Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalashtami 2026: कालाष्टमीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्यास नकारात्मक शक्तींचा प्रभाव होतो कमी

कालाष्टमीचा दिवस कालभैरवाला समर्पित आहे. कालाष्टमीच्या दिवशी काही उपाय केल्याने संकट दूर होतात असे म्हटले जाते. या उपायामुळे जुने कर्ज, वारंवार होणारे अपघाताची शक्यता दूर होते. कालाष्टमीचे उपाय जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 10, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कालाष्टमी कधी आहे
  • कालाष्टमी शुभ मुहूर्त
  • कालाष्टमी उपाय
 

धार्मिक श्रद्धेनुसार भगवान शिवाचा भयंकर अवतार कालभैरव याचा अवतार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला. म्हणून, दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते. कालष्टमीचे व्रत ठेवून आणि विधीनुसार बाबा कालभैरवाची पूजा केल्याने अकाली मृत्यूचा धोका टळतो. याव्यतिरिक्त, आजारापासून आराम मिळतो आणि कर्ज दूर होते. देशात बाबा काल भैरवांना समर्पित काही प्रसिद्ध मंदिरे आहेत, जिथे कालाष्टमीला भाविकांची मोठी गर्दी असते. कालाष्टमीच्या दिवशी कोणते उपाय करायचे ते जाणून घ्या

कधी आहे कालाष्टमी

माघ महिन्यातील कालष्टमी शनिवार, 10 जानेवारी रोजी आहे. या दिवशी निशिता काळात कालभैरवाची पूजा करावी. तसेच या दिवशी उपाय करावे. या दिवशी उपाय केल्याने ग्रह दोष, पितृ दोष आणि इतर दोष दूर होतात. तसेच शनि राहू दोष देखील दूर होतात. या उपायामुळे कोणत्याही समस्येतून सुटका होण्यास मदत होते.

Bhishma Pitamah: मकरसंक्रांतीच्या दिवशी भीष्म पितामहांनी का सोडले प्राण? काय आहे कथा

कालाष्टमी मुहूर्त

कालाष्टमी तिथीची सुरु शनिवार 10 जानेवारी रोजी सकाळी 08:23 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती रविवार 11 जानेवारी रोजी सकाळी 10:20 वाजता होणार आहे. निशिता काळात पूजा करण्याची वेळ रात्री 10 जानेवारी रोजी 11.55 ते 12.47 आहे. या वेळी श्री काल भैरवाची पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते.

कालाष्टमीच्या दिवशी करा हे उपाय

कर्जाच्या समस्या

जर शत्रू तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुम्हाला कर्ज आणि ग्रहदोषाच्या समस्या असतील तर कालष्टमीचे व्रत करा आणि विधीनुसार कालभैरवाची पूजा करा. यामुळे आरोग्याच्या समस्या, कर्जाच्या समस्या दूर होतात.

मोहरीच्या तेलाचा दिवा

कालाष्टमीच्या दिवशी बाबा कालभैरव यांच्या मंदिरात जा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि उडीद डाळीपासून बनवलेल्या बडे, इमरती आणि इतर मिठाई अर्पण करा.

Astro Tips: कुंडलीमध्ये शुक्र दोष असल्यास शुक्रवारी करा हे उपाय, प्रत्येक कामात मिळेल यश

मंत्रांचा जप

कालाष्टमीच्या दिवशी ओम श्री भैरवाय नमः या मंत्रांचा जप करावा. काल भैरव चालीसा, श्री भैरव स्तोत्राचा पाठ करा आणि काल भैरव आरती करा. यामुळे तणाव दूर होतो आणि मानसिक शांती मिळते.

जर तुम्ही कालाष्टमीचे व्रत करणार असाल तर दिवसा झोपू नका. त्यासोबतच ‘ॐ ऐं क्लीम् ह्रीं भम् भैरवाय मम ऋण विमोचनाय महा महाधनप्रदाय क्लीं स्वाहा या मंत्रांचा कमीत कमी 11, 21, 31, 51 एवढ्या वेळा जप करावा. तसेच ग्रह दोषाच्या समस्या असल्यास या मंत्रांचा जप करणे फायदेशीर ठरते.

कालभैरवाचे वाहन

कालभैरवाचे वाहन कुत्रा आहे. त्यामुळे कुत्र्याला खाऊ घाला आणि त्याला दूधही द्या.

या गोष्टींचे दान करा

गरजूंची सेवा करा. ब्राह्मण, भिक्षू आणि गरिबांना दान करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कालाष्टमी म्हणजे काय?

    Ans: कालाष्टमी हा भगवान भैरवनाथांचा विशेष दिवस मानला जातो. कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी भैरव पूजेमुळे नकारात्मक शक्ती, भीती आणि अडचणी दूर होतात असे मानले जाते.

  • Que: कालाष्टमीला भैरव पूजेचे महत्त्व काय आहे?

    Ans: भैरवनाथ हे रक्षक देव मानले जातात. त्यांची पूजा केल्यास अकस्मात संकटे, भीती, अपघात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते, तसेच मानसिक स्थैर्य मिळते.

  • Que: कालाष्टमीच्या दिवशी कोणते मंत्र जपावेत?

    Ans: ॐ भैरवाय नमः” हा मंत्र किमान 108 वेळा जपल्यास संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

Web Title: Kalashtami 2026 do these remedies on kalashtami day the effect of negative energies will be reduced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.