूर्त, महत्व जाणून घ्या
आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील आषाढ अमावस्या तिथीची सुरुवात मंगळवार 24 जून रोजी संध्याकाळी सात वाजता झालेली आहे आणि या अमावस्या तिथीची समाप्ती आज बुधवार 25 जून रोजी दुपारी 4 वाजून 1 मिनिटांनी होणार आहे. म्हणजेच अमावस्या तिथी ही बुधवार 25 जून रोजी आहे. तर आषाढ महिन्याची सुरुवात गुरुवार, 26 जून रोजी होत आहे. या दिवशी पितृ कर्माशी संबंधित असलेली कामे करावीत. अमावस्येला सूर्योदयाच्या वेळी नदीत स्थान करून दान करणे शुभ मानले जाते. यादरम्यान वृद्धी योग, वेशी योग आणि गुरु आदित्य योग हे शुभ योग तयार होत आहेतच मात्र त्यासोबतच गजकेशरी राजयोग सुद्धा तयार होत आहे.
आषाढ अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना श्राद्ध, तर्पण, पिंडदान इत्यादी करण्याला विशेष महत्त्व आहे. यावेळी गरजूंना दान करणे त्यासोबतच गाई, कावळे, मुंग्या इत्यादींना साखर, पीठ, गूळ या घरातील गोष्टींचा नैवेद्य दाखवावा. तसेच ब्राह्मणांना दान करणे सुद्धा शुभ मानले जाते. अमावस्येच्या दिवशी तामासिक पदार्थांचे सेवन करू नये. या दिवशी केस कापणे, नख कापणे, झाडू खरेदी करणे या गोष्टी टाळाव्यात. मान्यतेनुसार या सर्व गोष्टी केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते.
आषाढ अमावस्येला घरामध्ये तुपाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. त्यानंतर पिंपळाच्या झाडातभोवती प्रदक्षिणा घालाव्या. जलपूजन करतेवेळी नदीत ५ लाल फुले आणि ५ दिवे वाहत्या पाण्यात सोडा. तसेच कन्यापूजन करून घरात किमान ९ मुलींना जेवू घालावे. पितृस्तोत्राचे पठण करणे देखील शुभ मानले जाते.
ज्येष्ठ अमावस्येला हलहारीणी अमावस्या असेही देखील म्हटले जाते. या दिवशी पूर्वजांची पूजा करण्याव्यतिरिक्त, शेतीच्या अवजारांचीही पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, यामुळे चांगले पीक येते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)