Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satai Devi: कोकणातील हजारो कुटुंबांची कुलदेवता, जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि महिमा

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अंजर्ले समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या कोंगळे गावातील सताई देवीचे मंदिर हे कोकणातील अत्यंत जागृत आणि श्रद्धास्थान मानले जाणारे देवस्थान आहे. कोण आहे सताई देवी आणि या मंदिराच्या इतिहासाविषयी सविस्तर जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 26, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • कोकणातील हजारो कुटुंबांची कुलदेवत असलेली सताई देवी
  • सताई देवीचा काय आहे इतिहास
  • काय आहे सताई देवीचा महिमा
 

 

सताई देवीचे मंदिर हे कोकणातील प्रसिद्ध असे मंदिर आहे. अनेक कुटुंबांची कुलदेवता आणि ग्रामदेवता असलेल्या या स्वयंभू देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी महाराष्ट्रभरातून हजारो भाविक येथे येतात. घनदाट जंगलात वसलेले हे पेशवेकालीन मंदिर, त्याचा समृद्ध इतिहास, नवसाला पावणाऱ्या मातेचा महिमा आणि शतकानुशतके जपली गेलेली धार्मिक परंपरा यामुळे हे मंदिर विशेष आकर्षण ठरते. कोंगळे येथील सताई देवी मंदिराचा इतिहास, वास्तुरचना, उत्सव आणि या जागृत देवस्थानाचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया

रत्नागिरीच्या कोंगळे गावातील जागृत सताई देवी मंदिर

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात अंजर्ली किनाऱ्यालगत असलेल्या कोंगळे गावात सताई देवीचं मंदिर आहे. ही देवी कोकणातील अनेक कुटुंबाची कुलदेवता किंवा ग्रामदेवता म्हणून मानली जाते. गावच्या मुख्य वस्तीपासून दूर आणि घनदाट जंगलात सताई देवीचं हे पेशवेकालीन मंदिर आहे. कोंगळेचे ग्रामदेवत असलेले हे स्वयंभू देवस्थान आहे भक्तांच्या नवसाला पावणारी आणि हाकेला उभी राहणारी देवी, अशी आई सताईची सर्वदूर ख्याती आहे. हे देवस्थान अतिशय दुर्गम भागात असलं तरी देखील संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भक्त सताईच्या दर्शनासाठी येत असतात.

Waghjai Devi: कोण आहे वाघजाई देवी, जाणून घ्या या देवीचा महिमा

2012 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार

2012 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यानंतर या मंदिराला सध्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. यापूर्वी सताईचं मंदिर लाकडी, दगडी खांबाच आणि कौलारु होतं. सताई देवीचा महिमा पाहून स्वतः पेशव्यांनी सताई देवीचं मंदिर बांधल्याचं कोंगळे गावातील ग्रामस्थ सांगतात. पेशवेकालीन मंदिराची रचना तशीच ठेवून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मुख्य प्रवशद्वारावरती आकर्षक कमान असून तेथे जय विजय या द्वारपालांचे शिल्प आहे. दर्शन मंडपातून तीन फूट उंचीवरती असलेला सभामंडप मोठा आहे. गर्भगृहात सताईची काळ्या पाषाणातील स्वयंभू मूर्ती आहे. तिला सण उत्सवांच्या काळात साडीचोळी, विविध अलंकार आणि सोने चांदीच्या मुखवटाने सजवण्यात येतं. याशिवाय गर्भगृहात मानाई, चोलाई, वाघमाता, काळेशी, दाकमाता, अवजाई, देवचोकटोबा, वाघजाई आणि देव हनुमंत यांच्या देखील प्राचीन दगडी मूर्ती आहे. गर्भगृहाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन उपगृह आहे.

Yogeshwari Devi: आदिशक्तीचे पवित्र स्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी, जाणून घ्या या देवीचा इतिहास

मंदिराशेजारी प्राचीन शिवमंदिर आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती

दरवर्षी चैत्र कृष्ण पंचमीला सताईचा वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. शिमगा उत्सव, नवरात्रोत्सव यांसारखे प्रमुख उत्सव या मंदिरात साजरे होतात. दरवर्षी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पहिली होळी पेटवून कोंगळे येथील देवी सताईच्या शिमगोत्सवाला सुरुवात होते. यावेळी सताई देवीची पालखी रात्री मंदिरातून निघते. ती कोंगळे आणि अंजर्ले गावात फिरते. अंजर्लेवासीय सुद्धा पालखीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. मंदिराच्या शेजारी पुरातन शिव मंदिर आहे. प्राचीन शिवपिंडीसोबत मंदिरात असलेली पाषाणातील गणेशमूर्तीसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: . सताई देवीला कोणत्या स्वरूपात मानले जाते?

    Ans: सताई देवी ही कोकणातील अनेक कुटुंबांची कुलदेवता आणि कोंगळे गावाची ग्रामदेवता म्हणून पूजली जाते.

  • Que: सताई देवीच्या मंदिराचा इतिहास काय आहे?

    Ans: ग्रामस्थांच्या परंपरेनुसार, देवीचा महिमा पाहून पेशव्यांनी हे मंदिर उभारले. 2012 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला सध्याचे स्वरूप देण्यात आले.

  • Que: गर्भगृहात कोणकोणत्या देवतांच्या मूर्ती आहेत?

    Ans: गर्भगृहात काळ्या पाषाणातील सताई देवीची स्वयंभू मूर्ती असून मानाई, चोलाई, वाघमाता, काळेशी, दाकमाता, अवजाई, देवचोकटोबा, वाघजाई आणि हनुमंत यांच्या प्राचीन मूर्तीही आहेत.

Web Title: Kokan satai devi mandir history mahima and significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • kokan

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.